All Books
-
Sale! Add to cartBamboo, the golden grass, has a range of various applications and has the potential to replace wood products. Apart from structural use, bamboo is widely used in producing ethanol, charcoal, vinegar, industrial products like pallets and gratings, flooring, rupfing, food, fodder and extraction of cotton. These and various other applications of bamboo are bound to create immense job opportunities and provide a vital impetus to the economy which is one of the foremost needs of the world today. A TREATISE ON BAMBOO is a modest attempt at articulating its diverse uses for posterity and beyond.
All BooksVamsa Samhita | वंश संहिता (बांबू)
₹1,550.00Original price was: ₹1,550.00.₹1,163.00Current price is: ₹1,163.00. Save ₹387 Add to cart -
Sale! Add to cartजानकी अम्मल या भारतातल्या पहिल्या महिला वनस्पतिशास्त्रज्ञ. केरळमधल्या एका लहानशा गावात जन्मलेल्या जानकी अम्मल यांनी प्रतिकूल परिस्थितीतही विज्ञानशाखेचे शिक्षण घेण्याचा ठाम निर्णय घेतला. आणि वनस्पतिशास्त्रातले उच्च शिक्षण घेऊन आपले सगळे आयुष्य संशोधनाला वाहून घेतले. वाचू या, त्यांची स्फूर्तिदायक गोष्ट- वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्मल
All BooksVanaspatishastradnya Janaki Ammal | वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्मल
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cartमराठी साहित्यक्षेत्रात नववाङ्मयाचे युग घडवणा-या सत्यकथा या नियतकालिकाच्या ऑगस्ट १९८२ या अंकाच्या संपादकीयात श्री. पु. भागवतांनी पुढील अपेक्षा व्यक्त केली होती : सत्यकथे च्या कार्याचे मूल्यमापन मराठी समीक्षक व वाङ्मयेतिहासकार आणि अर्वाचीन महाराष्ट्रीय संस्कृतीचे अभ्यासक यथाकाळ व यथायोग्यपणे करतील. श्री. पु. भागवतांची ही अपेक्षा प्रत्यक्षात पूर्ण करण्याच्या उद्देशाने २०२३ या त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात वाङ्मयीन युगान्तर आणि श्री.पु.भागवत या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. मौज साप्ताहिक, सत्यकथा मासिक आणि मौज प्रकाशनगृह ; या तिन्ही विभागांनी वाङ्मय आणि कला या क्षेत्रांत श्री. पु. भागवतांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कार्याचे आणि या तिन्ही विभागांत श्री.पु. भागवतांनी केलेल्या संपादनाचे स्वरूप वस्तुनिष्ठ भूमिकेतून तपासण्याचा हा प्रांजळ प्रयत्न आहे. श्री. पु. भागवतांनी केलेल्या कार्याची गुणवत्ता आणि त्यातील त्रुटी निश्चित कराव्यात, तसेच सत्यकथा आणि मौज प्रकाशनगृह यांच्याद्वारे वाङ्मयीन युगान्तर खरोखरीच घडले काय, हे काटेकोरपणे तपासावे, हेही हेतू या ग्रंथाच्या निर्मितीमागे आहेत. या ग्रंथात ज्यांनी लेखन केलेले आहे, ते सर्व मराठीतील मान्यवर समीक्षक आणि अभ्यासक असून या सर्वांनीच आपले लेखन तटस्थपणे आणि शास्त्रीय लेखनाची शिस्त पाळून केले आहे.
All BooksVanmayeen Ugantar Ani Shri. Pu. Bhagvat | वाङ्मयीन युगान्तर आणि श्री.पु.भागवत
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cartही कहाणी आहे आजच्या काळाची, भोवतालच्या वर्तमानाची अन् या वर्तमानात वावरणार् या व्यक्तींची, समाजाची, जनसमूहाची आणि जनमानसाची. ही कहाणी आहे एका धैर्यवान मुलीची. प्रतिकूल परिस्थितीत जन्म, पण तिच्यावर मात करणारी जिद्द. शिक्षणाने दिलेली क्षमता अन् सामर्थ्य. त्यातून लाभलेल्या आत्मविश्वासातून ती लढायला शिकली. लढा जातिभेदाशी. लढा लोकांच्या पूर्वग्रहांशी. आपली स्वप्नं वास्तवात आणताना येणार् या अडथळ्यांशी. आपलं भविष्य घडवताना त्याला डागाळणार् या वर्तमानाशी. या लढ्यात तिला यश मिळालं का ? या लढ्यात तिला आपल्या जोडीदाराची किती साथ मिळाली ? की वर्तमानातल्या विटक्या रंगांनी तिच्या स्वप्नांना डागाळून टाकलं ? आजच्या समस्यांची गुंतागुंत उलगडत व्यामिश्र वर्तमानाचा वेध घेणारी कादंबरी
All BooksVastavikateche Rang | वास्तविकतेचे रंग
₹340.00Original price was: ₹340.00.₹255.00Current price is: ₹255.00. Save ₹85 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreअन्न-वस्त्र-निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा. कुतूहल ही नैसर्गिक प्रेरणा आणि बुद्धिमत्तेची नैसर्गिक देणगी यांच्या बळावर माणसाने अनेक गोष्टींमागच्या शास्त्राचा शोध घेतला अन् कलात्मक सौंदर्याविष्कार घडवले. कापसासारख्या वनस्पतिज अन् रेशमासारख्या प्राणिज पदार्थांच्या तंतूंच्या धाग्यांपासून मागावर वस्त्र विणणे; त्याला सोन्यासारख्या धातूच्या तारेची जरतारी जोड देणे या साऱ्यांतून साकारलेला वस्त्राविष्कार म्हणजे शास्त्र-कलेचा अनोखा संगम ! कित्येक शतकांची परंपरा, अनेक ज्ञात-अज्ञात विणकरांची प्रतिभा आणि निरीक्षण-अभ्यास-प्रयोगातून जन्मलेली नानाविध तंत्रे यांतून जगभरात विविध रूपांमध्ये वस्त्रनिर्मिती अन् वस्त्रसंस्कृतीचा विकास झाला. दख्खनच्या पठाराच्या पश्चिम भागात अशीच एक देखणी वस्त्रसंस्कृती आकाराला आली. जनजीवनाशी अतूटपणे एकरूप झालेल्या या वस्त्रधाग्यांच्या मोहक प्रतिमा साहित्याच्या कथाकाव्यातून, चित्र-शिल्पांच्या रंगरेषांमधूनही उमटल्या. एका हुन्नरी कलाकाराने, व्यासंगी अभ्यासकाने आणि जाणकार तज्ज्ञाने विविधांगांनी घेतलेला या वस्त्रसंस्कृतीचा वेध.
All BooksVastragatha | वस्त्रगाथा
₹900.00Original price was: ₹900.00.₹675.00Current price is: ₹675.00. Save ₹225 Read more -
Sale! Add to cartअज्ञाताबद्दलचे कुतूहल अन् अज्ञाताचा वेध घेण्याची जिज्ञासा यांमुळे अनेक धाडसी प्रवासी वसुंधरेच्या विविध भागांचा शोध घेत राहिले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अन् पराकाष्ठेच्या जिद्दीमुळे ज्ञानाची नवनवीन क्षितिजे उदयास आली. निर्मिती, व्यवसाय, वितरण, व्यापार, उद्योग, प्रवास, अर्थकारण, धर्मकारण, राजकारण, इतिहास, भूगोल अशा मानवी जीवनाच्या अनेक आयामांवर या शोधयात्रांचा अमिट ठसा उमटला. ज्या भागांतून हे प्रवास घडले; त्या त्या भागांत कला, वास्तू, शिल्प, संगीत, साहित्य, धर्म, जीवनमूल्ये आदींची देवाणघेवाण होत राहिली - कधी सहकार्यातून, तर कधी संघर्षातून. भूगोलाच्या रंगमंचावर इतिहासाचे नाट्य सादर होत असते. या विधानाची प्रचिती देणार् या - आपल्या शोधयात्रांमधून नवा इतिहास घडवणार् या शोधनायकांची गाथा.
All BooksVasundhareche Shodhayatri | वसुंधरेचे शोधयात्री
₹550.00Original price was: ₹550.00.₹413.00Current price is: ₹413.00. Save ₹137 Add to cart -
Sale! Add to cartस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' ही अठरा अक्षरे म्हणजे राष्ट्रभक्तीची अठरा अध्यायांची गीताच ! अटलबिहारी वाजपेयींच्या शब्दांत : सावरकर म्हणजे तेज ! सावरकर म्हणजे त्याग ! सावरकर म्हणजे तप ! सावरकर म्हणजे तत्त्व ! सावरकर म्हणजे तर्क ! सावरकर म्हणजे तळमळ ! सावरकर म्हणजे कविता अन् सावरकर म्हणजे क्रांती !' सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक दुर्लक्षित पैलू विश्वासार्ह कागदपत्रांच्या साहाय्याने उजेडात आणणारा आणि सावरकरांवरील अनेक टीकांचे सज्जड प्रमाणांच्या आधारे निराकरण करणारा मौलिक दस्तऐवज. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला मारिल रिपु जगिंत असा कवण जन्मला
All BooksVeer Savarkar : Phalani Rokhnyachi Kshmata Aslela Mahapurush | वीर सावरकर
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartभारतीय रंगभूमीवर महत्त्वाचे योगदान केलेल्या पंधरा स्त्री-रंगकर्मींना वीस प्रश्नांची एक प्रश्नावली पाठवण्यात आली. दिशादर्शनाच्या हेतूने प्रतिभावंत नाटककार महेश एलकुंचवार यांनी पाठवलेल्या या वीस प्रश्नांची उत्तरे देताना या सर्जनशील रंगकर्मींनी विविध मुद्द्यांवर सुस्पष्ट मते मांडली. या सगळ्या प्रश्नोत्तरांमधून रसिक वाचकालाही या साऱ्या रंगकर्मींच्या व्यक्तिमत्त्वाची अन् कर्तृत्वाची अनोखी ओळख होते. पंधरा कर्तबगार स्त्री-कलावतांच्या तीनशे वेगवेगळ्या उत्तरांचा मागोवा घेणारे... वीस प्रश्न !
All BooksVees Prashna | वीस प्रश्न
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartहे आहे स्वत:च्या निर्णयानं स्वतंत्रपणे एकल राहणा-या स्त्रीचं आत्मकथन. साध्यासुध्या मध्यमवर्गीय कुटुंबातली ही मुलगी. जीवनात लग्न तिनं गृहीत धरलेलंच होतं. तरीही एका टप्प्यावर तिनं एकल आणि स्वतंत्रही राहण्याचा निर्णय घेतला - का? कसा? तिच्या जीवनाची निरनिराळी वळणं दाखवणारं हे आत्मकथन. मुलीचं लग्न होतं, तेव्हा तिचं जीवन समूळ बदलतं; हे सर्वमान्य. पण ती एकटीनं स्वतंत्रपणे राहण्याचा निर्णय घेते तेव्हा? तिचं जीवन कसं बदलतं? काय होतं?
All BooksVivah Nakartana | विवाह नाकारताना
₹430.00Original price was: ₹430.00.₹323.00Current price is: ₹323.00. Save ₹107 Add to cart -
Sale! Add to cartमानवी संस्कृतीतील तत्त्वज्ञानाच्या वाटचालीचा इतिहास म्हणजे विवेक आणि अविवेक यांच्यातील संघर्षाचा इतिहास. हा इतिहास आहे अनेक चढ-उतारांचा, खाचखळग्यांचा. ही वाटचाल आहे काटेरी रस्त्यांची, वादळवाऱ्याची, संघर्षाची, जय-पराजयाची, कधी दिशाहीन, तर कधी उलट दिशेची. अंधाराची पर्वा न करता ठामपणे पावले टाकत ही वाट चालणारे तत्त्वज्ञ म्हणजे मानवाच्या उन्नयनासाठी झटणारे, ही वाट उजळून टाकणारे दीपस्तंभच ! पाश्चात्त्य आणि पौर्वात्य तत्त्वज्ञांची आयुष्ये, त्यांची जडणघडण, विश्वाची, निसर्गाची, मानवी मनाची रहस्ये शोधण्याची त्यांनी केलेली अविश्रांत धडपड या साऱ्याचा वेधक धांडोळा.
All BooksVivekayatree: | विवेकयात्री
₹1,100.00Original price was: ₹1,100.00.₹825.00Current price is: ₹825.00. Save ₹275 Add to cart
Skip to content