चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
-
Sale! Add to cartएस.एल.भैरप्पा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर नावाजले गेलेले आणि मराठी वाचकांमध्येही लोकप्रिय ठरलेले एक अग्रगण्य कानडी कादंबरीकार. मानवी नात्यांमधली गूढ गुंतागुंत उकलून दाखवणारे आणि अवघा जीवनसंघर्ष सप्तरंगांमध्ये चितारणारे प्रतिभावंत साहित्यिक म्हणून प्रसिध्द असणा-या भैरप्पांचं हे प्रामाणिक आत्मचरित्र. जे जसं घडलं, ते तसं सांगणारं. नातेवाइकांपासून सहका-यांपर्यंत सर्वांचीच - अगदी हितशत्रुंचीसुध्दा आवरर्जून दखल घेणारं. त्यांच्या आयुष्यातले आणि साहित्यिक जडणघडणीतले असंख्य चढउतार, यशापयश, सुखदु:ख... सारं काही वाचकांसमोर मांडून ठेवणारं. आत्मचरित्रांच्या दालनाची समृध्दी वाढवणारं एक पारदर्शी पुस्तक.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMaza Nav Bhairappa | माझं नाव भैरप्पा
₹650.00Original price was: ₹650.00.₹488.00Current price is: ₹488.00. Save ₹162 Add to cart -
Sale! Add to cartवर्गीस कुरियन या माणसानं अट्टहासानं कोट्यधीश होण्याचा मार्ग नाकारला. आणंद सारख्या धूळभरल्या खेड्याला आपली कर्मभूमी मानली. आणि विदेशी आक्रमणाला थोपवत अमूल ची निर्मिती केली. धवलक्रांती च्या या जनकाचा हा विलक्षण प्रवास ! रंजक, उदबोधक आणि भारतीय मानसिकतेवर जळजळीत प्रकाश टाकणाराही !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMazahi Ek Swapna Hota : Vergees Courian | माझंही एक स्वप्न होतं : वर्गीस कुरियन
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cart'मुंबईत राहणाऱ्या देवल पती-पत्नींनी, कोकणात किहिमला घर घेतले. त्या घराची ही अथपासून इतिपर्यंतची कहाणी. या कहाणीत घर आणि घराभोवतालचा परिसर आहे. त्यात वावरणारे कुटुंब आणि भोवतालची गडीमाणसे आहेत. समुद्राची विविध रूपे आहेत. शंखशिंपले, खडक,मासे आहेत. गावातले गावकरी आहेत, गावगप्पा आहेत. शहरवासी आणि गावकरी यांच्यातला वाद-संवाद आहे. एका उच्च शिक्षित, समाजकार्यकर्त्या, गृहिणीचे हे अनुभवकथन. लेखिकेची प्रांजळ वृत्ती, मिस्कील स्वभाव, खुसखुशीत शैली यामुळे हे अनुभवकथन रसाळ - रंजक झाले आहे. जशी काही ही आपल्या सर्वांच्या आयुष्यातल्या किंवा मनातल्या घराची साठा उत्तराची पाचा उत्तरी सांगितलेली कहाणी ! माझे किहीम
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMaze Kihim | माझे किहिम
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cart'१४ फेब्रुवारी २०१५ रोजी, रत्नाकर मतकरी यांच्या साहित्य-कारकिर्दीला ६० वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत, त्यांनी गूढकथा हा वैशिष्टयपूर्ण कथाप्रकार मराठी साहित्यात रुजवला; त्याशिवाय, कादंब-या, ललित लेखसंग्रह, वैचारिक लेखसंग्रह, बालकथा, बालगीते, असे नाना प्रकारचे दर्जेदार आणि वाचकप्रिय लिखाणही केले. मात्र या लेखनप्रपंचासोबतच त्यांनी मुलांसाठी व प्रौढांसाठी जी प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटके (७५च्या आसपास) लिहिली, ते त्यांचे, मराठी साहित्याला आणि रंगभूमीला, भरभक्कम योगदान म्हणावे लागेल! विविध विषयांवरच्या, भिन्नभिन्न शैलीतील, विचारसंपन्न आणि रंगतदार, अशा या नाटकांच्या लेखनाबरोबरच मतकरींनी दिग्दर्शन, नेपथ्य-रंगभूषा-वेषभूषा इत्यादींचे संकल्पन, अभिनय, निर्मिती अशा रंगभूमीच्या सर्वच शाखांमधून संचार केला. या दीर्घ रंगप्रवासात त्यांनी नाटयक्षेत्रातील समस्यांचा, आणि त्याहीपेक्षा सखोल अशा, रंगभूमीच्या मूलभूत प्रश्नांचा सातत्याने विचार केला. त्या संदर्भातील त्यांचे सविस्तर विश्लेषण, हा माझे रंगप्रयोगचा गाभा आहे. रंगभूमीच्या वाढीसाठी अपरिहार्यपणे कराव्याशा वाटलेल्या प्रयोगांचे हे तपशीलवार सत्यकथन, लेखकाच्या ओघवत्या नाटयपूर्ण शैलीमुळे एखाद्या कादंबरीसारखे वाचनीय झालेले आहे. अनेक छायाचित्रांनी परिपूर्ण असे हे पुस्तक रंगभूमीच्या अभ्यासकाप्रमाणेच, सर्वसामान्य रसिकालाही, संग्रही ठेवावे, असेच वाटेल! - इट्स अ कलेक्टर्स आयटेम ! '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMaze Rangprayog | माझे रंगप्रयोग
₹800.00Original price was: ₹800.00.₹600.00Current price is: ₹600.00. Save ₹200 Add to cart -
Sale! Add to cartवर्तमानपत्रातल्या एका साध्या बातमीतले मंत्र्यांचे आवाहन हेच आव्हान समजून एका हाडाच्या उद्योजकाने दूध पिशवीत भरण्याचे यंत्र तयार केले आणि बघता बघता बाजारपेठेचे रूप पालटवण्याची किमया करून दाखवली. ॲल्युमिनियमची शटर्स बनवण्यापासून सुरू झालेला साधा व्यवसाय रमेश जोशी नावाच्या एका कल्पक, जिद्दी उद्योजकाने नावारूपाला आणला. पॅकेजिंगचे नवे तंत्र तर त्याने भारतात सर्वदूर पोहोचवलेच, पण नायक्रोम हा ब्रॅण्ड जागतिक पातळीवरही सुप्रतिष्ठित केला. त्या लघुउद्योजकाची, त्याच्या कर्तृत्वाची, त्याला कराव्या लागलेल्या संघर्षाची, त्याच्या वाटेतल्या खाचखळग्यांची आणि त्याने मिळवलेल्या नेत्रदीपक यशाची, अनेक तरुणांना प्रेरणा देऊ शकेल अशी ही आत्मकथा.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMazi Corporate Yatra | माझी कार्पोरेट यात्रा
₹330.00Original price was: ₹330.00.₹248.00Current price is: ₹248.00. Save ₹82 Add to cart -
Sale! Add to cart'नर्मदा परिक्रमेसारखी हीसुद्धा एक परिक्रमा... शिक्षणप्रवाहाच्या घाटा-घाटाने केलेली एका पांथस्थाची परिक्रमा... शिक्षणक्षेत्राचे ताणेबाणे उलगडून दाखविणारी... शिक्षणाचे आकलन उंचावायला मदत करणारी... माझी शिक्षण परिक्रमा
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMazi Shikshan Parikrama | माझी शिक्षण परिक्रमा
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
Mazi Swaryatra | माझी स्वरयात्रा
₹125.00Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31 Read more -
Sale! Add to cartप्रत्येकाचं जीवन हे नियती व त्या व्यक्तीचा स्वभाव यांच्या मिश्रणातून घडत असतं. कुणी कितीही ठरवलं तरी शेवटी नियती आणि अन्य काही गोष्टी कोणाच्या हातात नसतात. तुमचा स्वभाव आनुवंशिकता ठरवते आणि नियती तर अज्ञातच असते. ही अज्ञात नियती आपल्याकडे वळविण्यासाठी जीवनात जो संघर्ष, प्रयत्न करावे लागतात; त्यामुळेच जीवनात मजा येते. वयाच्या बाराव्या वर्षी शालेय जीवनाला सुरुवात करून, अनेक अडथळे अन विघ्नांवर मात करून मी वयाच्या सदतिसाव्या वर्षी डॉक्टर झालो आणि पुढे वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी पोस्ट ग्रज्युएशन केले. हा मधला प्रदीर्घ काळ चित्रविचित्र घटना, वेडीवाकडी वाटा-वळणं व अडथळ्यांच्या शर्यतीनं भरलेला होता... कलंदर वृत्तीनं जगलेल्या आपल्या आयुष्याची कहाणी सांगत आहेत डॉ. गंगाधर गोरे
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMee Ek Kalandar | मी एक कलंदर
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartमॅडलिन स्लेड. ती होती एका ब्रिटिश ॲडमिरलची मुलगी. रोमा रोलाँ या फ्रेंच साहित्यिकाची मानसकन्या... तिनं वाचलं एक चरित्र, रोमा रोलाँनी लिहिलेलं. महात्मा गांधींचं ते चरित्र वाचून ती भारावून गेली. इतकी की, तिनं उभं आयुष्यच गांधीजींच्या चरणी वाहायचा निर्णय घेतला. महात्माजींनी तिच्या समर्पणभावनेला प्रतिसाद दिला. तिला आश्रमवासिनी व्हायला संमती दिली. तिचं नाव बदललं, मीरा ठेवलं. त्या दोघांमध्ये विकसित झाले हळवे भावबंध. ते कधी वादळी ठरले, तर कधी हुरहुर लावणारे. त्या जगावेगळ्या नातेसंबंधांची आगळ्या शैलीत सांगितलेली प्रभावी भावकथा...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMeera Aani Mahatma | मीरा आणि महात्मा
₹220.00Original price was: ₹220.00.₹165.00Current price is: ₹165.00. Save ₹55 Add to cart -
Sale! Add to cartएका आगळ्या समाजपरिवर्तनाच्या प्रयोगाची ही कहाणी मेळघाट म्हणजे सातपुडा पर्वतातील घनदाट अरण्यप्रदेश. येथे तापी-खापरा-सिपना या नद्यांच्या संगमावरचं गाव बैरागड. दारिद्रयानं पोखरलेलं, आजारानं ग्रासलेलं, अज्ञानात पिचलेलं हे छोटं गाव . १९९० च्या आसपास डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे येथे आले. दवाखान्यात औषधोपचार व अवघड बाळंतपणं करायची. पण मनात हेतू गावाच्या सर्वांगीण विकासाचा ! त्यांनी संस्था उभारली नाही. पण प्रबोधनासाठी वेगवेगळ्या वाटा शोधल्या. कधी शिक्षणातून प्रबोधन, कधी उत्सवातून प्रबोधन, तर कधी कोर्टकचेरीचा हिसका दाखवून प्रबोधन. ते शेतीच्या प्रयोगात शिरले. ते धर्मांतराच्या प्रश्नाला भिडले. त्यातून काय घडलं ? हे सांगत आहेत मृणालिनी चितळे
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMelghatavaril Mohar, Dr. Ravindra Ani Smita Kolhe | मेळघाटावरील मोहर, डॉ.रवींद्र आणि स्मिता कोल्हे
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart
Skip to content