ललित लेखन
-
Sale! Add to cartआपल्या आजूबाजूच्या घटनांचा तिरकस लेखणीतून घेतलेला वेध... हे या पत्रापत्रीचं स्वरूप. तात्यासाहेब आणि माधवराव या जोडगोळीच्या साहाय्याने दिलीप प्रभावळकर हा पत्रप्रपंच मांडतात. यात कधी या दोघांचा रशियावारीतला पराक्रम हसवतो; तर कधी आफ्रिकावारीतले उद्योग हसू आणतात. याच पत्रांतून कधी आयपीएलवरचं भाष्य समोर येतं, तर कधी होर्डिंग्जच्या सुळसुळाटासंबंधीचं तिरकस मत.. तात्कालिक घटनांकडे पाहण्याचा प्रभावळकरांचा मिस्कीलपणा आणि या जोडगोळीची धम्माल यासाठी वाचावं असं ...
ललित लेखनPatrapatri | पत्रापत्री
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartमन पेटारा पेटारा, त्यात असे भरलेला । सुखदुःखे सजलेला सारा आयुष्यपसारा ।। किती भेटले, तुटले आणि कितीक मिटले । नव्या-जुन्या पावलांचा सदा जागता पहारा ।। कधी खुलते दालन, कधी झाकलेला कप्पा । कधी मीच पेटाऱ्यात, कधी माझ्यात पेटारा ।। असा पेटारा खुलता सांडे आतला पसारा । नाही नाही हो कचरा, मनमोराचा पिसारा ।। माझा पसारा भरावा कुणा दुजा पेटाऱ्यात । काळनदीच्या तीराला वाट पाहतो दुसरा ।। आयुष्यात भेटलेली माणसे, सतत वेढून राहिलेला निसर्ग, जणू कुटुंबाचेच घटक वाटावेत असे पशुपक्षी, अनवट जागा तुडवत केलेली भटकंती आणि या साऱ्यांच्या स्मृतींची मनाच्या पुस्तकाच्या पानांमध्ये जपलेली पाने आणि पिसे यातून साकारलेला - वाचकाला भावविभोर करणारा - पेटाऱ्यातला पसारा
ललित लेखनPetaryatala Pasara | पेटाऱ्यातला पसारा
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartतलत महमूद सुभाष दांडेकर प्रो. मधु दंडवते माधुरी आणि स्नेहलता दीक्षित प्रिया तेंडुलकर अनंत पै उषा मंगेशकर राजकारण, साहित्य, उद्योग, कला अशा विविध क्षेत्रांत लखलखीत कामगिरी केलेली वलयांकित व्यक्तिमत्त्वं. त्यांच्या जीवनप्रवासातले लक्षणीय टप्पे अन् अविस्मरणीय क्षण टिपणारी, वाचकाला एका संपन्न बहारदार मैफिलीत सामील करून घेणारी वेधक शब्दचित्रं : राग दरबारी
All BooksRag Darbaree | राग दरबारी
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
ललित लेखन
Ramprahar | रामप्रहर
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
ललित लेखन
Ratrani | रातराणी
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Add to cart -
Sale! Add to cartलोकसत्ता च्या लोकरंग पुरवणीत दर रविवारी नियमितपणे एक वर्षभर सांगतो ऐका ह्या शीर्षकांतर्गत मनोहर पारनेरकरांनी हे लेख लिहिले. शीर्षकाच्या दोन शब्दांत लेखमालेचा उद्देश पूर्णत: सामावलेला होता : संवाद. मी सांगतो आहे, तुम्ही ऐका. पारनेरकरांच्या ह्या सादेला वाचकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आणि त्यांचं सांगणं ऐकण्यात वाचक रंगून गेले. हे लेख वाचून आपण होतो त्याहून मनाने, ज्ञानाने अधिक समृद्ध झालो आहोत, असे वाचकांना नक्कीच वाटेल. तितका ह्या लेखांचा आवाका आहे. शांता गोखले
All BooksSangato Aika… | सांगतो ऐका…
₹380.00Original price was: ₹380.00.₹285.00Current price is: ₹285.00. Save ₹95 Add to cart -
Sale! Add to cartहे पुस्तक म्हणजे एक ‘कोलाज' आहे. त्याला कॅन्व्हास लाभला आहे एका प्रतिभावान बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा. आकाशवाणीपासून प्रकाशवाणीपर्यंत, रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या लेखणीचा अन् कॅमेर्यारचा अमिट ठसा उमटवणारे हे व्यक्तिमत्त्व म्हणजे सई परांजपे. सईंनी आपल्या भ्रमंतीच्या अन् स्वप्नरंजनाच्या विविध आविष्कारांना शब्दबद्ध करून साकारलेलं हे कोलाज म्हणजे -
All BooksSaysangat | सयसंगत
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartआपल्या जीवनात अनेक माणसं सामील होत असतात. त्यांचे आपल्याशी होणारे वेगवेगळ्या पातळीवरचे खुले व मूक संवाद रुजवतात अनेक दृश्य आणि अदृश्य नाती. आणि माणसंच कशाला? झाडं, फुलं, पानं, रानं, पक्षी, प्राणी, एवढंच नव्हे, तर गाणी, घरं आणि रस्तेसुद्धा एकेका समृद्ध व्यक्तिमत्त्वाची धनी असतात! ह्यातील सार् या व्यक्तींशी (वल्लींशी!) आणि वृक्ष-वल्लींशी एकरूप होताना त्यांच्या चांदणस्पर्शानं लेखिकेच्या जगण्याला नवा आयाम मिळाला आणि तिच्या लेखणीला शब्दांची पालवी फुटली. त्या पालवीचे अन् मोहोराचे रंग ल्यालेल्या अम्लान, नितळ व्यक्तिचित्रांनी आणि निसर्गचित्रांनी सजलेलं एक नितांतसुंदर दालन :
All BooksShodh Aaraspani | शोध आरस्पानी
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartसोनाली कुलकर्णी एक गुणी अभिनेत्री आहे.. या विधानानंतर स्वल्पविराम येत नाही, अर्धविराम किंवा पूर्णविरामही नाही.. येतात ती दोन टिंबं.. दोन टिंबं ही सोनालीची नुसती लेखनशैली नाही, तर ओळख आहे ! तिच्या लिखाणाला पूर्णविराम फारसे मंजूर नसावेत.. म्हणूनच पाठोपाठ दुसरं टिंब येत असावं.. पुढे नेणारं ! दोन टिंबांमधूनही तिला काहीतरी सांगायचं असतं.. सोनाली उघड्या डोळ्यांनी जग पाहताना माणसांना वाचते आणि शब्दांतून त्यांची व्यक्तिचित्रं रेखाटते. तिची अक्षरं वाचकांशी बोलतात.. त्या अक्षरांना लेन्स असते आणि वाचाही ! अशा संवेदनशील आणि संवादोत्सुक अभिनेत्रीला रंगभूमीवर आणि पडद्यावर पाहण्या- ऐकण्याएवढंच वाचणं'ही किती लोभस असू शकतं, याचं उदाहरण म्हणजे सो कुल टेक 2
All BooksSo Cool.. Take 2 | सो कुल .. टेक 2
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartही अवघी सृष्टी म्हणजे जणू सृजनाचा फुललेला मळा ! या मळयाला सिंचन करतात पै-पर्जन्याच्या धारा. एकाकी वाटणाऱ्या आभाळात विहार करतात मेघदूत. रहाटमाळ न कुरकुरता विहिरीत उतरते, पाण्याने भरते, वर येते, पन्हाळयात रिकामी होते... रिकामी होते, म्हणून पुन्हा भरते. समर्पण आहे म्हणून भरून पावणे आहे. गातगात देत राहणे, देता देता भरून पावणे हाच आनंदाचा मूलमंत्र. निसर्गाच्या खुल्या पाठशाळेत हा मूलमंत्र आपलासा करण्याची किमया ज्याला साधली, अशा हळव्या कविहृदयाच्या धर्मोपदेशकाने रचलेली भावकविता म्हणजे सृजनाचा मळा. जीव लावणारे लोभस पक्षी नि आत्म्याचे पोषण करणारे कोकिळगान... कोजागिरीच्या रात्रीचा नृत्यरंग नि मुग्ध चाफा... गंधाच्या रानात तो आणि ती ह्यांनी मांडलेला खेळ... शब्बाथराणीचा लडिवाळ सहवास नि प्रिय येशूचा आश्वासक आधार... अशी एक ना दोन... अनेकानेक निसर्गचित्रे रेखाटणारी प्रसन्न शैलीतील ही आस्वादक गद्यकाव्ये मराठी ललित वाङ्मयाच्या दालनात मानाने मिरवतील, यात शंकाच नाही !
ललित लेखनSrujanacha Mala | सृजनाचा मळा
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart
Skip to content

