WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock
SKU: J-02-2014 Category: Brand:

Sangeet Sangatee | संगीत संगती

लेखक: Dr. Ashok Ranade | डॉ. अशोक रानडे

Original price was: ₹325.00.Current price is: ₹244.00. Save ₹81

Out of stock

Notify Me when back in stock

डॉ. अशोक दा. रानडे यांच्या लिखाणातून नेहमीच वाचकाला संगीताबद्दलची नवी नजर मिळते. संगीतातील सृजनप्रक्रियेपासून सादरीकरणापर्यंत अनेकविध पैलूंना स्पर्श करणाऱ्या त्यांच्या लेखमालांचे निवडक संकलन म्हणजे हा ग्रंथ. शास्त्रोक्त संगीत, विविध संगीत-परंपरा, नाट्य-संगीत, भावगीत-गायन, संगीतातील साहित्यिक अंग अशा विविध विषयांची मार्मिक मांडणी हे या ग्रंथाचे आगळे वैशिष्ट्य. जयदेव-बैजू-होनाजी अशा इतिहासातून डोकावणाऱ्या कलाकारांपासून

रवींद्रनाथ टागोर, गजाननबुवा जोशी, सुब्बलक्ष्मी ते लता मंगेशकर अन् आशा भोसले अशा कित्येक कलाकारांशी डॉ.रानडे वाचकाचे अलगद बोट धरून भेट घडवतात. डॉ. रानड्यांची रसाळ, नर्मविनोदी शैली, अनेक किस्से आणि चुटके यांनी नटलेले हे संगीत विचारप्रवर्तक लिखाण वाचकाला एखाद्या कथा-कादंबरीसारखे गुंतवून ठेवील. मैफलीत पेशकश करणाऱ्या कलाकारांनी, संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि आस्वादक व अभ्यासक संगीतरसिकांनी संगीतकलेच्या व्यापकतेचे भान येण्यासाठी आवर्जून वाचायलाच हवा असा ग्रंथ.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 2014
बुक कोड : J-02-2014
वजन : 408 g
पाने : -
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑक्टोबर 2014

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top