स्थापत्य आणि नगररचना
-
All Books
Goshta Mumbai Firebrigadechi | गोष्ट मुंबई फायरब्रिगेडची
₹150.00Original price was: ₹150.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cart'महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणा-या कोयना धरणाची ही कथा आहे. एका आधुनिक तीर्थक्षेत्राच्या उभारणीची ही कथा प्रकल्पासाठी जमीन देणा-या शेतक-याचीही आहे आणि धरण बांधून वीजिनिर्मिती करणा-या कल्पक अभियंत्याचीही आहे. एका तांत्रिक प्रकल्पाची उभारणी होत असताना कोणकोणते समरप्रसंग उभे राहतात, निसर्ग रचनेत फेरफार केले जात असताना कोणकोणती संकटं सामोरी येताता आणि जिद्दी माणसं त्या सर्व आव्हानांवर मात करून कशी पुढं जातात, याची ही अत्यंत साध्या सोप्या भाषेत करून दिलेली ओळख आहे. सामान्य वाचकांनाही सहज समजेल पण जिज्ञासूंचं कुतूहलही जागं करील, अशी ही मानव आणि निसर्ग यांच्यातील नव्या नात्याची, जिव्हाळ्याची आणि रुसव्याफुगव्याचीही एक कथा आहे.
All BooksKahani Koynechi | कहाणी कोयनेची
₹100.00Original price was: ₹100.00.₹70.00Current price is: ₹70.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cart'दळणवळणाचं मुख्य साधन म्हणून रेल्वेची निर्मिती झाली... यामुळे व्यापार-उदीम सोपा झालाच, पण प्रवासालाही गती मिळाली... आपल्या माणसांमध्ये येण्यासाठी एक वेगवान मार्ग माणसानं निर्माण केला... आणि रेल्वे माणसाच्या भावनांशी जोडली गेली. कशी निर्माण झाली ही धूर सोडणारी गाडी, तिचे मार्ग, तिची यातायात, देखभाल... हा संपूर्ण गाडा चालतो तरी कसा... याचं कुतूहल आजही तितकंच आहे, गावं आणि राज्यांमधून देशाला जोडणारी ही रेल्वे अद्याप नवेनवे प्रयोग करतेच आहे. अशा या भारतीय रेल्वेची गोष्ट सांगणारं पुस्तक...
All BooksRomanchkari Railway | रोमांचकारी रेल्वे
₹100.00Original price was: ₹100.00.₹70.00Current price is: ₹70.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cartसेतु बांधियला सागरी छत्रपती शिवाजी टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया ही बांधकामं आजवर मुंबई शहराची ओळख मानली जात होती. आता त्यांत वांद्रे-वरळी सागरी सेतूची महत्त्वाची भर पडली आहे. या पुलानं उपलब्ध करून दिलेली सोय तर महत्त्वाची आहेच, पण त्याचं दर्शनी रूपही अत्यंत आकर्षक आहे. सर्वांत आकर्षक आहे तो मध्यभागीचा रज्जुसेतू. १२६ मीटर उंचीच्या मनो-यावरून दोन्ही बाजूंना तिरप्या उतरत जाणा-या दोरखंडांनी हा ६०० मीटर लांबीचा पूल तोलून धरला आहे. पुलाला उचलून धरणा-या या मजबूत दोरखंडांनी जणू पूर्व दिशेला नमस्कार केला आहे, अशी काहीशी भावना बघणा-याच्या मनात येते. ब्रिटिश काळातील बांधकामांच्या नंतर आपल्या देशात काही भव्यदिव्य बांधलं गेलंच नाही, अशी टीका करणा-यांना भारतीय अभियंते, कंत्राटदार, मजूर यांनी दिलेलं हे निःशब्द पण बिनतोड उत्तर आहे... कुणाही भारतीयाला अभिमान वाटावा, असं ! त्या देखण्या सागरी सेतूच्या उभारणीची ही सचित्र सुरस कथा.
All BooksSetu Bandhiyala Sagari | सेतु बांधियला सागरी
₹160.00Original price was: ₹160.00.₹112.00Current price is: ₹112.00. Save ₹48 Add to cart -
Sale! Add to cart'शहरे मुळातच गुंतागुंतीची, विक्षिप्त आणि बेभरवशाची ज़मीन, उद्योग आणि माणसे या तीन घटकांमधून घडणारी, घडता घडता बिघडणारी आणि बघता बघता सुधारणारीही. आजची आपली शहरे म्हणजे गर्दी, बकालपणा आणि असुरक्षितता यांच्या विळख्यात सापडलेल्या बेशिस्त वस्त्याच. त्यांना पुनश्च: रुळावर आणण्यासाठी मिळाली आहे. जादूची छडी स्मार्ट तंत्रज्ञान ! आता गरज आहे ती स्मार्ट नागरिक, स्मार्ट प्रशासन, द्रष्टे नेतृत्व आणि प्रबळ सामूहिक इच्छाशक्ती यांची. हीच स्मार्ट तंत्रज्ञानाची छडी वापरून अनेक शहरे स्मार्टपणाच्या वाटेवर खूप पुढे निघून गेली आहेत. त्यांचे अनुभव आणि आपली नागर वैशिष्टये यांचे भान ठेवून आपल्याला स्वत:च्या वाटा शोधायच्या आहेत. हे कसे साधायचे, याचा मंत्रजागर म्हणजे स्मार्ट सिटी सर्वांसाठी
All BooksSmart City- Sarvansathi | स्मार्ट सिटी – सर्वांसाठी
₹350.00Original price was: ₹350.00.₹245.00Current price is: ₹245.00. Save ₹105 Add to cart -
Sale! Add to cart' शहरे ही माणसाची सर्वोत्तम निर्मिती आहे . शहरेच माणसाच्या सर्जनशीलतेला ऊर्जा पुरवतात, माणसातील कल्पकतेला आणि उद्योजकतेला खतपाणी घालतात, त्याच्या सहनशीलतेला आणि लवचीकतेला धार चढवतात. लोकशाहीचा पाया शहरांनी घातला आणि तीच लोकशाहीला बळकट करतात. म्हणूनच शासनकर्त्यांनी आपली शहरे रावांपासून रंकांपर्यंत सर्वांसाठी स्वागतशील बनवायची असतात. आपले हे विचार प्रत्यक्षात आणण्याचा मूलमंत्र जगाला देणाऱ्या अंतोनी व्हिवस या राजकारण्याचे अनुभवकथन ... '
All BooksTumhi Bi Ghada Na | तुम्ही भी घडा ना
₹400.00Original price was: ₹400.00.₹280.00Current price is: ₹280.00. Save ₹120 Add to cart
