इतिहास
-
Sale! Add to cartआपला शेजार आपल्याला बदलता येत नाही. गेली अनेक शतकं आपला शेजारी असलेल्या चीनबरोबरचे आपले संबंध विलक्षण गुंतागुंतीचे. विशेषत: माओंच्या कारकिर्दीत झालेल्या १९६२ च्या युद्धानंतर हे संबंध चांगलेच ताणले गेले. वास्तविक आजचा चीन आणि माओंचा चीन यात जमीन - अस्मानाचा फरक. साम्यवादाचं नाव लावणाऱ्या चीनमध्ये आज प्रत्यक्षात प्रारूप आहे नियंत्रित-भांडवलशाही चं. चीन जितका आधुनिक, तितकाच ऐतिहासिकही. आधुनिकतेच्या महामार्गावर वेगाने पुढे जाताना एखाद्या वळणावर आपली प्राचीनता सोडून द्यावी, असं चीनच्या कोणत्याही सत्ताधीशाला वाटलेलं नाही, मग ते माओ असोत, डेंग असोत वा आजचे क्षी जिनपिंग. हे असे विसंवाद वागवत वागवत पुढे जाणं हे चीनच्या रक्तातच असावं. आजही भारताबरोबरचा संघर्ष असेल वा अमेरिकेशी स्पर्धा- चिनी सत्ताधीश आपली धोरणं ठरवताना इतिहासात दडलेल्या सूत्रांचा आधार घेत असतात. हे चकित करणारं विलक्षण चिनी प्रारूप समजावून देणारं-
All BooksMade In China | मेड इन चायना
₹550.00Original price was: ₹550.00.₹413.00Current price is: ₹413.00. Save ₹137 Add to cart -
Sale! Add to cartएकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध म्हणजे अर्वाचीन महाराष्ट्राचे चैतन्यपर्व ! या काळात महाराष्ट्रामध्ये अनेक रथी-महारथी अवतरले. प्रचंड वैचारिक रणधुमाळी माजली. अनेक प्रयोग झाले. त्यांपैकी काही यशस्वी झाले, काही अपयशी ठरले. दीडशे वर्षांपूर्वीच्या त्या चळवळी आज एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीही आपल्या जीवनाला स्पर्श करीत आहेत. त्यांचा अन्वयार्थ लावण्याचे काम सोपे करणारे हे पुस्तक.
इतिहासMaharashtra Gatha Part 2 | महाराष्ट्रगाथा (भाग २)
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cartमहाराष्ट्र होता कसा शेकडो, हजारो वर्षांपूर्वी ? कोणाची वस्ती होती तेव्हा या भूमीवर ? कसे जगत होते, कसे राहात होते ते लोक ? काय होती त्यांची जीवनपद्धती, त्यांच्या चालीरीती ? महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या उत्खननांमधून मिऴालेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे सुप्रसिद्ध पुरातत्त्वशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ.ढवळीकर यांनी सांगितलेली महाराष्ट्राची कुळकथा.
इतिहासMaharashtrachi Kulkatha | महाराष्ट्राची कुळकथा
₹220.00Original price was: ₹220.00.₹165.00Current price is: ₹165.00. Save ₹55 Add to cart -
Sale! Add to cartमाणसाचं निसर्गाशी एक अतूट, अलौकिक, अगम्य आणि अनादी नातं आहे. तरीही मनुष्य हा निसर्गप्रेमी प्राणी आहे, हे विधान मात्र आज अ-वास्तव' ठरलं आहे. संगणकीय संवादाच्या या युगात माणसाला निसर्गाशी संवाद साधायला वेळ नाही. आपल्या आलिशान अन् प्रशस्त घराच्या छताला त्याने चंद्रतारे लटकवले आहेत. आख्खं आभाळ आपल्या खिडकीच्या चौकटीत बंदिस्त केलंय अन् वृक्षांचं बोनसाय करून पर्वतावरील दूरची रम्यता' जवळ केलीय. कलावंताचं हृदय असणारा अत्यंत सामान्य माणूस मात्र एखाद्या टेकडीच्या टोकावर थिजलेलं, आकाशातून पडलेलं रक्तबीज बुब्बुळात साठवतो. सोनेरी कणांच्या गालिच्यावर अलगद पावलं टाकत निरव शांततेत क्षितिजासह स्वत:ला डुबवतो. तर कोणी दऱ्याखोऱ्यात, रानावनात भणंग भटकंती करतो मनमुराद! कोणी त्याला छंद म्हणतो, कोणी वेडेपणा! हाच वेडेपणा सामान्याला असामान्य बनवतो. त्याला स्वत:ची ओळख मिळते, स्वत:चा शोध लागतो. तो सामान्यांच्या समाजरंगात रंगूनही वेगळा राहतो. असाच वेडेपणा श्री. रमेश देसाई यांनी केलाय. जे दिसलं ते टिपलं, असं हे छायाचित्रण नव्हे. विषय-वस्तूशी तादात्म्य साधून जो विशिष्ट क्षण छायाचित्रकार टिपतो, त्या क्षणाच्या प्रतीक्षेसाठी त्याला खूप संयम आणि धीर धरावा लागतो. श्री. देसाई धबधब्याचं रासवट सौंदर्य अन् घनगंभीर स्वर आपल्या डोळ्यात, कानात, साठवतात; जमिनीकडे झेपावणाऱ्या प्रत्येक धबधब्याची अदाकारी अनुभवतात. धबधब्यात भिजण्याचा आनंद तेही घेतात. परंतु ते तिथे जातात ते त्या धबधब्याला भेटण्यासाठी. अनुभवतात ते कलात्मक झिंग, भव्य सौंदर्य आपल्या फ्रेममध्ये भरून ! महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश अशा भौगौलिक विविधतेतील काही अज्ञात पावसाळी सौंदर्यस्थळं श्री. देसाई यांनी टिपली आहेत. हे छायाचित्रण करताना त्यांचं कवि-कलावंत मन निसर्गाच्या विद्रूपीकरणानं विदीर्ण झालंय, त्यांनी पावसाळी सहलप्रेमींना अनेक दालनं उघडी केली आहेत; त्यांचं आवाहनही सहलप्रेमींनी लक्षात ठेवायला हवंय. सुधीर शालिनी ब्रह्मे
All BooksMaharashtratil Dhabdhabe | महाराष्ट्रातील धबधबे
₹700.00Original price was: ₹700.00.₹525.00Current price is: ₹525.00. Save ₹175 Add to cart -
Sale! Add to cartरशियाच्या स्टॅलिनच्या जुलमी राजवटीचा काळ. कामधंद्यानिमित्त रशियात राहिलेल्या परदेशी नागरिकांवरही अनन्वित अत्याचारांची आवळमिठी. स्लाव्होमिर राविझ हा असाच 24 वर्षांचा निरपराध पोलिश लेफ्टनंट. १९३९ साली रशियन गुप्तहेरांनी त्याला हेरगिरीच्या आरोपावरून २५ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. त्याची रवानगी झाली उत्तर सैबेरियातल्या एका तुरुंग तळावर. मग त्यानं आपल्याचसारखे ६ सवंगडी जमवले आणि पलायन केलं. गोबीचं वाळवंट, तिबेट आणि हिमालय पार करीत ४ooo मैल अंतर काटून ते भारतात आले. सगळेजण नव्हे. पण वाचलेल्यांत स्लाव्होमिर होता. या निरपराध युद्धकैद्यांची सपशेल खोटी वाटावी अशी खरी पलायन-साहसकथा ! '
इतिहासMala Nisatlach Pahije | मला निसटलंच पाहिजे
₹170.00Original price was: ₹170.00.₹128.00Current price is: ₹128.00. Save ₹42 Add to cart -
Sale! Add to cartबाळ गंगाधर टिळक... भारतीयांच्या दृष्टीने 'लोकमान्य', तर ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या दृष्टीने 'राजद्रोही' ! टिळकांना नामोहरम करण्यासाठी 'राजद्रोही' ठरवणे आवश्यक होते; परंतु होते तितकेच अवघड ! न्यायबुध्दीचा टेंभा मिरवणा-या परक्या राज्यकर्त्यांनी त्यासाठी जंग-जंग पछाडले. त्या संघर्षात पणाला लागले, ते लोकमान्य टिळकांचे वकिली कौशल्य... आणि तरीही शिक्षा झालीच. सहा वर्षे तुरुंगवास. टिळकांनी ती शिक्षाही स्वीकारली - धीरोदात्तपणे. त्यातूनच जन्माला आला - गीतारहस्य हा ग्रंथराज. शंभर वर्षांपूर्वीचा हा सारा इतिहास पुन्हा पिंजून उभी केलेली एका राष्ट्रभक्ताची संघर्षगाथा. आजही तेवढीच प्रेरणादायी...!
इतिहासMandalecha Rajbandi | मंडालेचा राजबंदी
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cart१९५५ नंतरचा अफगाणिस्तान. संधिसाधू अफगाण्यांनी रशियाला आत घेतलं. रशियाला हुसकावण्यासाठी अमेरिका अफगाणिस्तानात घुसलीच. दोन महासत्तांचा जोरदार सामना अफगाणिस्तानच्या भूमीवर सुरू झाला. यातून उदय झाला हिंस्र तालिबानींचा. या धुमश्चक्रीत होरपळली अफगाणिस्तानची जनता. अगदी दारुण ससेहोलपट झाली अफगाण स्त्रियांची. या बलाढ्य षड्यंत्राविरुद्ध उभी राहिली विशीतली तरुणी मीना ! तिनं या बलाढ्य सत्तांविरुद्ध जागृतीचं भूमीगत कार्य उभारलं. तिच्या भोवती जमल्या नवरा-बाप-भाऊ-मुलगा गमावलेल्या अनेक स्त्रिया. तिनं उभी केली संघटना. पण तिसाव्या वर्षी मीना चा दुर्दैवी अंत झाला. तिची ही चरित्रगाथा जिवाला चटका लावणारी !
इतिहासMeena : Afganmukticha Akrosh | मीना : अफगाणमुक्तीचा आक्रोश
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart१९६२. चीनबरोबरच्या त्या वर्षीच्या युद्धात आपला दारुण पराभव झाला. तो पराभव विसरण्यातच आपण आजवर धन्यता मानली. त्या तंद्रीतून आपल्याला हलवून जागे करणारे हे पुस्तक आहे. बर्फाचे तट पेटून उठले होते, तेव्हा सुभेदार जोगिंदरसिंगांनी किंवा मेजर शैतानसिंगांनी हौतात्म्याचे पलिते पेटवले होते. त्यांच्या स्फूर्तिदायक कथा सांगणारे हे पुस्तक आहे. नेहरू-मेनन यांच्या भोळ्याभाबड्या, स्वप्नाळू राजकारणाला गाफील हेरयंत्रणेच्या अवास्तव अंदाजामुळे खतपाणी घातले गेले होते. त्या हिमालयीन घोडचुकीचा तपशील मांडणारे हे पुस्तक आहे. जुनाट शस्त्रास्त्रे, अपुरी रसद, राणा भीमदेवी व्यूहरचना यांच्याइतकाच कौल-थापर-पलित यांच्यासारख्या लष्करी अधिकार् यांमधील बेबनावही पराभवाला जबाबदार होता. हेंडरसन-ब्रूक्स समितीच्या अतिगोपनीय अहवालाचा हा निष्कर्ष प्रकाशझोतात आणणारे हे पुस्तक आहे.
इतिहासNa Sangnyajogi Goshta | न सांगण्याजोगी गोष्ट
₹480.00Original price was: ₹480.00.₹360.00Current price is: ₹360.00. Save ₹120 Add to cart -
Sale! Add to cartनाझी भस्मासुराच्या उदयास्ताचा इतिहास सांगण्याची आवश्यकता अशाकरिता आहे की, या पर्वातील विलक्षण घटनांची ओळख सर्वांनाच झाली पाहिजे. लोकशाही मृत्युशय्येवर कशी जाते ? हुकुमशहा सत्तेवर कसे येतात? राजकारणातले यश नेहमीच डागाळलेले का असते? युद्धाने प्रश्न सुटतात का? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या इतिहासाची मदत होईल.
इतिहासNazi Bhasmasuracha Udayast | नाझी भस्मासुराचा उदयास्त
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cart'जवाहरलाल नेहरू. गरीब, अर्धशिक्षित, धर्मपरायण देशाचे धनाढय, उच्चविद्याविभूषित, निरीश्वरवादी पंतप्रधान. नेहरू म्हणजे एक विलक्षण रसायन. आधुनिकतेची आस, परंपरांबद्दल आस्था. मायभूमीवर निस्सीम प्रेम, इतर राष्ट्रांच्याही भल्याची आच. भावुक अन् उमदे. कविमनाचे अन् साहित्यिक पिंडाचे. बुध्दिप्रामाण्यवादी अन् वैज्ञानिक प्रगतीची ओढ असलेले. अलिप्त राष्ट्रांची चळवळ, पंचशील तत्त्वे, सुनियोजित विकासप्रकल्प, औद्योगिकीकरणाचा मजबूत पाया असे भरीव कार्य करणारे नेहरू; पण त्यांनी काश्मीर-प्रश्न राष्ट्रसंघात नेऊन देशाला एक भळभळती जखम करून ठेवली. चीनवर भाबडा विश्वास टाकून देश युध्दाच्या खाईत लोटला. नेहरूंवर अलोट प्रेम करणारी जनताही त्यांच्या या चुका नजरेआड करू शकत नाही. अनेक रसायनांच्या मिश्रणाने बनलेल्या या नवभारताच्या शिल्पकाराचे एम. जे. अकबर लिखित चरित्र आता मराठीत.
इतिहासNehru : Navbharatache Shilpakar | नेहरू : नवभारताचे शिल्पकार
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart
Skip to content