विज्ञान
-
Sale! Add to cart'प्राण्यांना बुध्दिमत्ता असते का ? ते विचार करू शकतात का ? त्यांना मन असतं का ? भावना असतात का ? स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव असते का ? आत्मभान असतं का ? काही वेळा प्राण्यांची हुशारी बघून आपल्यावर आश्चर्यानं तोंडात बोट घालायची पाळी येते. कधी कधी तर ते अशा काही करामती करतात, की आपण चक्रावूनच जावं. हे सगळं ते उपजत प्रेरणेनं करतात की विचारपूर्वक ? माणसाच्या तुलनेत प्राण्यांची बुध्दिमत्ता कुठल्या पातळीवर असते ? मुळात बुध्दिमत्ता म्हणजे तरी काय ? मुंगीपासून ते हत्तीपर्यंत आणि चिलटापासून ते चिंपँझीपर्यंत अनेक प्राण्यांवर गेल्या पाचसहा वर्षांत वर्तनशास्त्र या विषयासंदर्भात प्रचंड संशोधन झालं आहे. त्या आधारे या प्रश्नांचा धांडोळा घेणारं हे पुस्तक. शास्त्रशुध्द पध्दतीनं, काटेकोर शब्दांत पण ललित अंगानं लिहिलेलं. खुसखुशीत भाषेत, भरपूर उदाहरणांच्या साहाय्यानं विषय सोपा करून सांगणारं. प्राण्यांबद्दल कुतूहल असणाऱ्या प्रत्येकानं वाचायलाच हवं, असं आगळंवेगळं पुस्तक.
विज्ञानAaple Buddhiman Soyare | आपले बुद्धिमान सोयरे
₹260.00Original price was: ₹260.00.₹195.00Current price is: ₹195.00. Save ₹65 Add to cart -
Sale! Add to cartविज्ञानाच्या झपाट्याने होणा-या प्रगतीने दिपून गेलेली मानवजात, विसाव्या शतकाच्या विश्वरुप-दर्शनाने भयचकीत झाली. विसाव्या शतकाने दिली दोन भीषण महायुद्ध आणि एकाहून एक संहारक अस्त्रांची निर्मिती ! या अस्त्रांच्या अविवेकी वापराने मानवजातीचं अस्तित्वच धोक्यात आलं. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर थबकलेल्या मानवजातीच्या वाट्याला, उंबरठा ओलांडल्यावर काय होणार आहे ? तिचा वारसा कोणता ? तिच्या स्वागताला कोण असणार आहे ? तिसरं महायुध्द, सद्दाम हुसेन, इथियोपिया, सोमालिया आणि बोस्नियातली रणधुमाळी की, पेनिसिलीनचं पेटंट घ्यायला नकार देणारे अलेक्झांडर फ्लेमिंग, गांधीजी यांच्यासारखे महात्मे ? उपासमार की देवदुर्लभ समृध्दी ? वि.गो.कुलकर्णी यांनी आपल्या चिंतनपर लेखनातून विसाव्या शतकातील विज्ञानाच्या प्रगतीचं, त्याच्या दुष्परिणामांचं विश्लेषण केलं आहे. त्याचबरोबर एकविसाव्या शतकाचं संभाव्य चित्रं रेखाटलं आहे.
विज्ञानAnokha Umbartha | अनोखा उंबरठा
₹60.00Original price was: ₹60.00.₹45.00Current price is: ₹45.00. Save ₹15 Add to cart -
Sale! Add to cartअण्वस्त्रं ही विनाशकारी, प्रलयंकारी आहेत हे आपण जाणतो. पण अण्वस्त्रांच्या चाचण्याही तितक्याच घातक आहेत हे आपल्याला ठाऊक नसतं. अणुवीज ही स्वच्छ, स्वस्त आणि सुरक्षित आहे या भूलथापेवर आपण भाबडेपणानं विश्वास ठेवतो ! उच्च तंत्रज्ञान , लष्करी गुपितं या सबबींखाली तुमच्या-आमच्या जिवांशी हा कसा खेळ चालला आहे आणि पुढे लाखो वर्षांसाठी आपण एक विषारी वारसा कसा निर्माण करून ठेवला आहे हे अणुवास्तव उघड करून दाखवणारं हे पुस्तक : समस्या केवळ दाखवून थांबवण्याऐवजी मुळाशी जाऊन त्या सोडवण्याचे मार्ग पुढे ठेवणारं ! अणू या विषयाचा सर्वांगीण म्हणता येईल इतका हा विविधांगी विचार.
विज्ञानAnuvivek | अणुविवेक
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartआपल्या मेंदूवर अवलंबून असते आपले वर्तन आणि आपल्या वर्तनाने आपला मेंदूही बदलू शकतो. मानवी वर्तन अनेक चलपदांवर (variables) आधारित असते. त्यातील सर्वांत महत्त्वाची चलपदे म्हणजे भावभावना. या अमूर्त भावभावना कोट्यवधी वर्षे उत्क्रांत झाल्या आहेत. अशा अमूर्त गोष्टींचा शोधविचार तत्त्वज्ञान, धर्म, ईश्वरशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य, कला या सर्वांनी केला आहे आणि करतही आहेत. अलीकडच्या काळात प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करून मानवी वर्तनावर प्रकाश टाकण्याचे काम विज्ञानानेही अंगावर घेतले आहे. विज्ञानाच्या या शाखेला वर्तनविज्ञान (Ethology) म्हणतात. जसजसा मेंदूविज्ञानाचा आणि त्याला पूरक व पोषक जैवतंत्रज्ञानाचा विकास होत गेला, तसतसा संशोधनाचा दिशाकोन बदलत गेला. मानवी भावभावनांची आणि पर्यायाने मानवी वर्तनाची पाळेमुळे मेंदूत असली पाहिजेत, या विज्ञानाच्या विचारधारेला बळकटी आली. मेंदूविज्ञानाबद्दल कुतूहल जागृत करणारे आपले वर्तन आपला मेंदू
All BooksApale Vartan-Apala Mendoo | आपला वर्तन आपला मेंदू
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartसामान्य स्फोटकं, अण्वस्त्रं, रासायनिक आणि जीवशास्त्रीय अस्त्रं यांचे शोध लावून आणि उपयोग करून माणसानं पृथ्वीच्या या सुंदर क्रीडांगणाचं भयंकर रणांगण केलं आहे! गेल्या शंभर वर्षातली माणसाच्या कार्यकतृत्वाची कहाणी प्रतिभावान पण परधर्जिण्या संशोधकांची, आपल्यापुरतं पाहणा-या स्पर्धांध शासनांची; संशोधनासाठी नव्यानं उभारलेल्या नगरींची आणि बाँबखाली चिरडून गेलेल्या हिरोशिमा-नागासाकी या नरकपुरींची; प्रत्यक्ष युध्दांची-कावेबाज कारस्थानांची; फसव्या वाटाघाटींची; तुटलेल्या स्नेहसंबंधांची; माणूस या अदभूत गोष्टीची. खरं म्हणजे तुम्हाआम्हा सगळयांची ! या काळोख्या कहाणीत आईनस्टाईन, लिओ झलार्ड, बर्ट्रांड रसेल, जोसेफ रोटब्लाट, मॅथ्यू मेसेलसन... अशी काही प्रकाशपानं आहेत. काळोखात काजळायचं की प्रकाशात उजळायचं, हे आपल्यालाच ठरवायचं आहे... वेळ थोडाच आहे... पण एक मार्गदर्शक मंत्र आहे- नो मोअर हिरोशिमाज् !
विज्ञानBarala Daha Kami | बाराला दहा कमी…!
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cart'ही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही. विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचा माणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावर काय परिणाम होईल, याचा वेध घेणारी रंजक तितकीच थक्क करणारी उत्कंठावर्धक तितकीच भयचकित अन् स्तिमित करणारी मालिका कालचे तंत्रज्ञान आज कालबाह्य ठरवणारा विज्ञानाचा भोवंडून टाकणारा वेग. मानवी जीवनाचा प्रत्येक पैलू व्यापून टाकणारे संगणक - विज्ञान अन् इंटरनेटचे महाजाल. सोपी अन् अवघड - सारीच कामे बिनचूक करणारे यंत्रमानव. ही सारी वाटचाल माणसाला, मानवतेला, संस्कृतीला कोणत्या दिशेला नेणार ? भविष्यवेध संगणक इंटरनेट यंत्रमानव
विज्ञानBhavishyavedh – Sanganak/Internet/Yantramanav | भविष्यवेध – संगणक / इंटरनेट / यंत्रमानव
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'ही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही. विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचा माणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावर काय परिणाम होईल, याचा वेध घेणारी रंजक तितकीच थक्क करणारी उत्कंठावर्धक तितकीच भयचकित अन् स्तिमित करणारी मालिका. माणसाच्या जन्माआधीपासून मृत्यूनंतरही त्याच्या शरीर-मनावर, बुध्दी अन् वर्तणुकीवर प्रभाव पाडण्याचे विलक्षण सामर्थ्य असणा-या भावी काळातील अचाट शोधांचा वेध. भविष्यवेध शरीरविज्ञान
विज्ञानBhavishyavedh – Sharirvidnyan | भविष्यवेध – शरीरविज्ञान
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'ही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही. विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचा माणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावर काय परिणाम होईल, याचा वेध घेणारी रंजक तितकीच थक्क करणारी उत्कंठावर्धक तितकीच भयचकित अन् स्तिमित करणारी मालिका. एका बाजूला नवी सुखे अन् नव्या संधी देणारे तंत्रज्ञान, नवी क्षितिजे धुंडाळणारी अवकाशयाने; तर दुसरीकडे अस्तित्वावरच आघात करू पाहणारी विनाशकारी अस्त्रे ! कोणत्या दिशेने घडणार मानवाचा प्रवास ? भविष्यवेध तंत्रज्ञान अवकाश युध्दशास्त्र
विज्ञानBhavishyavedh – Tantradnyan/Awkash/Yuddhashastra | भविष्यवेध – तंत्रज्ञान / अवकाश / युद्धशास्त्र
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartब्राह्मोस ! आपल्या लक्ष्यावर अचूक आघात करणारे, ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारे जगातले सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र. या क्षेपणास्त्राच्या विकास आणि निर्मितीचा भारत आणि रशिया यांच्या संयुक्त प्रयत्नांतून साकारलेला प्रकल्प म्हणजे 'ब्राह्मोस'! अज्ञात वाटेवरील संशोधनाचे हे साहस म्हणजे 'आपण हे करू शकतो' असा आत्मविश्वास जागवणारा पहिलावहिला अनुभव ! मर्यादित गुंतवणूक, व्यावसायिक व्यवस्थापन, गतिशील निर्णयप्रक्रिया, अनोखी कार्यपद्धती आणि पारदर्शी प्रामाणिकता यांच्या संयोगातून वास्तवात उतरलेले हे स्वप्न. या प्रकल्पातून जन्मलेले यशस्वी प्रारूप आत्मनिर्भर राष्ट्रनिर्मितीसाठी अन्य क्षेत्रांमध्येही उपयोगात आणता येईल. या प्रकल्पाची त्याच्या निर्माणकर्त्याने सांगितलेली जन्मकथा: वेधक तितकीच प्रेरकही !
पुरस्कार प्राप्त पुस्तकेBrahmos | ब्राह्मोस
₹375.00Original price was: ₹375.00.₹281.00Current price is: ₹281.00. Save ₹94 Add to cart -
Sale! Add to cartविश्व ही एक भव्य कलाकृती आहे. ते एक अलौकिक पण अमानवी नाट्य आहे. अशा या नेत्रदीपक नाट्याचा सूत्रधार कोण बरं असेल ? विश्व नावाच्या देदीप्यमान कलाकृतीचा कर्ता कोण ? विज्ञानाला या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीत. पण विश्वचं ओझरतं दर्शन मात्र विज्ञानाला झालं आहे. विश्व नावाच्या अदभुत कोड्याचा उलगडा हळूहळू होत आहे. महास्फोटातून आपलं हे अफाट विश्व जन्माला आलं. आणि अतिप्रचंड वेगानं ते विस्तारू लागलं. चार बलांचा आणि मूलकणांचा अगम्य खेळ म्हणजे हे अमर्याद विश्व हे विज्ञानाला उमगलं. विश्वाचं एकेक गूढ महतप्रयासानं उलगडू लागलं. विश्व सपाट आहे की वक्र ? ते बंद आहे की खुलं ? बिंदुवत् स्थितीनं विश्चावाचा अंत होईल ? की निरंतर विस्तारणारं विश्व विरून जाईल ? विश्वामधील मानवाचं आगमन ही नैसर्गिक घटना आहे. की मानवनिर्मितीसाठी विश्वाचा उपक्रम आहे ? प्रश्र्नांची ही शृंखला निरंतर वृद्धिंगत होत आहे. आजपर्यंत विश्वाचं किती ज्ञान आपण हस्तगत केलं ? अजून काय काय समजायचं बाकी आहे ? खरं म्हणजे विश्वाचं कोडं मानवाला उलगडेल ? या सा-या प्रश्नांचा धावता आढावा हीच, या ग्रंथाच्या उपक्रमाची मूलप्रेरणा.
विज्ञानBramhand | ब्रह्मांड
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart
Skip to content