-
Sale! Add to cartस्त्रीस्वातंत्र्यवादिनी : स्त्रीस्वातंत्र्य' म्हणजे नेमके काय? हा विचार महाराष्ट्रात रुजवला कोणी? तो जोरावला का आणि कसा? या विचारांत पुरुषवर्गाचे योगदान काय? या विचारप्रणालीचे भवितव्य काय? स्त्री मनातील आशा-निराशांच्या, सुखदुःखांच्या स्पंदनांची अक्षर नोंद घेणा-या, कार्यकर्त्या-लेखिका कृष्णाबाई मोटे, मालतीबाई बेडेकर, शकुंतला परांजपे, गीता साने, यांच्या साहित्याचा आढावा घेऊन, विसाव्या शतकातील स्त्रीस्वातंत्र्याचा' प्रवास दाखवणारे विनया खडपेकरांचे हे पुस्तक! या चार लेखिकांच्या प्रत्यक्ष मुलाखतींमुळे अनुभवश्रीमंत झालेले पुस्तक !
All BooksStri-Svatantryavadini | स्त्री-स्वातंत्र्यवादिनी
₹400.00Original price was: ₹400.00.₹280.00Current price is: ₹280.00. Save ₹120 Add to cart -
Sale! Add to cart'यासर अराफतच्या निवडक तुकडीतला नेमबाज जवान. पॅलेस्टाईनच्या मुक्तीसाठी शिर तळहातावर घेऊन लढणारा. माणसं टिपणं, हत्या करणं, चकमकी, लढाईची धुमश्चक्री हेच त्याचं आयुष्य बनलेलं. अचानक एक दिवस त्याच्या कानी पडली येशूची मानवतावादी शिकवण आणि मनात रुजलं करुणेचं रोपटं. हिंसेच्या, रक्तपाताच्या रस्त्यानं चालणारी पावलं आता सलोख्याच्या, शांततेच्या, मैत्रीच्या अन् समन्वयाच्या वाटेनं चालू लागली. आयुष्याचा अर्थच बदलणा-या या अवघड प्रवासाची सत्यकथा.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSudakadun Karunekade | सुडाकडून करुणेकडे
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartआपली मुलं मोठी व्हावीत, चांगली व्हावीत, यशस्वी व्हावीत... असं कुठल्या पालकांना वाटत नाही ? पण हे साधायचं कसं, हा आजच्या पालकांपुढचा प्रश्न आहे. जग झपाटयानं बदलतं आहे, जीवनशैली बदलते आहे. टीव्ही, कॉम्प्यूटर, इंटरनेट, मोबाईल... अशा माध्यमांच्या प्रभावात आणि वाढत्या स्पर्धेच्या ताण-तणावात वाढणा-या आजच्या मुलांवर संस्कार तरी कसे आणि कुठले करायचे ? आजची मुलं ऐकतच नसतील, तर त्यांना शिस्त तरी कशी लावायची ? त्याहीपुढे जाऊन पोटच्या पोरांना प्रेम देण्याइतकी फुरसतही आज पालकांकडे नसेल, तर...? पालक असणं वेगळं आणि पालक होणं वेगळं ! पालक 'होणं' हे एक 'घडणं' असतं. आजच्या काळात पालक 'होणं' म्हणजेच 'सुजाण पालक' होणं. दिवसेंदिवस आव्हानात्मक होत चाललेलं पालकत्व पेलत असतानाच, पालक असण्यातला आनंदही अनुभवता येणं म्हणजे 'सुजाण पालक' होणं ! 'सुजाण पालकत्वाचा' हा मंत्र सुलभ शैलीत उलगडून सांगणारं हे मराठीतलं अद्ययावत असं 'गाईड' पालकांच्या संग्रही असायलाच हवं. पूर्वीच झालेल्या किंवा होऊ घातलेल्या... सर्वांच्याच !
मार्गदर्शनपरSujan Palak Vhava Kasa? | सुजाण पालक व्हावं कसं?
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart -
Sale! Add to cartज्या संस्कृतीत लहानपणापासून 'एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे' असे घोटून गिरवले जाते, तेथे दु:खाचे उदात्तीकरण होणे व सुखाला तुच्छ लेखले जाणे स्वाभाविकच आहे. सुखाची आकांक्षा ठेवण्यात काहीतरी आत्मिक व नैतिक अवनती आहे, असे सतत मनावर बिंबवले जात असल्यामुळे दु:खी माणूस उगाचच सुखी माणसाला कमी लेखतो. The Conquest of Happiness या पुस्तकातून थोर तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल पटवून देतात की, दु:खी राहण्यात निसर्गत: काहीही श्रेष्ठत्व दडलेले नाही. प्राप्त परिस्थितीत जो जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो, तो खरा सुज्ञ. हे पुस्तक एक आश्वासन देते की, सात्त्विक सुख अप्राप्य नाही. दंतकथेत सांगतात, तेवढा सुखी माणसाचा सदरा दुर्मिळ नाही. हाती आलेल्या धाग्यांमधून प्रत्येक माणूस असा सदरा विणू शकतो. पण तो स्वत:चा स्वत:ला विणावा लागतो. विणकरात, हंसाचा नीर-क्षीर विवेक व गवळण पक्ष्याची जिद्द मात्र हवी.
तत्वज्ञान / व / धर्मSukhi Mansacha Sadara | सुखी माणसाचा सदरा
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartस्त्रीत्व कसं असेल, तिच्या अलवार मनाला काय भावत असेल, तिचं हळुवार व्यक्त होणं कसं असेल, तर सुमनताईंसारखं..!प्रेमळ, समजूतदार, हळवं, शांत, समर्पित... शांतपणे तेवणारा नंदादीपच जणू. कोवळ्या नाजूक फुलांचा मंद सुगंध, पावसाची हलकीशी सर, झाडाची कोवळी पालवी, पानांवरील निर्मळ दवबिंदू किती उपमा द्याव्यात या आवाजाच्या व्यक्तिमत्त्वाला ? त्यानं आपलं असं एक स्थान निर्माण केलं. पौर्णिमेच्या शीतल चांदण्याला जर स्वतःचा आवाज मिळाला तर किती मधुर असेल तो? तरल, सुरेल, वत्सल, शुद्ध उच्चारांचं लेणं लाभलेला, उत्तम पल्ला नि फिरत असणारा, तरी अत्यंत भावपूर्ण... सुमन कल्याणपूर यांच्या मराठी व हिंदी गाण्यातल्या सांगीतिक वैशिष्ट्यांचा स्मरणीय आढावा आणि त्यांच्या निकोपआवाजातल्या निवडक २५ गाण्यांचं रसग्रहण, प्रसिद्ध गायिका अपर्णा संत यांच्या शब्दात...
All BooksSuman Kalyanpur | सुमन कल्याणपूर
₹200.00Original price was: ₹200.00.₹140.00Current price is: ₹140.00. Save ₹60 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreसुनीताबाई देशपांडे आधुनिक महाराष्ट्रामधलं एक बहुचर्चित व्यक्तिमत्त्व सर्वाधिक लोकप्रिय लेखकाची पत्नी स्वतंत्रपणे लक्षणीय लेखिका वत्सल कुटुंबिनी कर्तव्यकठोर विश्वस्त काव्यप्रेमी रसिक परखड समाज हितचिंतक आप्तेष्टांच्या आठवणींचा आणि स्वत: सुनीताबाईंच्या लेखनाचा आधार घेऊन केलेली ही स्मरणयात्रा. काही संस्मरणं नुसती रंजक नसतात, प्रेरक आणि वेगवेगळया अर्थांनी उदबोधकही ठरू शकतात. सुनीताबाई
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSunitabai | सुनीताबाई
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Read more -
Sale! Add to cartSpaceship landed on Mars and gave Sunny a brainwave. He made a spacecraft. Did he really travel to the Sun? How did Jayesh celebrate his mom's birthday ? Shweta got info on butterflies. How? Five engaging short stories of young and bright children like you... Sunny's Sun Safari
All BooksSunny’S Sun Safari | Sunny’s Sun Safari
₹60.00Original price was: ₹60.00.₹42.00Current price is: ₹42.00. Save ₹18 Add to cart -
Sale! Add to cartवाचता न येणा-या छोट्यांना मोठयांनी वाचून दाखवावीत आणि वाचता येणा-या छोटयांनी स्वतःच वाचावीत अशी पुस्तकं (४ ते ७ वर्षे वयोगटासाठी)
बालसाहित्यSuperbaba Ani Itar Katha | सुपरबाबा व इतर कथा
₹60.00Original price was: ₹60.00.₹45.00Current price is: ₹45.00. Save ₹15 Add to cart -
Sale! Add to cartगानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी या जयपूर अत्रौली घराण्याचा घरंदाज वारसा जपणा-या गायिका. या घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादिया खाँसाहेब यांच्या सहवासात गाणं शिकण्याची संधी धोंडूताईंना लाभली. या घराण्याचे चार मातब्बर कलाकार उस्ताद भुर्जी खाँसाहेब, लक्ष्मीबाई जाधव आणि ख्याल गायकीच्या अनभिषिक्त सम्राज्ञी केसरबाई केरकर धोंडूताईना गुरू म्हणून लाभले. संगीताच्या क्षेत्रात घराणी हवीत कशाला ? असे सूर उमटत असतानाच्या काळात घराणी हवीतच असा बाणा जपणा-या आणि जयपूर गायकीची विशुद्ध परंपरा सर्वस्व पणाला लावून पुढे चालवणा-या धोंडूताईंनी त्यांच्या गुरूंविषयी आणि सागीतिक कारकीर्दीविषयी सांगितलेल्या आठवणी म्हणजेच - सूर-संगत
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSur-Sangat | सूर-संगत
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartलताचा आवाज पल्याडच्या' दुनियेशी आपलं नातं जोडील अशा विलक्षण मधुर ताकदीचा होता. संगीत हे परमेश्वरापर्यंत पोहोचायचं साधन असेल, तर त्या प्रवासाला स्वत:च्या आवाजाचा मखमली रस्ता दिला, तो लताबाईंनी. पायांखाली सतरंजी असायचीसुद्धा ऐपत नसणार् यांच्या पायांखाली गुलाबाच्या पाकळ्या अंथरल्या, त्या लताच्या आवाजानं, तिच्या सुरांनी. एकेका स्वराचा, लयीचा, तालाचा आनंद घेत आणि मुक्तहस्तांनी आनंद वाटून देत आली लताची गाणी.. राग, अनुराग, प्रणय, मीलन, विरह, रुसवा, वंचना, निराशा, पश्चाताप, वात्सल्य, हर्ष, खेद... अशा अनंत भावछटांना लताच्या आवाजानं मूर्तरूप दिलं. या दैवी आवाजाची ना कुणाला व्याख्या करता आली, ना तो संगीताच्या कुठल्या गणिती मोजपट्टीत किंवा व्याकरणात बसवता आला. त्या अपूर्व स्वरलेण्याला ही विनम्र आदरांजली, लताबाईंच्याच निवडक पंचवीस गीतांच्या शब्द-सूर-अर्थ-आस्वादाच्या साथीने... -
All BooksSuranchi Samaradnee – Lata Mangeshkar | सुरांची सम्राज्ञी लता मंगेशकर
₹220.00Original price was: ₹220.00.₹154.00Current price is: ₹154.00. Save ₹66 Add to cart
Skip to content