समाजकारण / राजकारण
-
Sale! Add to cartशहाणा असशील तर कधी लिहू नकोस. लिहिलेस तर कोणाला वाचून दाखवू नकोस, पैसा असेल तर पोटभर खा, नाहीतर उपाशी राहून झाडाप्रमाणे वाळून जा; पण लेखणी आणि कागद यांच्याशी संबंध येऊ देऊ नकोस.... माझा बाप सतत लिहीत असे आणि सकाळी लोकांमध्ये वाटत असे... नंतर कायकाय लिहिले त्याच्या सुरळ्या घेऊन परवा उघड्या तलवारी घेतलेले राक्षसासारखे सैनिक आले. बापाला घेऊन निघून गेले. त्यांनी त्याचे सारे कागद जाळून टाकले व माझा बाप इतका भयंकर आहे हे मला माहीतच नव्हतं. कधी भीतीने बाजूला होत नसत. तो अगदी जवळून चालला तरी अंगणातल्या चिमण्यादेखील परंतु असा हा माणूस म्हणे भयंकर होता, तो लिहीत असताना खिडकीवर पारवा घुमू लागला, तरी त्याला हुसकवण्याऐवजी तो लिहिणे थांबवून स्वस्थ बसे. कारण त्याच्यापासून राजसत्तेला धोका होता. जी. ए. कुलकर्णी 'इस्किलार'मधून
All BooksShahana Asashil Tar Lihu Nakos… | शहाणा असशील तर
₹340.00Original price was: ₹340.00.₹255.00Current price is: ₹255.00. Save ₹85 Add to cart -
Sale! Add to cartमुंबई महाराष्ट्रात आहे, पण मुंबईमध्ये महाराष्ट्र नाही - ही विदारक वस्तुस्थिती आहे. ही स्थिती बदलण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली समर्पित भावनेने कार्य करणार् या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची कामगिरी अतुलनीय अशीच आहे. मुंबईत महाराष्ट्र वाढीस लावणार् या व मराठीकरणाचे तेजस्वी कार्य करणार् या लोकाधिकारच्या कार्याचा जेवढा गौरव करावा तेवढा कमीच आहे. -- वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज
All BooksShivsena, Lokadhikar Ani Mee | शिवसेना, लोकाधिकार आणि मी
₹340.00Original price was: ₹340.00.₹255.00Current price is: ₹255.00. Save ₹85 Add to cart -
Sale! Add to cart'श्रद्धा-अंधश्रद्धा शोषण, फसवणूक करणा-या अंधश्रद्धांशी संघर्ष, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, धर्माची कृतिशील चिकित्सा, विवेकाधिष्ठित नीतीचा आग्रह यासाठी कार्यरत असलेली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारखी चळवळ आजतरी भारतात अन्यत्र आढळत नाही. समाजाला पुढे नेण्यासाठी, डोळस, निर्भय बनवण्यासाठी, विचारांचे परिवर्तन हे या कार्याचे सूत्र आहे आणि हत्यार आहे प्रबोधनाचे. तर्काची, युक्तिवादाची, परखडपणाची , आर्जवी आवाहनाची, कळकळीची पण निर्धाराची भाषा वापरत अखंडपणे यासाठीचा विवेकजागर आपल्या भाषणांतून नरेन्द्र दाभोलकर सर्वदूर पोचवीत आहेत. चळवळीला वाढता प्रतिसाद मिळवत आहेत. लोकांना मंत्रमुग्ध करणारे त्या भाषणाच्या शैलीतले हे लिखाण वाचकाला भिडल्याशिवाय, अंतर्मुख केल्याशिवाय राहणार नाही.
समाजकारण / राजकारणShraddha-Andhashraddha | श्रध्दा अंधश्रध्दा
₹190.00Original price was: ₹190.00.₹143.00Current price is: ₹143.00. Save ₹47 Add to cart -
समाजकारण / राजकारण
Shri Guru Granth Sahib Ek Avlokan | श्री गुरू ग्रंथ साहिब एक अवलोकन
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Read more -
Sale! Add to cartगेली अनेक दशकं तेलाच्या विहिरींतून आणि तेलवाहिन्यांतून बरंच काळं सोनं' वाहून गेलं. पण गेल्या दीड-दोन दशकांत घडलेल्या उलथापालथींमुळे तेल एका नव्या वळणावर स्थिरावलं. तापलेल्या वसुंधरेची चिंता वाहणाऱ्या पर्यावरणजाणिवांनी तेलाच्या उपयुक्ततेलाच आव्हान दिलं. इतकी शतकं तेलावर पोसल्या गेलेल्या, औद्योगिक प्रगतीची फळं चाखणाऱ्या, निसर्गावर मात करू पाहणाऱ्या या माणूस नावाच्या प्राण्याच्या यापुढच्या जगण्याचा आधार वसुंधरेच्या गर्भातून निघणारं हे खनिज तेल असेल का? तेलाच्या रक्तरंजित इतिहासानंतर तितक्याच रक्तरंजित वर्तमानाचा वेध.
समाजकारण / राजकारणTel Navacha Vartaman | तेल नावाचं वर्तमान
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cartमानवी इतिहासातील समतावादी समाजरचनेचा अट्टाहासाने केलेला असा भव्य, महत्वाकांक्षी आणि क्लेशकारक प्रयोग संपला. पण ज्यासाठी रशियन जनतेने रक्त, घाम आणि अश्रू दिले त्या आदर्शांचे काय ? स्तिमित करून टाकणा-या सोवियेत क्रांतीचा रोमहर्षक, विस्तीर्ण पट...
समाजकारण / राजकारणTisri Kranti | तिसरी क्रांती
₹750.00Original price was: ₹750.00.₹563.00Current price is: ₹563.00. Save ₹187 Add to cart -
Sale! Add to cartकुमार केतकरांची नजर भूतकाळाकडे मागे वळते; तेव्हा त्यांना एखादाच देश-प्रदेश, एखादीच घटना, एखादीच व्यक्ती-विभूती, एखादाच लोकसमूह पाहायचा नसतो. त्यांना टप्प्यात आणायचा असतो सा-या मानवी संस्कृतीचा भूतकाळ. भूतकाळाच्या धूसरतेतून ते वाचकाला वर्तमानाकडे घेऊन जातात, तेव्हा आजच्या व्यामिश्र जीवनाची गुंतागंत शक्य तितकी स्पष्ट दाखवण्याचा त्यांचा सायास असतो. आणि भूत-वर्तमानाच्या पायावर उभा राहणारा, भविष्यातील अनेकानेक शक्यतांचा फ्यूचरॉलॉजी बांधत असलेला इमला- तो इमलाही विचारांच्या प्रकाशझोतात ते वाचकाला उजळून दाखवतात. हा आहे वाचकांपुढे मांडलेला काळाचा एक मोठा पैस.
समाजकारण / राजकारणTrikalvedh | त्रिकालवेध
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cartप्लँचेट, बुवाबाजी, भानामती, भविष्य रूढी, प्रथा, कर्मकांडे, परंपरा. अंधश्रद्धेचा हा हजार पायांचा ऑक्टोपस - शोषण करणारा. या लेखनात पानोपानी आहेत त्यावर आरपार प्रकाशझोत. पण त्याचबरोबर आहे अस्वस्थ आणि अंतर्मुख करावयास लावणारे एक निखळ प्रामाणिक आवाहन. राजकीय आणीबाणीपेक्षा अंधश्रद्धेची आणीबाणी अधिक अवघड. बंधने जाणवत असली की, माणूस त्याविरुद्ध लढावयास उभा राहतो. परंतु, बंधनातच प्रतिष्ठा, धन्यता वाटू लागली तर ? विचारस्वातंत्र्याचे आत्मत्वच हिरावून घेणा-या धार्मिक अंधश्रद्धा नेमके हेच करीत असतात. एक सर्वांगीण अरिष्ट समाजाला ग्रासत आहे. हिंसा, द्वेष, धर्मांधता, चंगळवाद यांची वादळे घोँघावत आहेत. मानवी मूल्यांना सर्वप्रथम एकच परिमाण आहे. आणि ते म्हणजे मानव, मूलभूत मानवता. आपला आपण स्वतःशीच शोध घ्या. बुद्धीला कौल लावा. मूल्यभावनेला प्रतिसाद द्या. आव्हानाला सामोरे जाणा-या लोकयात्रेत सामील व्हा.. कारण - माणसाला मदत केवळ माणसेच करू शकतात. आणि माणसेच समाज घडवत असतात व बदलत असतात.
समाजकारण / राजकारणVichar Tar Karal? | विचार तर कराल?
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart
Skip to content
