प्रवास
-
Sale! Add to cart'त्रि पु रा... आपल्या देशाच्या एका कोपऱ्यातले अगदी छोटेसे राज्य. महाभारताच्या काळापासून थेट बांगलादेशच्या उदयापर्यंतचा भलाबुरा ऐतिहासिक वारसा लाभलेले हे राज्य विविध समस्यांनी ग्रासलेले असले, तरी आता उत्साहाने प्रगती करू लागले आहे. पूर्वांचलातील या विशेष राज्याची, तेथील वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळांची, स्थानिक जनतेमधील रूढ प्रथापरंपरांची व सोयीसुविधांची तपशीलवार ओळख करून देणारे पुस्तक. '
प्रवासManobhave Deshdarshan Tripura | मनोभावे देशदर्शन त्रिपुरा
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Add to cart -
Sale! Add to cart' मनू हे नाव आहे पेरू देशाच्या दक्षिणेला उगम पावणाऱ्या अन् नंतर महाकाय अॅमेझॉनला मिळणाऱ्या एका नदीचे. अॅमेझॉनचे खोरे म्हणजे पृथ्वीतलावरील जैवविविधतेने सर्वांत समृध्द अशी जागा. पक्ष्यांची रंगीबेरंगी पिसारी दुनिया असो, हजारो प्रकारच्या वेगवेगळया वनस्पतींचे बहरलेले विश्व असो, जलचर अन् उभयचर प्राण्यांपासून कीटक अन् सस्तन प्राण्यांपर्यंतच्या हजारो प्रजाती असोत, या साऱ्या विविधांगी, विविधरंगी जीवसृष्टीला अंतरंगात सामावून घेणारे मनूचे अरण्य. पेरू देशाच्या आग्नेय भागात अँडीज पर्वताच्या उतारावर वसलेल्या या सदाहरित घनदाट जंगलात एका झपाटलेल्या निसर्गप्रेमीने मनसोक्त भटकंती केली. त्या भटकंतीतून नजरेपुढे साकार झालेले, शब्दांतून अन् छायाचित्रांमधून पानांवर उमटलेले मनू चे अरण्य '
प्रवासManuche Aranya | मनू’चे अरण्य
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more१८५७ च्या स्वातंत्र्यलढयाला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या लढयाचे गोडसे भटजींनी माझा प्रवासमध्ये केलेले चक्षुर्वैसत्यं वर्णन प्रसिध्द झाले, त्या घटनेलाही १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या योगायोगाचे निमित्त साधून 'माझा प्रवास' या पुस्तकाचा १०० वर्षांचा चरित्रपट मांडण्याचा हा प्रयत्न. 'माझा प्रवास' या पुस्तकाचे हे चरित्र म्हणजे मराठी भाषा, इतिहास व समाजशास्त्र यांच्या अभ्यासकांच्या दृष्टीने एक मौलिक संदर्भ-ग्रंथच ठरणार आहे.
प्रवासMaza Pravas | माझा प्रवास
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
Sale! Add to cartनिसर्गाचं वेड लावणारं सौंदर्य अनुभवत मिलिंद गुणाजी यांनी महाराष्ट्रात अमर्याद भटकंती केली. निघोजच्या रांजणकुंडांपासून ते लोणारच्या निसर्गदत्त सरोवरापर्यंत अन् पालच्या अभयारण्यापासून ते ताडोबाच्या जंगलापर्यंत सुमारे एकशेतीस लहान-मोठया पर्यटनस्थळांना त्यांनी भेटी दिल्या. यातली काही ठिकाणं ही नेहमीची, जिथे पर्यटकांसाठी सगळया सुविधा आहेत. पण बरीचशी ठिकाणं अशी की, जी भटक्यालाही माहीत नाहीत. आज भटकंती करणा-याची संख्या वाढते आहे. अशा उत्साही पर्यटकांसाठी महाराष्ट्रातल्या नामवंत आणि उपेक्षित स्थळांची सर्व माहिती एकत्रितरित्या वाचकाला उपलब्ध करून देण्यासाठी हे पुस्तक. खरा महाराष्ट्र जाणून घेऊ इच्छिणा-या प्रत्येक भटक्याला आवडेल अशी.... माझी मुलुखगिरी...
प्रवासMazi Mulukhgiri | माझी मुलूखगिरी
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartन्यूझीलंड या देशाची लोकसंख्या खूपच कमी असल्यामुळे न्यूझीलंड सरकारने परदेशी नागरिकांना स्थलांतरासाठी त्यांचे दरवाजे खुले केले. त्यामुळे गेल्या ५/६ वर्षांत भारतीयांचा ओघ अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पश्चिम आशियामधल्या देशांऐवजी न्यूझीलंडकडे वळला. न्यूझीलंडला स्थलांतर करण्याचा विचार करणा-यांना त्यांच्या निर्णयप्रक्रियेत मदत म्हणून व ज्यांचा हा निर्णय पक्का झाला आहे, त्यांना प्रस्थानापूर्वीची पूर्वतयारी म्हणून, हे पुस्तक खचितच उपयुक्त ठरेल.
प्रवासNewzeland Sathi Bharat Sodtana | न्यूझीलंडसाठी भारत सोडताना
₹60.00Original price was: ₹60.00.₹45.00Current price is: ₹45.00. Save ₹15 Add to cart -
Sale! Add to cart'निकोबार ! समुद्राच्या निळाईत उठून दिसणारी पाचूची बेटं. जणू भारतमातेची उजवी कर्णफुलं ! सोनेरी वाळूच्या किनाऱ्यांनी सजलेली... कल्पवृक्षांच्या विपुल वनराईने नटलेली... या बेटांवरच्या अपरिचित आदिम जमाती अन् त्यांच्या अनोख्या चालीरीती.... त्सुनामीने सर्वांत जास्त घायाळ केले ते निकोबारला, तरीही पुन्हा त्यावर उमेदीने वसवलेली वस्ती.... अशा या अस्पर्शित, काहीशा ज्ञात, खूपशा अज्ञात भूमीचा इतिहास, भूगोल आणि लोकसंस्कृती उलगडून दाखवणारे निकोबारची नवलाई.'
प्रवासNicobarchi Navalai | निकोबारची नवलाई
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartमानवी अस्तित्तवाचा मूलाधार कोणता, अशी जिज्ञासा दिव्रिटो यांच्या मनामध्ये जागी झाली आणि तिचा शोध घेण्यासाठी त्यांनी पश्चिमेकडे प्रस्थान केले. प्राचीन आणि अर्वाचीन यांचा संगम साधणा-या युरोपीय भूमीवर ते मुक्तपणे हिंडले. त्या परिक्रमेचा हा आशयगर्भ आलेख. भेटणा-या माणसांशी संवाद करताना दिब्रिटो तटस्थ, कोरडे रहात नाहीत. ते त्यांच्या व्यथावेदनेशी सहजपणेच समरस होऊन जातात. एवढे भावबळ फारच थोड्यांना लाभलेले असते. म्हणून हे पर्यटन हौसेमजेसाठी केलेली मुशाफिरी ठरत नाही. त्याला भावोत्कट यात्रेचे एक निराळेच परिमाण प्राप्त होते. फादर दिब्रिटो यांच्या व्यक्तिमत्त्वाची ही विशेषता इथे पानोपानी प्रत्ययास येते; वाचकाला खिळवून ठेवते.
प्रवासOasischya Shodhat | ओऑसिसच्या शोधात
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartहे नेहमीच्या अर्थानं प्रवासवर्णन नाही. निरनिराळ्या देशांचा वर्तमान आणि भूगोल यांतून इतिहासाचा वेध घेत केलेला हा मनोज्ञ लेखनप्रपंच. आपली अनुभवश्रीमंती वाचकांमध्ये वाटून घ्यावी एवढयाच उद्देशाने साधलेला हा सहजसंवाद.
प्रवासPahilele Desh, Bhetleli Manse | पाहिलेले देश भेटलेली मानसं
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमहाराष्ट्रातल्या सागरकिना-यापासून हिमालयीन हिलस्टेशनपर्यंत आणि दक्षिणेतल्या मंदिरांपासून पूर्वांचलातल्या अभयारण्यापर्यंत कुठेही जायचं असलं तरी जवळ बाळगलाच पाहिजे, असा विश्वासार्ह मित्र म्हणजे, प्रवास : तंत्र आणि मंत्र या लोकप्रिय पुस्तकाची सुधारून वाढवलेली ही नवी आवृत्ती... विविध राज्यांच्या पर्यटन-विभागांचे पत्ते, वेबसाइटस् आणि काही नमुनेदार सहलींच्या आराखडयांसह...
प्रवासPravas Tantra Aani Mantra | प्रवास तंत्र आणि मंत्र
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Read more -
Sale! Add to cart' ड्रीमलँड , वंडरलँड अशी बिरुदे मिरवणारी अमेरिका. तिच्या दोन्ही किनाऱ्यांना भेट देण्याची संधी. सपत्नीक सहलीत जिवाभावाचे मित्र सोबतीला. खेरीज पर्यटन म्हणजे केवळ करमणुकीचे साधन असे न मानता डोळसपणे सर्व गोष्टी निरखण्याची लेखकाची वृत्ती. या सर्व कारणांनी हे प्रवासवर्णन बनले आहे अमेरिकेचे अनोखे चित्र दाखवणारा शोभादर्शक. पुन्हा यांकीजच्या देशात... '
प्रवासPunha Yankijchya Deshat | पुन्हा यांकीजच्या देशात…
₹230.00Original price was: ₹230.00.₹173.00Current price is: ₹173.00. Save ₹57 Add to cart
Skip to content