All Books
-
Sale! Add to cartसंवेदनशील मनात सतत तरंग उठत असतात - तरंग भावनांचे, तरंग विचारांचे, तरंग कल्पनांचे. एखादी घटना, एखादी व्यक्ती, एखादे निमित्त पाण्यात पडणाऱ्या खड्याप्रमाणे मनात वेगवेगळ्या लाटा निर्माण करते. हे सारे तरंग अन् लाटा इतरांपर्यंतही पोहोचवाव्यात, या उद्देशाने त्यांना शब्दरूप दिले की, त्यातून आकार घेतात छोटेमोठे लेख. प्रगल्भपणे आयुष्याला सामोरे गेलेल्या एका संवेदनशील मनाच्या समंजस स्त्रीच्या लेखणीतून उतरलेले हे लेख म्हणजेच -
All BooksShabdanjali | शब्दांजली
₹175.00Original price was: ₹175.00.₹131.00Current price is: ₹131.00. Save ₹44 Add to cart -
Sale! Add to cartरुग्णावर उपचार करताना आलेल्या निरनिराळ्या अनुभवांतून मिळाला एक अमिट धडा : डॉक्टर आणि पेशंट यांच्या नात्यात विसंवाद निर्माण होण्यास कारणीभूत ठरते वैद्यकीय व्यवसायातील चुरस ! १९८७ साली घडलेली एक सत्यकथा ! वैद्यकीय प्रवेशांमधे होणार् या गोंधळांची ! त्याविरुद्ध आवाज उठवणार् या लढ्याची ! प्रशासन, विद्यार्थी-पालक अन् वृत्तपत्रे यांनी एकमेकांवर आणि न्याययंत्रणेवर टाकलेल्या डावपेचांची ! या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या तज्ज्ञाने घेतलेला वृत्तांतवेध :
All BooksShah Ani Katahah – Vaidykiya Vavsayatil Churas | शह आणि काटशह – वैद्यकीय व्यवसायातील चुरस
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartशहाणा असशील तर कधी लिहू नकोस. लिहिलेस तर कोणाला वाचून दाखवू नकोस, पैसा असेल तर पोटभर खा, नाहीतर उपाशी राहून झाडाप्रमाणे वाळून जा; पण लेखणी आणि कागद यांच्याशी संबंध येऊ देऊ नकोस.... माझा बाप सतत लिहीत असे आणि सकाळी लोकांमध्ये वाटत असे... नंतर कायकाय लिहिले त्याच्या सुरळ्या घेऊन परवा उघड्या तलवारी घेतलेले राक्षसासारखे सैनिक आले. बापाला घेऊन निघून गेले. त्यांनी त्याचे सारे कागद जाळून टाकले व माझा बाप इतका भयंकर आहे हे मला माहीतच नव्हतं. कधी भीतीने बाजूला होत नसत. तो अगदी जवळून चालला तरी अंगणातल्या चिमण्यादेखील परंतु असा हा माणूस म्हणे भयंकर होता, तो लिहीत असताना खिडकीवर पारवा घुमू लागला, तरी त्याला हुसकवण्याऐवजी तो लिहिणे थांबवून स्वस्थ बसे. कारण त्याच्यापासून राजसत्तेला धोका होता. जी. ए. कुलकर्णी 'इस्किलार'मधून
All BooksShahana Asashil Tar Lihu Nakos… | शहाणा असशील तर
₹340.00Original price was: ₹340.00.₹255.00Current price is: ₹255.00. Save ₹85 Add to cart -
Sale! Add to cartशांत मन - The Secrert Of Life हे पुस्तक आपल्याला मन समजून घेण्याचा आणि आयुष्य अधिक संतुलित व आनंदी बनवण्याचा प्रभावी मार्ग दाखवते. या पुस्तकात दैनंदिन जीवनातील गोंधळ, ताण, अपेक्षा आणि जबाबदाऱ्या यामध्ये मन कसे अस्थिर होते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणत्या सवयी अंगीकाराव्यात, याचे वास्तववादी उदाहरणांसह मार्गदर्शन केले आहे. पुस्तकातील प्रत्येक अध्याय वाचकाला जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देतो.
All BooksShant Maan (The Secret Of Life) | शांत मन (The Secret of Life)
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartशेपटी हा अनेक प्राण्यांच्या शरीराचा महत्त्वाचा आणि अतिशय उपयुक्त अवयव आहे. ठरावीक प्राण्यांनाच हा अवयव का मिळाला ? शेपटीचे काय काय उपयोग असतात ? शेपटी नसती, तर त्यांना जगता आले असते का ? चला, या पुस्तकात शोधू या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे. शेपटीच्या गोष्टी
All BooksShepteechya Goshtee | शेपटीच्या गोष्टी
₹60.00Original price was: ₹60.00.₹45.00Current price is: ₹45.00. Save ₹15 Add to cart -
Sale! Add to cartशिदोरी म्हणजे संचित. माणसाच्या सोबत असलेली हक्काची मीठ - भाकर. आपल्या आयुष्यातील उत्कट, कातर अनुभवांनी दिलेलं शहाणपण. जगण्याच्या प्रवासात आलेल्या घटनांनी दिलेली सार्थ शिकवण हीसुद्धा शिदोरीच. कधी संदेशाच्या रूपात, कधी आशीर्वादाच्या रूपात. शिदोरी भूक भागवतेच, पण ती तुम्हाला आधार देते, बळ देते, ऊर्जा देते, चैतन्य देते. विचारांची शिदोरी पडताना सावरते, गोंधळताना स्थिर ठेवते, निराशेत मनावर फुंकर मारते आणि अतिविश्वासाच्या, अतिउन्मादाच्या वेळी आपल्याला लगामही घालते. हातांचे पंख करण्याची ताकद शिदोरीत असते , काट्यांकुट्यांतून वाट काढण्याचं शहाणपण शिदोरीत असतं आणि अतिउत्साहात भरारी घेण्याची अतिशयोक्त रिस्क घेताना थोपवण्याचं चतुरपणही शिदोरीत असतं. ऊर्जेनं भरलेली, सकारांनी गजबजलेली, आत्मविश्वासानं सजवलेली आणि बंधुभावनेनं बहरलेली. विचारांची भूक लागलेल्यांना पोटभर देणारी.. या पुस्तकाचं पान न् पान उलगडताना, डॉ. सुरेश हावरे यांचा तेजानं भरलेला, मदतीच्या भावनेनं कृपामय झालेला, साऱ्या बांधवांसाठी उत्कर्षाचं, उद्धाराचं पसायदान मागणारा 'हसतमुख चेहरा' दिसत राहतो, ही या विचारांची एक उजवी बाजू आहे. अरुण म्हात्रे
All BooksShidori Part2 | शिदोरी भाग २
₹230.00Original price was: ₹230.00.₹173.00Current price is: ₹173.00. Save ₹57 Add to cart -
Sale! Add to cartअनघड शैलीतले हे पुस्तक वाचताना आपल्याला गेल्या पिढीतील एक कलंदर, जिद्दी कार्यकर्ता आणि त्याच्या ध्यासात तितक्याच तन्मयतेने सहभागी होणारी त्याची पत्नी भेटते. डोमरीसारख्या आडवळणी गावात 'गुरुकुल' चालवण्याचा सुदामकाका आणि सिंधूमामींनी घेतलेला निर्णय हिशोबी शहाणपण बाळगणाऱ्या जगाला पटणे अवघड आहे. पण नवनिर्मितीसाठी बऱ्याचदा हिशोबी शहाणपणापेक्षा बेहिशोबी वेडेपणाच गरजेचा असतो, याची आठवण हे पुस्तक वाचताना परत एकदा होते. नीलेश निमकर
All BooksShikshnachya Ovya | शिक्षणाच्या ओव्या
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartमुंबई महाराष्ट्रात आहे, पण मुंबईमध्ये महाराष्ट्र नाही - ही विदारक वस्तुस्थिती आहे. ही स्थिती बदलण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली समर्पित भावनेने कार्य करणार् या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची कामगिरी अतुलनीय अशीच आहे. मुंबईत महाराष्ट्र वाढीस लावणार् या व मराठीकरणाचे तेजस्वी कार्य करणार् या लोकाधिकारच्या कार्याचा जेवढा गौरव करावा तेवढा कमीच आहे. -- वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज
All BooksShivsena, Lokadhikar Ani Mee | शिवसेना, लोकाधिकार आणि मी
₹340.00Original price was: ₹340.00.₹255.00Current price is: ₹255.00. Save ₹85 Add to cart -
Sale! Add to cartआपल्या जीवनात अनेक माणसं सामील होत असतात. त्यांचे आपल्याशी होणारे वेगवेगळ्या पातळीवरचे खुले व मूक संवाद रुजवतात अनेक दृश्य आणि अदृश्य नाती. आणि माणसंच कशाला? झाडं, फुलं, पानं, रानं, पक्षी, प्राणी, एवढंच नव्हे, तर गाणी, घरं आणि रस्तेसुद्धा एकेका समृद्ध व्यक्तिमत्त्वाची धनी असतात! ह्यातील सार् या व्यक्तींशी (वल्लींशी!) आणि वृक्ष-वल्लींशी एकरूप होताना त्यांच्या चांदणस्पर्शानं लेखिकेच्या जगण्याला नवा आयाम मिळाला आणि तिच्या लेखणीला शब्दांची पालवी फुटली. त्या पालवीचे अन् मोहोराचे रंग ल्यालेल्या अम्लान, नितळ व्यक्तिचित्रांनी आणि निसर्गचित्रांनी सजलेलं एक नितांतसुंदर दालन :
All BooksShodh Aaraspani | शोध आरस्पानी
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartशेती आणि पशुपालन हे माणसाचे अगदी पुरातन काळापासून अस्तित्वात असलेले व्यवसाय. शेतीसंबंधीची निरीक्षणे आणि प्रयोग माणूस प्राचीन काळापासून करत आला आहे. भारतातही वैदिक कालखंडापासून अनेक ऋषिमुनींनी शेतीविषयक विविध विषयांना गवसणी घालणारी ग्रंथरचना केली. कृषिपराशर, वृक्षायुर्वेद, उपवनविनोद अशा अनेक बहुमोल ग्रंथांचा धांडोळा घेऊन शेतीविषयक तंत्र आणि विज्ञानाचा शोध, वाचन, अभ्यास, प्रयोग या चतु:सूत्रीच्या निकषांवर आधुनिक दृष्टिकोनातून वेध घेणारा ग्रंथ.
All BooksShodh Ani Bodh | शोध आणि बोध
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart
Skip to content