संकीर्ण
-
संकीर्ण
Mumbaicha Annadata | मुंबईचा अन्नदाता
₹125.00Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31 Add to cart -
Sale! Add to cartरूढ अर्थानं ज्यांना सेलिब्रिटी म्हणता येणार नाही, अशी अनेक मराठी मंडळी वेगळ्याच वाटेनं चालत असतात. प्रसिद्धी, मानसन्मान, त्यातून मिळणारा पैसा या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपल्या मनाला पटेल, आवडेल ते काम ही मंडळी स्वान्त सुखाय करीत राहतात. विश्वसंवाद या मराठीतल्या पहिल्या पॉडकास्टवर येऊन गेलेल्या अनेक पाहुण्यांपैकी काही निवडक पाहुण्यांशी झालेल्या गप्पांवर आधारित हे पुस्तक. पॉडकास्ट ते पुस्तक अशा माध्यमांतराचंही मराठीतलं हे पहिलंच उदाहरण. गेल्या चार-पाच वर्षात पॉडकास्टींग या माध्यमानं मराठीच नव्हे तर इतरही अनेक भारतीय भाषांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. मराठीमध्ये या माध्यमाची ओळख करून देण्यात विश्वसंवाद चा हातभार लागला याचा अतिशय आनंद वाटतो. हे पुस्तक वाचून आणि विश्वसंवाद च्या यू-ट्यूब चॅनेलवरील इतर मुलाखती ऐकून मराठी वाचकांमध्ये या माध्यमाची आवड निर्माण झाली, आणि त्याही पुढे जाऊन कुणी स्वतःचा पॉडकास्ट सुरु केला तर या धडपडीचं सार्थक झालं असं वाटेल.
All BooksNivadak Vishwasavaad | निवडक विश्वसंवाद
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more' पातंजलयोगदर्शन - एक अभ्यास -- विविध संदर्भग्रंथांचा समावेश केल्यामुळे हा अभ्यासग्रंथ अतिशय श्रीमंत झाला आहे. ज्या आनंदापासून तो उमलला आहे, त्या आनंदाचे शिंपण लेखकाच्या शब्दातून होत आहे. आनंद ॠषींची भाषाशैलीही अलंकृत व नितळ आहे. त्यांच्या झरणीतून अनेक वेळा ओशोंचा झरा वाहतो आणि वाचक स्वत:ला विसरून त्यात डुंबायला लागतो. -मा अमृत साधना फीचर संपादक, ओशो टाइअिम्स, पुणे. --आनंद ॠषींनी--विषयाची उकल करताना दुर्बोधता, क्लिष्टता, संस्कृतप्रचुरता टाळून जास्तीत जास्त सुलभ व सोप्या शैलीत विषयाची मांडणी, अनेक उदाहरणांसहित केली आहे.-- हा ग्रंथ वाचनीय, मननीय व चिंतनीय आहे, यात शंका नाही. --योगायार्च श्रीकृष्ण व्यवहारे संपादक, ठाणे -योगतरंग, ठाणे. --डॉ. मिकाओ उसुई यांच्या रेकी या योगोपचार पध्दतीचा पातंजल योगावरच्या ग्रंथात समावेश करणारे आनंद ॠषी हे पहिलेच लेखक असावेत. आनंद ॠषींनी योगशास्त्राबाबत मूलभूत विचार करून, सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक इत्यादी विविध दृष्टिकोनातून योगसूत्रांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रंथ वाचनीय व्हावा याकडे त्यांनी विशेष लक्ष पुरविले आहे. - डॉ. अर्जुनदास बात्रा (निवृत्त) तत्त्वज्ञान - प्राध्यापक पुणे विद्यापीठ. --योगसूत्रांच्या अर्थाच्या सूक्ष्म छटा, अध्याहृत अर्थ उलगडून दाखविण्यात लेखक यशस्वी झाला आहे. लेखकाचा हा सखोल अभ्यास ओशोंच्या अंतर्बोधावर आधारलेला असल्यामुळे, प्रस्तुत युगाच्या संदर्भात तो समकालीन आहे. --स्वामी सत्य वेदांत कुलगुरू, ओशो मण्टिवर्सिटी, पुणे. '
संकीर्णPatanjal Yogdarshan | पातंजल योगदर्शन
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Read more -
Sale! Add to cartकृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही..... मराठी साहित्यसंस्कृतीच्या ओघामध्ये अनेक अर्थांनी तितकंच जिव्हाळ्याचं निधान बनलेले पुलही आता राहिले नाहीत..... म्हणून मनामनांत तीच वेदना, तीच खंत तीच हुरहुर..... तिला थोडक्यात व्यक्त करणारी आकाशवाणी पुणे केंद्रावरील आशयसंपन्न भाषणमाला आता छापील रूपात. पुरूषोत्तमाय नम:
संकीर्णPurushottamaya Namah | पुरुषोत्तमाय नम:
₹55.00Original price was: ₹55.00.₹41.00Current price is: ₹41.00. Save ₹14 Add to cart -
Sale! Add to cartप्रिय मधू गानू, तुमचे लेखन सरळ, साधे, नितळ, निरपेक्ष आणि आतल्या ऊर्मीने लिहिलेले, उत्स्फूर्त आहे. खरे आहे. लेखनाचा विषय झालेली माणसे आणि वाचक यांच्यामध्ये लेखकाचे लेखनकौशल्य उभे नाही. म्हणून आम्हांला वाटले की, या लेखांचे पुस्तक निघाले पाहिजे. पंचाहत्तरी हे निमित्त. विजय तेंडुलकर
संकीर्णSahwas Gunijanancha | सहवास गुणीजनांचा
₹60.00Original price was: ₹60.00.₹45.00Current price is: ₹45.00. Save ₹15 Add to cart -
Sale! Add to cartअथ संवादकौशल्यम् संवादाने मते मांडावीत संवादातून मने सांधावीत संवादाने आश्वस्त करावे संवादातून विकल्प मिटवावे संवाद सकारात्मक, हेच यशाचे गमक संवादकौशल्य, उत्तम व्यक्तिमत्त्वाचे सूचक हेच सारे सविस्तर मांडणारे पुस्तक. भाषण, संभाषण, वाद, संवाद, नॅरेशन, प्रेझेंटेशन अशा सर्व ठिकाणी खात्रीने उपयोगी पडणारे. संवाद मार्गदर्शकच जणू !
All BooksSanvaadatun Vyaktimattvakade | संवादातून व्यक्तिमत्वाकडे
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartअथ संवादकौशल्यम् संवादाने मते मांडावीत संवादातून मने सांधावीत संवादाने आश्वस्त करावे संवादातून विकल्प मिटवावे संवाद सकारात्मक, हेच यशाचे गमक संवादकौशल्य, उत्तम व्यक्तिमत्त्वाचे सूचक हेच सारे सविस्तर मांडणारे पुस्तक. भाषण, संभाषण, वाद, संवाद, नॅरेशन, प्रेझेंटेशन अशा सर्व ठिकाणी खात्रीने उपयोगी पडणारे. संवाद मार्गदर्शकच जणू !
All BooksSanvaadatun Vyaktimattvakade | संवादातून व्यक्तिमत्वाकडे
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartनिसर्गातील कोणत्याही जातीला वाचविण्याचा खात्रीलायक मार्ग माणसाला सापडणं ही जागतिक महत्वाची गोष्ट् आहे. कारण निसर्गातले जीव माणूस नेहमीच नष्ट करीत असतो. एखादा नवीन जीव निर्माण करणं मात्र त्याला शक्य होत नाही. तेव्हा आहेत ते सर्व जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करणं एवढंच त्याच्या हाती उरतं. सायबेरिया ते भरतपूर असा लांब पल्याचा परतीचा प्रवास करणा-या देखण्या क्रौंच पक्षांना वाचवण्यासाठी त्यांचा मागोवा घेत भारत, अमेरिका आणि रशियातील पक्षीतज्ञांनी केलेल्या अथक प्रयत्नांची एका निसर्गप्रेमी, संवेदनाशील मनाने केलेली टिपणे.
संकीर्णSayberiyatil Shodh | सायबेरियातील शोध
₹45.00Original price was: ₹45.00.₹34.00Current price is: ₹34.00. Save ₹11 Add to cart -
Sale! Add to cartअणुवैज्ञानिक म्हणून प्रसिध्द असणारे सुरेश हावरे शिर्डीच्या श्री साईसंस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्षही आहेत आणि अनेक नवोद्योगांना प्रेरणा देणारे यशस्वी उद्योजकही आहेत. विज्ञानातील विवेक आणि श्रद्धेतील सेवाभाव यांची सुयोग्य सांगड घातली की, सत्कार्याला कसे असंख्य धुमारे फुटतात, याचे त्यांनी घडवलेले दर्शना कल्पक तर आहेच, पण प्रयत्नवादाला प्रोत्साहक असे पाठबळ देणारेसुध्दा आहे. गेल्या काही वर्षांत विविध ठिकाणी, निरनिराळ्या प्रसंगी त्यांनी केलेल्या भाषणांमुळे अनेकांना यशाचा मूलमंत्र गवसला. कित्येकांना जीवनातील सुखासमाधानाची गुरुकिल्ली मिळाली. ज्यांनी ज्यांनी ही भाषणे ऐकली, ते ते सारे प्रभावित झाले. त्या भाषणांमध्ये विखुरलेले संस्कारधन संकलित स्वरूपात अधिक व्यापक प्रमाणावर उपलब्ध होण्याची गरज जाणवली. समाजातल्या धडपडणाऱ्या तरूणांना पुढील वाटचालीत दिलासा देऊ शकेल, अशी ही 'शिदोरी' म्हणूनच प्रसिध्द होते आहे. बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे सुरेश हावरे यांचे अनुभवांतून साकारलेले ही प्रेरणादायी बोल. विधायक वातेवरच्या असंख्य पांथस्थांना ही 'शिदोरी' खचितच मोलाची वाटेल.
संकीर्णShidori Part 1 | शिदोरी भाग १
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart
Skip to content
