All Books
-
Sale! Add to cartही भारतभूमी आहे तेवीसशे वर्षांपूर्वीची. आर्या चाणक्यांचं बुद्धिसामर्थ्य अन सम्राट चंद्रगुप्ताचं बाहुबल यांनी साकारलं मौर्य साम्राज्य. चंद्रगुप्तपुत्र बिंदुसारानंही केला राज्यविस्तार, परंतु व्यसनीपणामुळे आज तो आहे मृत्युशय्येवर. त्याच्या पश्चात हे साम्राज्य कोसळून पडेल का ? ते कोसळू नये, यासाठी प्रयत्न करणा-या व्यक्ती आणि शक्ती आहेत का कुणी ? बिंदुसारानं आर्य चाणक्याला हद्दपार का केलं होतं ? निर्वासित चाणक्य, 'कौटिल्य' हे नाव आणि नवा वेश घेऊन पाटलीपुत्रात चक्क एक वेश्यागृह चालवतो आहे ! का ? त्याला गुरू मानणारा मंत्री राधागुप्त, त्याच्या पाऊलखुणांवर चालायला खरंच तयार आहे का ? पाटलीपुत्राच्या जमिनीखालच्या भूयारांत वावरणारी एक गुप्त संघटना 'चिरंतन वैदिक कृतिदल' आज काय अवस्थेत आहे ? या आणि अशा कित्येक चक्रावून टाकणा-या प्रश्नांची थरारक उत्तरं देईल : दोन हजार तीनशे वर्षांपूर्वीच्या विलक्षण सामर्थ्याच्या माणसांची, त्यांच्या संघर्षांची आणि त्या अद्भूत काळाची ही कहाणी.
All BooksChanakya Chandragupta Ashok – Tridhara – Pataliputrache Rajaputra | चाणक्य चंद्रगुप्त अशोक – त्रिधारा – पाटलीपुत्राचे राजपुत्र
₹425.00Original price was: ₹425.00.₹319.00Current price is: ₹319.00. Save ₹106 Add to cart -
All Books
Chanakya Chandragupta Ashok – Tridhara – Takshahila -Pataliputra Zanzavat | चाणक्य चंद्रगुप्त अशोक – त्रिधारा – तक्षशिला-पाटलीपुत्र झंझावात
₹425.00Original price was: ₹425.00.₹319.00Current price is: ₹319.00. Save ₹106 Add to cart -
Sale! Add to cartसोन्या-चांदीहून मोलाची असतात आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी माणसं. ही माणसं निवडण्यासाठी कुठल्या सराफाच्या दुकानात नाही जावं लागत. कधी ती आयुष्यात प्रत्यक्ष प्रवेश करतात, तर कधी अप्रत्यक्ष सोबत चालत राहतात. या गुणवंत माणसांच्या परीसस्पर्शानं आपल्या आयुष्याचं ख-या अर्थानं सोनं होतं ! स्वत:च्या झळाळत्या तेजानं बरोबरच्या आयुष्यांनाही लखलखवणा-या व्यक्तिमत्त्वांची तेजाळ शब्दचित्रं :
All BooksChanderi-Soneri | चंदेरी सोनेरी
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartकवीनं असावं अल्पाक्षरी, आणि नाटककारानं मितभाषी. अभिनेत्यानं करावा संहितेतील अव्यक्त आशय व्यक्त. तंत्रज्ञानं साधावा शब्देविण संवाद. ध्वनी, प्रकाश, रंग, रेषा यांनी टाकावा अवकाश भारून. प्रेक्षकांनी सगळं अनुभवावं, मूक राहून आणि एकाग्र होऊन. समीक्षकांनी करावं नाट्यानुभवाचं विश्लेषण अचूक. पण मग,... दिग्दर्शकानं काय करावं? आरंभापासून अंतापर्यंत, प्रत्येक क्षण उजळून टाकण्याचं कसब शिकवावं. मंचावरील आणि मंचामागील प्रत्येकाचा मित्र, तत्त्वज्ञ आणि दिशादर्शक व्हावं. हे का आणि कसं करावं? सांगत आहेत, मराठी नाट्यसृष्टीतील अग्रणी दिग्दर्शक आणि अभिनेते- चंद्रकांत कुलकर्णी.
All BooksChandrakant Kulkarni Saadar Karait Ahe …! | चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे
₹800.00Original price was: ₹800.00.₹600.00Current price is: ₹600.00. Save ₹200 Add to cart -
Sale! Add to cartएका सच्च्या समाजवाद्याचं चिंतनशील स्वगत इंग्रजी पेपरवाल्यांनी चंद्रशेखरांना Rugged हे विशेषण बहाल केलं होतं... रांगडा. गडी रांगडा होता, पण मन सुसंस्कृत नि आधुनिक विचारांनी भारलेलं होतं. तरुणपणी कविता केल्या, काही काळ पीएसपीच्या पत्रिकेचे संपादक होते. चंद्रशेखर ग्रामीण होते, गावंढळ नव्हते. त्यांचा देवीलाल झाला नाही. ग्रामीण भागातले असले, तरीही त्यांनी शेतक-यांचा विक्टिम कार्ड म्हणून वापर केला नाही. ग्रामीण विकासासाठी व्यापक देशहित आणि समताधिष्ठित, परिवर्तनशील विचारांची बैठक हवी; हे गांधीजींचं सूत्र धरून त्यांनी आपलं राजकारण केलं. अनेक अंतर्विरोधांनी ग्रासलेलं भारताचं बहुआयामी समाजजीवन चंद्रशेखरांनी पुस्तकात सजीव केलंय. जागतिकीकरणाच्या वावटळीत लोकसंस्कृतीची फार मोठी पडझड झाली. असं ते म्हणतात. पुस्तकात चंद्रशेखर म्हणतात, राजकारण सत्यावर चालत नाही हेच खरं.' अंबरीश मिश्र
All BooksChandrashekhar – Jase Jagalo Tasa | चंद्रशेखर – जसं जगलो तसं
₹380.00Original price was: ₹380.00.₹285.00Current price is: ₹285.00. Save ₹95 Add to cart -
All Books
Chandravati Ramayan | चंद्रावती रामायण
₹550.00Original price was: ₹550.00.₹413.00Current price is: ₹413.00. Save ₹137 Add to cart -
Sale! Add to cartपक्षिनिरीक्षण हा छंद आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारा आहे. त्यासाठी संयम आणि चिकाटीची मात्र आवश्यकता असते. आपल्याच परिसरातल्या पक्ष्यांची ओळख कशी करून घ्यायची, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा ओळखायच्या? निसर्गातल्या विविध प्राणी-पक्षी-वनस्पतींच्या वैशिष्ट्यांवरून विविध म्हणी आणि वाक्प्रचार कसे तयार झाले आहेत ? चला, जाणून घेऊया, या पुस्तकातल्या दोन कथांमधून - चारा खा,पाणी प्या अन् भुर्रऽऽऽ
All BooksChara Kha, Panee Pya An Bhurrr S S S | चारा खा,पाणी प्या अन् भुर्रऽऽऽ
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cartश्रीधर देशपांडे यांचं भावविश्व कवितेच्या अंगभूत वृत्तींनी व्यापलेलं आहे. त्यात स्वगतं आहेत, स्वत:ला पडणारे प्रश्न आहेत, असण्या-नसण्यातल्या भीतीचं भिरभिरलेपण आहे, जगण्यातल्या विरामचिन्हांच्या नोंदी, प्रार्थना आहेत, आटलेल्या मायेच्या स्मृती आहेत - असं बरंच काही आहे. कुठल्याही संकटांत प्रेमाचे बंध टिकोत, छपरं गळोत; पण पाठीशी भिंत असो आणि आटल्या मायेला पूर येवो, असं साकडं घालणारी ही कविता आहे. या कविता वाचताना आपल्याही मनात प्रार्थना उमटतात. ज्यातून शुष्कतेला ओल मिळो, घराच्या पायाला नजर न लागो, पक्ष्याला घर लाभो - असं वाटत राहतं. गणेश विसपुते
All BooksChhata Galot | छतं गळोत
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartजे बालसाहित्य मुलांना वाचायला आवडते, पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते, ते उत्तम बालसाहित्य. असे बालसाहित्य लिहिण्यासाठी मुलांचे मन वाचता येणे आणि ते अचूकपणे शब्दांत मांडता येणे फार अवघड आहे. पण ही अवघड गोष्टच अगदी सोप्या पद्धतीने मुग्धा शेवाळकर करतात. त्यांच्या निसर्गातले सखेसोबती' या पुस्तकातून त्याचा प्रत्यय आपल्याला येतोच. लेखन, अनुवाद आणि पुस्तकवितरण क्षेत्रात कार्यरत असणार् या आणि खास करून मुलांसाठी विविध वृत्तपत्रांतून लेखन करणार् या मुग्धा शेवाळकर छोट्या दोस्तांच्या भेटीला आल्या आहेत नवीन बालकथासंग्रह घेऊन ! ही भेट मुलांसाठी नक्कीच आनंददायी ठरणार. या सर्वच गोष्टी मुलांच्या भावविश्वाशी सांगड घालणार् या, मुलांच्या भाषेतून अवतरणार् या, उपदेशपणा बाजूला सारणार् या आणि आनंदासोबतच नकळत मूल्यसंवर्धनही करणार् याही आहेत. म्हणूनच या गोष्टींचे मोल बालसाहित्यात अनमोल आहे ! एकनाथ आव्हाड - साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक
All BooksChhotyancha Motha Plan Ani Itar Goshtee | छोट्यांचा मोठा प्लॅन आणि इतर गोष्टी
₹70.00Original price was: ₹70.00.₹53.00Current price is: ₹53.00. Save ₹17 Add to cart -
Sale! Add to cartआशा भोसले हे नाव आठवण करून देतं, श्रावणातल्या इंद्रधनुष्याची... ज्यातला प्रत्येक रंग म्हणजे शब्द-सूर-अर्थ-रस-भावांची अप्रतिम विविधता! आर्त प्रेमापासून दम मारण्यापर्यंतची गाणी.. भजनं, भक्तिगीतं, प्रेमगीतं, नाट्यसंगीत, क्लब डान्स साँग्ज अन् कॅब्रे साँग्ज, कव्वाली, लावणी नि कोळीगीतं... गाण्याचं असं एकही अंग नाही, ज्याला आशाताईंच्या सुरेल गळ्याचा परिसस्पर्श झाला नाही... या पुस्तकात रसिक संगीत अभ्यासक सुहास किर्लोस्कर आपल्याला घेऊन जातायत आशाताईंच्या गानखजिन्यात! आशाताईंच्या गायनकलेच्या जादूचा परिचय आणि मग त्यांची निवडक पंचवीस हिंदी-मराठी गाणी आणि त्यांचा रसास्वाद... अन् क्यूआर कोड स्कॅन करून ती गाणी लगेच ऐकायची सुविधा! हिंदी चित्रपटसंगीताच्या आणि आशाताईंच्या चाहत्यांसाठी, चुकवू नये अशी मैफल...
All BooksChirtarun Swar – Asha Bhosale | चिरतरुण स्वर आशा भोसले
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart
Skip to content

