राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: B-02-2016 Categories: , Brand:

Prakashvedh | प्रकाशवेध

Original price was: ₹300.00.Current price is: ₹210.00. Save ₹90

Availability: 25 in stock

'सर्वव्यापी आणि सर्वपरिचित अशा प्रकाशामागे कल्पना करता येणार नाही एवढे सखोल आणि विस्तृत विज्ञान दडलेले आहे. भौतिकशास्त्रातील अनेक क्रांतिकारक सिध्दांतांची गुरुकिल्ली प्रकाशाच्या अभ्यासातून सापडली. घरातील वीज, हातातील मोबाईल, दूरचित्रवाणीवरील प्रतिमा या सा-यांच्या स्वरूपात हे प्रकाशविज्ञान आता तर आपल्या रोजच्या आयुष्याला वेढून राहिले आहे. प्रकाशाशी निगडित विज्ञान-तंत्रज्ञानाचा हा व्यापक पट उलगडून

ठेवणारा सुबोध शैलीतील हा प्रकाशवेध वाचकांना नक्कीच उद्बोधक वाटेल. डॉ.आतिश दाभोलकर डिरेक्टर, नॅशनल सेंटर फॉर सायंटिफीक रिसर्च, पॅरीस आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक प्रकाशाने निरनिराळया संस्कृतींच्या आणि समाजांच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. अतिशय प्रभावीपणे पांढरा प्रकाश देणा-या एलईडीसारख्या अनेक नव्या शोधांमुळे यापुढेही प्रकाशाच्या साहाय्याने शाश्वत विकास साधता येईल. यामुळेच एकविसाव्या शतकात प्रकाशाबद्दल जाणून घेणे प्रत्येकाला अतिशय आवश्यक आहे. डॉ.माधवी ठाकूरदेसाई यांचे हे पुस्तक वाचकांना प्रकाशविज्ञान आणि प्रकाशतंत्रज्ञानाची समर्थपणे ओळख करून देणारे ठरेल, यात शंकाच नाही. डॉ.सिडने परकोविट्झ आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक आणि विज्ञान साहित्यिक

तपशील
ISBN : 978-81-7434-941-5
परिमाण : 21.25 × 15 × 2 cm
प्रकाशन तारीख : फेब्रुवारी 2016
बुक कोड : B-02-2016
वजन : 370 g
पाने : 248
आर्टिस्ट : शेखर गोडबोले
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : फेब्रुवारी Year

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
WhatsApp