इतिहास
-
All Books
Chanakya Chandragupta Ashok – Tridhara – Takshahila -Pataliputra Zanzavat | चाणक्य चंद्रगुप्त अशोक – त्रिधारा – तक्षशिला-पाटलीपुत्र झंझावात
₹425.00Original price was: ₹425.00.₹319.00Current price is: ₹319.00. Save ₹106 Add to cart -
Sale! Add to cartकंपनी सरकार म्हणजे इंग्लंडमधील ईस्ट इंडिया कंपनीच्या महाराष्ट्रातील प्रवेशाचा, राजकीय सत्ता काबीज करण्याचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला हादरे देण्याच्या कारवायांचा इतिहास इंग्रजांनी कंपनीच्या रूपाने, महाराष्ट्राच्या पश्चिम किना-यावर आपले प्रथम पाय टेकले, पण शिवशाहीत त्यांना किना-यावरच रोखले गेले. नंतरच्या काळात, प्रथम आपले त्यांनी स्थान उत्तर भारतात बळकट करून महाराष्ट्रात हातपाय पसरण्यास प्रारंभ केला. मराठ्यांचे शत्रू हेरून त्यांना आपले मित्र बनविले. पानिपताच्या दारूण पराभवानंतर, मराठी मुलखात सुरू झालेले गृहकलह, सरदारांच्या प्रभावामुळे दुभंगत चाललेली मराठी सत्ता, विकलांग झालेली दिल्लीचा पातशाही, या सर्व राजकीय अस्थिरतेचा फायदा उठवून, कंपनीने हिंदुस्थानच्या राजकारणाची सूत्रे, हातात घेतली. १८१८ ते १८५७ या सुमारे चाळीस वर्षांच्या काळात महाराष्ट्रात कंपनीचा अंमल होता. १८५७ च्या उठावानंतर सारा देशच इंग्रजांनी बळकावला आणि या उपखंडात वसाहतीचे राज्य निर्माण झाले. अशी होती शिवशाही आणि पुण्याचे पेशवे या महाराष्ट्राचा पूर्वरंग या मालेतील कंपनी सरकार म्हणजे महाराष्ट्राला मिळालेला शाप की वरदान याचा अल्पसा विचार करून हा शेवटचा भाग सादर करून या मालेला पूर्णविराम दिला आहे.
इतिहासCompany Sarkar (East India Company) | कंपनी सरकार (ईस्ट इंडिया कंपनी)
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartरणरंगात न्हालेल्या धगधगत्या नंदनवनाची क्षात्रधर्मी कथा १९४७ साली भारतात जसे स्वातंत्र्याचे वरदान लाभले, तसाच विभाजनाचा शापही मिळाला. त्या शापाची बोच कमी होती म्हणून की काय, नवोदित पाकिस्तानने जम्मू काश्मीर बळकावण्याचा खुनशी डाव भारताला सशस्त्र संघर्षात खेचले. त्या सीमावर्ती संस्थानाने अगतिक होऊन स्वसंरक्षणार्थ भारताकडे धाव घेतली. विलीनीकरणाची संवैधानिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर भारताने आक्रमकांना मागे रेटण्यासाठी लष्करी मोहीम आरंभली. ती अंशतः यशस्वी झालेली असतानाच युध्बंदी करार झाला. ते युध्द थांबले, पण संघर्ष शमला नाही. तो जीवघेणा संघर्ष आजतागायत चालूच आहे, त्याचे स्वरूप बदलले आहे, विस्तारले आहे. दोन्ही देशांच्या अस्तित्वाचा तात्त्विक मूलाधार ठरलेल्या जम्मू- काश्मीरच्या भूमीवर चार युध्दे खेळली जाऊनही खरीखुरी शांतता दृष्टिपथातही येऊ शकलेली नाही. पाकिस्तानने पुकारलेल्या परभारी युध्दाचा रंगही बदलत, अधिक गडदगहिरा होत चालला आहे. दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या या समस्येचा अत्यंत मूलगामी वेध घेणारा ग्रंथ म्हणजेच डोमेल ते कारगिल ! पाकिस्तानने फंदफितूरीने डोमेल ही पहिली सीमावर्ती चौकी बळकावली, तेव्हापासून सुरू झालेल्या आणि भारतीय सेनादलांनी अतुलनीय पराक्रम गाजवून पाक घुसखोरांपासून कारगिलचा टापू मुक्त केला, तोपर्यंत(किंबहुना त्यानंतरही) चालूच राहिलेल्या एका रौद्रभीषण संघर्षाची ही रोमांचक कथा आहे. इतिहास घडवणा-या भूगोलाचे, रणांगणावरच्या लहानमोठ्या मोहिमांचे, उभय पक्षांच्या व्यूहरचनेतल्या डाव-प्रतिडावांचे, प्रतिकूल निसर्गावर मात करणा-या जिद्दी सैनिकांच्या बलिदानी पराक्रमाचे तपशीलवार विवेचन हे तर या ग्रंथाचे ठळक वैशिष्टय आहेच; पण प्रतिशोधाच्या भावनेने पेटून उठलेल्या पाकिस्तानने गेली दहा-बारा वर्षे जे परभारी युध्द पुकारले आहे, त्याचे मर्मभेदी विश्लेषण हेसुध्दा या ग्रंथाचे तितकेच महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. नंदनवनातील राजकीय-सामाजिक परिस्थितीचे, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजनैतिक हालचालींचे बदलते रंगही नेमकेपणाने टिपणारा हा ग्रंथ काश्मीर समस्येबद्दलचे सर्व वाचकांचे आकलन समृध्द करील, यात शंकाच नाही. सूर्यकुलाचा दिव्य वारसा सांगणा-या लढवय्या लेखकाचा हा पहिलाच ग्रंथ युध्दविषयक मराठी साहित्याचे दालन समृध्द करणारा ठरावा, अशाच तोलामोलाचा आहे.
इतिहासDomel Te Kargil | डोमेल ते कारगिल
₹425.00Original price was: ₹425.00.₹319.00Current price is: ₹319.00. Save ₹106 Add to cart -
Sale! Add to cartप्रा. शेषराव मोरे हे १९८० नंतर महाराष्ट्रात उदय पावलेल्या महत्त्वाच्या विचारवंतांपैकी एक होत. त्यांची मते कुणाला पटोत वा न पटोत, पण कुठल्याही प्रश्नावर लिहिताना त्या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाणे, परिश्रमपूर्वक संदर्भ गोळा करणे, त्या विचारांची संगती लावणे व त्यानंतर लेखनाला सुरवात करणे अशी एक शिस्त त्यांच्या लेखनाला आहे. त्यांची मते पटली नाहीत, तरी ती केवळ प्रतिक्रिया व्यक्त करून वा शेरेबाजी करून खोडून काढता येत नाहीत... "चिकित्सक लेखनाला जे मोकळे वातावरण हवे, ते हळूहळू संपत चालले आहे आणि चिकित्सेच्या नावाखाली काही राजकीय पक्षाची सोय होईल अशा भाडोत्री विचारवंतांचे लेखन सध्या प्रतिष्ठा पावू लागले आहे... फुले- आंबेडकरवाद बदनाम करावा किंवा विपर्यस्त स्वरूपात तो मांडावा ह्याचे पध्दतशीर प्रयत्न चालू आहेत. शौरी यांचे लेखन या स्वरूपाचे आहे... अशा अवस्थेत शौरीसारख्यांच्या हाती आणखी काही चुकीचे पुरावे आंबेडकर अनुयायांच्या उदासीन वृत्तीमुळे जाऊ नयेत, याची काळजी बाबासाहेबांच्या अनुयायांनी घेणे भाग आहे, असे प्रा. मोरे यांना अतिशय तीव्रतेने वाटले... केवळ एक सावरकरवादी विचारवंताचे हे लेखन आहे या एकाच कारणासाठी या गंभीर मुद्दयाकडे दुर्लक्ष होऊ नये.. "डॉ. आंबेडकरांच्या उपलब्ध असलेल्या सर्व ग्रंथसंपदेचा एकत्रित स्वरूपात विश्लेषक असा परिचय या पुस्तकात आहे. पण हा ग्रंथ म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या संपूर्ण विचारांची चिकित्सा नव्हे किंवा ग्रंथांची समीक्षा नव्हे !... महापुरुषाच्या लेखन- उक्तीत अनेक प्रसंगी अंतर्विरोधही दिसून येतो, हा अंतर्विरोध दाखवून देत आंबेडकरी विचारांची संगती वाचकांसमोर ठेवणे हा या ग्रंथाचा हेतू आहे... डॉ. आंबेडकरांच्या लेखनात व्यक्त झालेले बदल वा अंतर्विरोध हे त्यांच्या कार्यक्रमाधिष्ठित प्रवासाशी कसे सुसंगत आहेत, त्याचाही अन्वय या ग्रंथात आहे... अतिशय निकोप मनाने या ग्रंथाचे स्वागत करायला हवे... योग्य दिशेनेच दखल घेतली जावी.' - दत्ता भगत
इतिहासDr. Ambedkaranchya Samajik Dhornatil Parivartane | डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक धोरणातील परिवर्तने
₹700.00Original price was: ₹700.00.₹525.00Current price is: ₹525.00. Save ₹175 Add to cart -
Sale! Add to cartसा-या जगाची झोप उडवणा-या भावी महासत्तेची उण्यापु-या अर्ध शतकाची चित्तथरारक कथा. स्वाभिमानाने सजलेली, रक्ताने माखलेली !
इतिहासDragan Jaga Zalyavar (Lokawrutti) | ड्रॅगन जागा झाल्यावर (लोकआवृत्ती)
₹425.00Original price was: ₹425.00.₹319.00Current price is: ₹319.00. Save ₹106 Add to cart -
Sale! Add to cartपानिपत ही मराठयांच्या इतिहासातील भळभळती जखम. दिल्लीवर जरीपटका फडकवण्याचे स्वप्न पानिपतच्या पराभवामुळे धुळीला मिळाले. मराठयांची उत्तरेकडील घोडदौड थांबली. मात्र पानिपतच्या पराभवाचे तरंग दक्षिणेतही उमटल्यावाचून राहिले नाहीत. मराठयांच्या पराभवाची वार्ता कळताच हैदर अली, निजाम यांना स्फुरण चढले व ते अधिक त्वेषाने मराठयांविरुध्द एकत्र आले. त्याचवेळी दक्षिणेत मोगलांना जिवाच्या कराराने रोखून धरणा-या मराठा सरदारांकडे पानिपतच्या मन्वंतरानंतर पुणे, सातारा व कोल्हापूर या तिन्ही मराठा सत्ताकेंद्रांचे दुर्लक्ष होऊ लागले. तरीसुध्दा तंजावरपर्यंत पसरलेल्या मराठयांनी स्वबळावर हैदर अली, निजाम, इंग्रज आणि पाँडेचरीतील फ्रेंच यांच्याशी झुंज देणे सुरूच ठेवले. या चारही आक्रमकांना जिवात जीव असेपर्यंत तोंड देऊन दक्षिणेतील गुत्तीचे राज्य मराठयांच्या हातून सुटू नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारे मुरारीराव घोरपडे हे शेवटचे मराठा सेनापती. हैदरच्या विरोधात त्यांनी दिलेली एकाकी झुंज हा मराठयांच्या शौर्याचा, अतुलनीय घोडदळाचा व त्याचवेळी आपसातील दुफळीचा, फंदफितुरीचा आणि मराठा सत्ताकेंद्रांनी अवलंबलेल्या चुकीच्या धोरणांचा दाखलाच म्हणता येईल.
इतिहासEk Zunj Sharthichi | एक झुंज शर्थीची
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
इतिहास
Fidel Che Aani Kranti | फिडेल, चे आणि क्रांती
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cart'गांधी या माणसात अशी काही चुंबकीय शक्ती होती, की राजबिंडे, देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेले नसतानाही भलेभले त्यांना भेटताक्षणीच त्यांच्या प्रेमात पडत. गांधीजी पहिल्याच भेटीत आपल्याला कसे दिसले, याचे मनमोकळे वर्णन असंख्य देशीविदेशी मान्यवरांनी करून ठेवले आहे. चार्ली चॅप्लिन, रोमँ रोलाँ, लुई फिशर, एडगर स्नो, विल्यम शिरर... सरोजिनी नायडू, विनोबा भावे, आचार्य कृपलानी, निर्मल कुमार बोस, राजेंद्र प्रसाद... अशा पन्नास नामवंतांचा या मांदियाळीत समावेश आहे. अशा वेधक उता-यांचे अनोखे संकलन गांधी प्रथम त्यांस पाहता...
इतिहासGandhi: Pratham Tyas Pahata | गांधी : प्रथम त्यांस पाहता…
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart' स्वातंत्र्यवीरांची मृत्यूनंतरही विटंबना केलीच पाहिजे का? - नरहर कुरुंदकर सावरकरांना न्यायालयाने गांधीहत्येच्या आरोपातून पूर्णपणे निर्दोष ठरविले असताही गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांना बदनाम करण्याची मोहीम कशी चालू आहे? त्यांच्याविरुद्ध न्यायालयात पुरावा तरी कोणता होता? गांधीहत्येनंतर वीस वर्षांनी नियुक्त झालेला कपूर आयोग हा न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी होता काय ? अहवालात आयोगाने सावरकरांना दोषी धरणारे अधिकारबाह्य मतप्रदर्शन कसे केले ? आयोगासमोर कोणता नवा पुरावा तरी आला होता काय ? मुंबई व दिल्ली पोलिसांनी बनावट कागदपत्रे कशी तयार केली होती ? सावरकरांचे गांधीजी, काँग्रेस व नेहरूंचे सरकार यांच्याशी संबंध कसे होते ? शेवटच्या काळात गोडसे सावरकरांच्या विरोधी का झाला होता ? गांधीहत्येमुळे सावरकरवादावर होणाऱ्या विपरीत व आत्मघातक परिणामाचा विचार तरी सावरकरांनी केला असेल की नाही ? - अशा सर्व प्रश्नांचा कायदा, वास्तव, तर्क व न्यायबुद्धी यांच्या आधारे अभ्यासपूर्ण चिकित्सा करणारा ग्रंथ.
इतिहासGandhihatya Aani Savarkaranchi Badnami | गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी
₹425.00Original price was: ₹425.00.₹319.00Current price is: ₹319.00. Save ₹106 Add to cart -
Sale! Add to cart'महात्मा गांधी हे विसाव्या शतकातील एक लोकोत्तर नेते होते. जगातील एका बलाढय साम्राज्याला नामोहरम करताना त्यांनी अहिंसात्मक सत्याग्रहाचे अभिनव साधन वापरले. त्या साधनाची महती जगभर पसरली. त्यांच्या जीवनातून अनेकांना नवी प्रेरणा मिळाली'... हे सारे काही आपण ऐकून असतो; पण याबद्दलचा महत्त्वाचा तपशील मात्र आपल्याला ठाऊक नसतो. नेमका तो तपशील पुरवणारे हे पुस्तक... गांधीजींच्या असामान्य नेतृत्वगुणांची ते मीमांसाही करते, त्या गुणांमुळे मिळालेल्या यशाची कथाही सांगते आणि देशोदेशीच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वावर गांधीजींच्या विभूतिमत्त्वाचा कसा, कोणता प्रभाव पडला, याचे सविस्तर, सोदाहरण विवेचनही करते. अनेक देशीविदेशी भाषांमध्ये अनुवादित झालेले हे पुस्तक आता मराठी वाचकांच्या भेटीला...
इतिहासGandhijinche Asamanya Netrutva | गांधीजींचे असामान्य नेतृत्व
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart
Skip to content

