All Books
-
Sale! Add to cartपाणी ही जगण्यासाठीची आपली मूलभूत गरज आहे; मात्र या नैसर्गिक संपत्तीचा पृथ्वीवरचा साठा मर्यादित आहे. पाणी आपल्या शरीराला कोणकोणत्या प्रकारे गरजेचे आहे, इतर सजीवांना त्याची काय मदत होते आणि ते काटकसरीने वापरले नाही, ते स्वच्छ ठेवले नाही, तर काय होईल? चला, जाणून घेऊ या पाण्याविषयी सगळे काही !
All BooksPani Sarvansathi | पाणी सर्वांसाठी
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cart१९६२ च्या गलवान येथील लढाईत सशक्त नेतृत्वाचे प्रदर्शन करीत केलेले पराकोटीचे प्रयत्न आणि त्यानंतर एक युद्धकैदी - एवढीच कर्नल श्रीकांत हसबनीस यांची ओळख नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी कितीतरी पैलू या आत्मकथनातून शब्दांकित झाले आहेत. त्यांचे पूर्वज - पेशव्यांच्या सैन्यातील शंकराजी फडके हे वसईच्या लढ्यात मर्दुमकी गाजवलेले शूर सेनानी. या पराक्रमी सेनानीचा वारसा आणि विठ्ठलमाउलीवरची अपार भक्ती यांचे एक आगळेवेगळे रसायन ज्यांच्या धमनीतून वाहत होते, ते नाना आणि त्यांची अर्धांगिनी होऊन घेतलेला वसा पुरेपूर निभावून नेणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुजाता हसबनीस यांचा एकत्रित जीवनप्रवास एक वेगळे जीवनस्तोत्र शिकवून जातो. ज्यांच्याकडून भक्ती आणि शौर्याचे बाळकडू घेतले, ते आईवडील व हाच वारसा पुरेपूर निभावणारी त्यांची संतती अशा या संपूर्ण हसबनीस घराण्याचा जीवनप्रवास म्हणजे परि तुझा मुद्रांकित'ची कहाणी. -श्रीमती वसुधा माझगावकर
All BooksPari Tuza Mudrankit | परी तुझा मुद्रांकित
₹360.00Original price was: ₹360.00.₹270.00Current price is: ₹270.00. Save ₹90 Add to cart -
Sale! Add to cartआपण सर्व निसर्गाची बाळे आहोत. निसर्ग प्रत्येकाला पुरेसे देतो. तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या, अशी निसर्गाची शिकवण आहे. ही शिकवण जो पाळत नाही, त्याला अद्दल घडते. वाचू या, हा संदेश देणारी परक्या फुलांची गोष्ट
All BooksParkya Phulanchi Gostha | परक्या फुलांची गोष्ट
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartपर्यावरणरक्षणात पक्ष्यांची भूमिका महत्त्वाची आहे. परिसराच्या सफाई- स्वच्छतेपासून हवामानबदलाचा संदेश देण्यापर्यंत अनेक प्रकारची मदत पक्षी करत असतात. चला, या पुस्तकात अशा वेगवेगळ्या मित्रपक्ष्यांची ओळख करून घेऊया. पर्यावरणाचे रखवालदार
All BooksParyavarnache Rakhvaldar | पर्यावरणाचे रखवालदार
₹35.00Original price was: ₹35.00.₹26.00Current price is: ₹26.00. Save ₹9 Add to cart -
Sale! Add to cartप्रवरा-म्हाळुंगीचा स्वच्छंद तीर, देखणं संगमनेर, मायेचं घर, शालेय जीवन, तारुण्याचे दिवस अशी गोष्ट विवेक गाडगीळ सांगतात आणि तत्कालीन समाज, कुटुंब, गाव यांचा एक मौलिक ऐवज साकारत कथा पुढे जाते... मग एक होतकरू तरुण अभियंता आपल्या नवपरिणीत पत्नीला घेऊन अजस्र बांधकामक्षेत्राच्या नोकरीत पंचमहाभूतांशी नित्य नवी झुंज घेतो. आपल्या अफाट कर्तृत्वाने दक्षिण भारताचा सागरतीर, हिमालयाचे नि:शब्द पहाड, इराकची युद्धभूमी, अग्निभूमी, जीवनमरणाच्या निसरड्या वाटा यात एक चैतन्य फुलवतो. मानवी अस्तित्वाशी सगळे एकेक कडीने जोडतो, जणू जीवन फुलवणारे...
All BooksPashanache Pazar | पाषाणाचे पाझर
₹950.00Original price was: ₹950.00.₹713.00Current price is: ₹713.00. Save ₹237 Add to cart -
Sale! Add to cartगेली सात दशकं मराठी साहित्यविश्वात डौलदार वाटचाल करणारी प्रकाशनसंस्था राजहंस प्रकाशन . गेली चाळीस वर्षं राजहंस चं सुकाणू समर्थपणे सांभाळणारे कप्तान दिलीप माजगावकर. अशा दिलीप माजगावकरांचा विविध नामवंतांशी या ह्रदयीचे त्या ह्रदयी घातले असा चिंतनशील, भावगर्भ पत्रसंवाद : सप्रेम नमस्कार . राजहंस च्या वाटचालीचं विस्तृत सिंहावलोकन करणारी आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रपटाचा गेल्या पाऊण शतकाचा मागोवा घेणारी दिलीप माजगावकरांची प्रदीर्घ मुलाखत : प्रवास श्रेयसाकडे . दिगमा या चतुरस्र अन् लोभस व्यक्तिमत्त्वाला न्याहाळणारे त्यांच्या सुह्रदांचे लेख : असे दिसले दिगमा . या सा-याचा अंतर्भाव असलेलं महाराष्ट्राच्या साहित्यिक अन् सांस्कृतिक संचिताच्या इतिहासाचा जणू तुकडा वाटणारं पत्र आणि मैत्र ------------------------------------------------ गेली सात दशकं मराठी साहित्यविश्वात डौलदार वाटचाल करणारी प्रकाशनसंस्था राजहंस प्रकाशन . गेली चाळीस वर्षं राजहंस चं सुकाणू समर्थपणे सांभाळणारे कप्तान दिलीप माजगावकर. दिलीप माजगावकरांनी विविध प्रसंगी प्रकाशनासंबंधी अनुभवसिद्ध मतं मांडली आणि व्यवसायाच्या भवितव्याचा वेध घेतला. त्यांच्या वाणीनं विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्ती आणि साहित्यकृतींचा आस्थेवाईकपणे शोध घेतला. त्यांच्या अशा निवडक रसाळ भाषणांचं संकलन : अवधारिजो जी ! अनेकांच्या लेखनावर प्रकाशझोत टाकणाऱ्या दिलीप माजगावकरांची स्वतःची लेखणीही टोकदार, टवटवीत आणि आशयसंपन्न असल्याचं अधोरेखित होतं ते त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांतून. त्यांनी आंतरिक जिव्हाळ्यानं रेखाटलेली बारा विलक्षण व्यक्तिचित्रं. अंतरीचे उमटे बाहेरी व्यक्तिचित्रं आणि भाषणांतून उलगडलेला महाराष्ट्राच्या साहित्यिक व सांस्कृतिक संचिताचा छोटा पट वाणी आणि लेखणी
All BooksPatra Aani Maitra | पत्र आणि मैत्र
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart -
Sale! Add to cartफिनिक्स ही कादंबरी नाही. आणि ती कुणाची प्रेरक यशोगाथाही नाही. जीवनातल्या एका आघातातून विस्कटलेल्या आयुष्याची घडी बसवण्याच्या प्रवासाचे हे एक वस्तुनिष्ठ वर्णन आणि दर्शन आहे. हा प्रवास सांगणाऱ्याला आणि लिहिणाऱ्याला कुणाचाही राग नाही, लोभही नाही. जे घडलं ते जसंच्या तसं सांगण्याची प्रबळ इच्छा आहे. मानसिक धक्क्यातून सावरायला लागलेला वेळ, मग निराशा, परावलंबित्व आणि त्यातून बाहेर पडण्याच्या जिद्दीतून जन्माला आलेली ध्येयासक्ती या मनाच्या प्रवासाचं या पुस्तकामध्ये तपशीलवार वर्णन आहे. कुठलंही भावनिक प्रदर्शन न करणारं असं लेखन वाचायला मिळणं ही आजच्या वाचकाची गरज आहे. आणि ती गरज भागवल्याबद्दल मेघा आणि धनंजय यांचे मनापासून आभार. ज्या तटस्थपणे ते लिहिलं गेलं आहे, त्याच तटस्थपणे वाचकांनी ते वाचावं, अशी माझी इच्छा आहे. डॉ. मोहन आगाशे प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ ----------------------------------------- आपल्या आयुष्यातील एखादा प्रसंग अगर क्षण आपल्यापासून काय काय हिरावून घेऊ शकतो आणि ते हिरावून घेतल्यानंतर जेव्हा आपल्यापाशी जगण्याची उमेद राहत नाही; तेव्हा अचानक एक उमेदीचा जिवंत झरा आपल्यात आहे, ह्याची जाणीव कळत नकळत होत असताना पुन्हा एकदा आपल्या पायावर भक्कमपणे उभं राहण्याची ही गोष्ट. एक प्रकारे आपल्याला आपल्या आत डोकवायला लावणारी आणि आपल्यातल्या अपार शक्तीचे दर्शन घडवणारी. अत्यंत परिणामकारक आणि तरी साध्या भाषेत तुमच्याशी संवाद साधणारी आणि तुमच्यातल्या एकाकी माणसाला साथ देणारी अशी ही एका फिनिक्स माणसाची अनवट यात्रा! ह्यातल्या धनंजयना आणि त्यांना जवळून साथ देणाऱ्या मेघाला सलाम! सागर देशमुख प्रख्यात अभिनेता, लेखक, दिग्दर्शक ----------------------------------------- काट्याचा नायटा व्हावा, तशी एका साध्या अपघातातून अनंत यातनांची मालिका सुरू झालेली धनंजयची ही कथा. त्याच्या सहनशीलतेची परीक्षा घेणाऱ्या वेदनांचा प्रवास वाचताना नकळत डोळ्यातून अश्रू ओघळतात. त्याची जिद्द, डॉक्टरांची आपुलकी, फिजिओथेरपीचे विलक्षण अनुभव आणि कुटुंबीयांची खंबीर साथ बघून मन अचंबित होते. धनंजयची वाटचाल ही सामान्यातून असामान्याकडे घेतलेली झेप आहे. आणि त्याची आंतरिक खळबळ डॉ. मेघा देऊसकर यांनी अशी शब्दबद्ध केली आहे की, पुस्तक एकदा वाचायला घेतले की, खाली ठेवावे असे वाटत नाही. स्वामिनी विक्रम सावरकर समाजसेविका, लेखिका
All BooksPhoenix | फिनिक्स
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartदक्षिणगंगा गोदावरी. तिच्यावर बांधलेलं गंगापूर धरण. या धरणाची भिंत फोडण्याचा दहशतवादी कट शिजला. नाशिक शहर पूर्णपणे उद्ध्वस्त करू पाहणारं हे भयानक कारस्थान. कोण होते हे दहशतवादी? कसं विणलं त्यांनी हे कुटिल जाळं? त्यांचा छडा लागला का? की आजही त्यांची छुपी कारवाई चालूच आहे? नाशिकवरची ही टांगती तलवार हटली की नाही? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं देणारं - वेगवान नाट्यमय घटनाप्रवाहात वाचकाला खेचून नेणारं - अनपुटडाउनेबल थ्रिलर!
All BooksPhulpakharu | फुलपाखरू
₹240.00Original price was: ₹240.00.₹180.00Current price is: ₹180.00. Save ₹60 Add to cart -
Sale! Add to cartसिने-दिग्दर्शक, सिनेविद, सिनेअध्यापक, लेखक अरुण खोपकर यांचे प्राक्-सिनेमा हे त्यांच्या कलाविचारांच्या त्रयीतील अनुनाद व कालकल्लोळ नंतरचे अप्रतिम पुस्तक आहे. सिनेमाने अवघ्या सव्वाशे वर्षांच्या आयुष्यात मानवी जीवनावर सखोल परिणाम केला आहे. हजारो वर्षांच्या कालावधीत उत्क्रान्त झालेल्या मानवी कलांना आणि विज्ञानाला अंगभूत करून घेण्याची शक्ती त्याने कमावली आहे. आदिमानवाने काढलेली गुहाचित्रे, जादूटोणा, पाषाणशिल्पे, प्राचीन वास्तू, लोककला, धार्मिक विधी, नृत्य, नाट्य, संगीत, साहित्य इ. यांच्या प्राचीन ते आधुनिकोत्तरपर्यंतच्या प्रयोगांची सारतत्त्वे सिनेमात आहेत. ती सुगम भाषेत उलगडून सिनेमाचे हे अनेक अवतार जोडणारे पुस्तक म्हणजे प्राक्-सिनेमा . चित्रपटनिर्मितीचा अनुभव आणि जगभरच्या प्रवासातले अभिजात वास्तूंचे, कलाकृतींचे संवेदनशील अवलोकन यांना चिंतनाची चौकट लाभल्याने मांडणी भरीव आणि तर्कसिद्ध झाली आहे. चर्चित वास्तूंत व वस्तूंत अजिंठा-घारापुरीची लेणी व दक्षिण भारतातील मंदिरे, मध्य आशियातल्या मशिदी, युरोपातली प्राचीन व आधुनिक चर्चेस आणि अत्याधुनिक दृक्-कलांची उदाहरणे आहेत. लेओनार्दोच्या जोडीला पर्शिअन व मोगल मिनिएचर्स आहेत. मातिस व पिकासो आहेत. कथकली आणि भरतनाट्यमबरोबर विविध भाषांतल्या साहित्यकृतींचे विश्लेषणही आहे. अभिजात सिनेमाच्या विकासातील सर्व कलांचा व शास्त्रांचा लक्षणीय सहभाग इथे अलगदपणे मांडला आहे. साकल्याने विचार करण्याच्या खोपकरांच्या आग्रही भूमिकेमुळे आणि आयुष्यभराच्या शोधवृत्तीमुळेच सिनेमामागचा सिनेमा उलगडण्याचा हा प्रयत्न साकार झालेला आहे. अशा स्वरूपाचे पुस्तक भारतातच काय, जागतिक वाङ्मयातही अनन्य ठरावे ! चंद्रकांत पाटील
All BooksPrak-Cinema | प्राक सिनेमा
₹800.00Original price was: ₹800.00.₹600.00Current price is: ₹600.00. Save ₹200 Add to cart -
Sale! Add to cartउत्साह देणाऱ्या दिवसाला पाहून अंधाराला काय वाटतं ? वर्षानुवर्षं एकाच जागी साचून असलेल्या तळ्याचं आयुष्य कसं आहे ? जंगलं, झाडी कमी झाल्यामुळे घर हरवलेल्या प्राण्यांना काय वाटतं ? पशू-पक्षी संपावर गेले तर काय होईल ? या पुस्तकातल्या कविता वाचू या आणि अशा सगळ्या प्रश्नांची काय उत्तरं मिळतायत पाहू या-
All BooksPrem Karoo Ya Pruthvivar | प्रेम करू या पृथ्वीवर
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart
Skip to content