WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock

Madhyayugin Marathi Sahitya – Ek Punarvichar | मध्ययुगीन मराठी साहित्य – एक पुनर्विचार

लेखक: Shridhar Kulkarni | श्रीधर रंगनाथ कुलकर्णी

Original price was: ₹150.00.Current price is: ₹113.00. Save ₹37

Out of stock

Notify Me when back in stock

हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून मराठीचे प्रोफेसर आणि पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झालेले डॉ. श्री.रं. कुलकर्णी हे मध्ययुगीन मराठी वाडमयाचे चिकित्सक संशोधक आणि गाढे अभ्यासक आहेत. नाथांचा भागवतधर्म , प्राचीन मराठी हस्तलिखिते : संशोधन आणि संपादन इत्यादी त्यांचे ग्रंथ त्यांच्या अभ्यासूपणाची आणि मुख्य म्हणजे संशोधकीय प्रज्ञाप्रतिभेची साक्ष

देणारेच आहेत. डॉ.श्री.रं. कुलकर्णी यांचा एकूण सर्वच अभ्यास शास्त्रशुद्ध नवीनतम प्रमेये मांडणारा आणि साहित्याचा सांस्कृतिक अनुबंध मानणारा असा आहे; आणि प्रस्तुत मध्ययुगीन मराठी साहित्य : एक पुनर्विचार हा ग्रंथही याला अपवाद नाही. काल, परिस्थिती, सांस्कृतिक परंपरा, समाजजीवन आणि साहित्य यांचे परोपजीवित्व मध्ययुगीन मराठी साहित्यात जेवढे भक्कमपणे निदर्शनास येते, तेवढे अन्य कालखंडात क्वचितच आढळेल , या आपल्या गृहितकाचाच धांडोळा लेखकाने संपूर्ण ग्रंथभर कसोशीने घेतला आहे. मध्ययुगीन महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सास्कृतिक स्थित्यंतरे आणि साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात घडून येणारी परिवर्तने यांचा परस्परसंबंध व आंतरक्रिया तपासून डॉ.श्री.रं.कुलकर्णी यांनी येथे नवसिद्धान्ताची प्रस्थापना केलेली आहे. मराठी वाड्.मयाच्या अभ्यासक्षेत्रात मूलभूत भर घालणारा हा ग्रंथ अभ्यासकांना समृद्धच करील. डॉ. द. दि. पुंडे

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 1995
बुक कोड : J-04-1995
वजन : -
पाने : 230
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑक्टोबर 1995

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top