भाषाविचार
-
Sale! Add to cart'आपल्याकडे असा गैरसमज दिसतो की, मराठी आपण बोलतो, लिहितो, आपली भाषा आहे, तिच्यात काय शिकायचे? ही बेफिकिरी झाली. कारण भाषा या माध्यमामुळेच ग्रहण केलेला विषय तुम्ही दुसऱ्यासमोर मांडत असता. भाषेवरचे प्रभुत्व तुम्हांला विचाराची शिस्त शिकवत असते. डॉ. अशोक केळकर बहुतेकांचे मराठी लेखन गरजेनुसार चालू राहते. ते बरेचसे सरावाच्या आधारावर आणि कित्येकदा काहीसे चाचपडत.... मराठी लिहिणे, वाचणे शिकलेल्या वा शिकू इच्छिणाऱ्या माणसांचे हे चाचपडणे कधीतरी संपावयास हवे; हे साधण्यासाठी थोडासा आवर्जून प्रयत्न करण्याची गरज आहे. तर आपल्याला लेखन आत्मविश्वासपूर्वक करता येणे अजिबात अशक्य नाही. असा आत्मविश्वास आल्यावर मराठीतून लिहिणे टाळावे असे तुम्हांला वाटणार नाही. सरोजिनी वैद्य शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे. आपले विचार जसे इतरांना समजले पाहिजेत, तसे इतरांचे विचार आपल्याला समजायला हवेत. यासाठी आपली भाषा अचूक लिहिली गेली पाहिजे. अरुण फडके औपचारिक लेखनात, औपचारिक भाषणात प्रमाणभाषा वापरावी आणि अनौपचारिक वातावरणात तुम्ही बोली वापरा आणि तुम्हांला आवडणारी कुठलीही भाषा वापरा. परंतु औपचारिक सामाजिक संदर्भात मात्र प्रमाणभाषेचा आग्रह धरणे आवश्यकच आहे. जर प्रमाणभाषेचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर तिचे लेखन हे प्रमाणलेखनच झाले पाहिजे. प्र. ना. परांजपे '
भाषाविचारAksharmatra Tituke Nit | अक्षरमात्र तितुकें नीट
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartजागतिकीकरणामुळे नि तंत्रजगतात अवतरणाऱ्या नित्य नव्या शोधांमुळे जगभरातील माणसं रोज अधिकाधिक जवळ येत आहेत. पण आवाजानं शरीरानं होणा-या जवळिकीला समान भाषेचा दुवा नसेल, तर त्यातून काहीच साधणार नाही, हे लक्षात आल्यामुळे आज जगभरातच विविध भाषा शिकण्याच्या उपक्रमाला प्रचंड गती आली आहे. त्यामुळे भाषांच्या माध्यमातून आपल्याला खराखुरा संवाद साधायचा असेल, जवळीक निर्माण करायची असेल, विश्वास संपादून आपलं कार्य साधायचं असेल, तर काय करायला पाहिजे, नेमकं कशाकडे लक्ष द्यायला पाहिजे, यासारखे प्रश्न निर्माण झाले आहेत. ही सारी शास्त्रीय माहिती साध्या, सोप्या नि रंजक भाषेत सांगणारं हे पुस्तक केवळ भाषा वापरणाऱ्यांनीच नव्हे, तर मूक- बधिरांनीही आपलं संवाद-कौशल्य विस्तारण्यासाठी वाचावं, असं आहे !
भाषाविचारBolu Kavatike | बोलु कवतिके
₹70.00Original price was: ₹70.00.₹53.00Current price is: ₹53.00. Save ₹17 Add to cart -
Sale! Add to cart'माणसाचे चार पायांचे नातलग मुक्याने सुखनैव जगत असताना माणसालाच बोलण्याची गरज का आणि कधी भासू लागली ? माणसाची अगदी सुरुवातीची भाषा कशी होती ? पृथ्वीतलावर एवढ्या वेगवेगळ्या भाषा का निर्माण झाल्या ? त्या सगळ्या कुणा एकाच आद्य भाषेपासून तयार झाल्या का ? लहान मुले त्यांची मातृभाषा मुद्दाम न शिकवतासुद्धा इतकी अचूक कशी काय बोलतात ? जगातल्या भाषांची संख्या झपाट्याने कमी का होत आहे ? कोणत्या भाषा काळाच्या ओघात टिकून राहतात ? भाषांचे आयुष्यमान कशावर अवलंबून असते ? या व अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे चालता-बोलता माणूस मध्ये सापडतील. शिवाय त्यात मिळेल माणूस बोलका होण्याचा इतिहाससुद्धा.
भाषाविचारChalta – Bolta Manus | चालता – बोलता माणूस
₹220.00Original price was: ₹220.00.₹165.00Current price is: ₹165.00. Save ₹55 Add to cart -
Sale! Add to cartअत्रे, पु.ल., पुरंदरे, भोसले आणि शेवाळकर हे मराठी वक्तृत्वाचे मानदंड ! ही सारी वक्तृत्वशिखरेच; पण एक शिखर दुसऱ्यासारखे नाही हे या शिखरांचे वैशिष्ट्य. प्रत्येकाची वक्तृत्वशैली निराळी, विचारप्रतिपादनाची रीत निराळी, आपल्या शब्दश्रीमंतीतून माय मराठीला ऐश्वर्य प्रदान करण्याचा बाज निराळा आणि हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचा वशीकरण मंत्रही वेगळाच. या वाणीच्या उपासकांनी वाग्देवतेच्या गाभाऱ्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. रसिक अन् चोखंदळ श्रोत्यांनीही आपल्या हृदयसिंहासनावर त्यांना दिले अढळपद. या पाच वक्तृत्वशिखरांचे विहंगम दर्शन कथा त्यांच्या वक्तृत्वाची
भाषाविचारKatha Tyanchya Vaktrutvachi | कथा त्यांच्या वक्तृत्वाची
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartमुळाक्षरे, शास्त्रीय आधुनिक बाराखड्या, जोडाक्षरे आणि वाक्ये ह्यांचे क्रमाक्रमाने शिक्षण देणारे अभिनव पुस्तक इंग्लिश भाषांतरासह
भाषाविचारMala Marathi Shikaychay | मला मराठी शिकायचंय
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartयोग्य-अयोग्य लेखनाचे तऱ्हेतऱ्हेचे ठळक निर्देश चकवा देणाऱ्या अनेक शब्दांच्या योग्य लेखनाचे शास्त्रीय स्पष्टीकरण मराठी शुद्धलेखनाच्या प्रचलित नियमानुसार होणारी शब्दांची विविध रूपे वैशिष्ट्यपूर्ण मांडणीने दाखवणारा पहिला मराठी शुद्धलेखन कोश
भाषाविचारMarathi Lekhan – Kosh | मराठी लेखन-कोश
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartभाषेची परंपरा जितकी प्राचीन, तितका म्हणी अन् वाक्प्रचारांचा वापर अन् त्यांची संख्याही अधिक. मराठीतील म्हणी अन् वाक्प्रचारांचा उगम तर आढळतो थेट वैदिक, बौध्द, जैन अन् संतवाङ्मयात! इतर भाषा अन् अन्य संस्कृतींच्या संपर्कातूनही म्हणींचा, वाक्प्रचारांचा ठेवा वाढता राहतो. म्हणी अन् वाक्प्रचारांतून केवळ शब्दांचा अर्थ उलगडत नाही, त्यात उमटत असते भाषेचे, संस्कृतीचे, लोकजीवनाचे, परंपरेचे प्रतिबिंब. मराठी भाषेतील हा समृद्ध ठेवा वाचकांना सादर करणारा संग्रह
All BooksMhani Ani Vakprachar | म्हणी आणि वाक्प्रचार
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cart'अनुवाद म्हणजे भरतकाम केलेल्या कापडाची उलटी बाजू... अनुवाद म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवणे... अनुवाद म्हणजे मूळ लेखनकृती वाचता येत नाही, याबद्दल मिळालेला दिलासा... अनुवाद हा तरुण स्त्रीसारखा असतो; सुंदर असेल, तर प्रामाणिक नसतो आणि प्रामाणिक असेल, तर सुंदर नसतो... या आणि अशा अनेक वचनांनी अनेक शतके अनुवादित साहित्याची बदनामी केली आहे. पण, कुशल अनुवादक जेव्हा अनुवाद-प्रक्रियेची सर्व पथ्ये पाळून जबाबदारीने एखादी साहित्यकृती अनुवादतो, तेव्हा त्याचा अनुवाद मूळ लेखनाशी प्रामाणिकही राहतो आणि लक्ष्य भाषेत सौंदर्याची अनुभूतीही देतो. हे शिवधनुष्य कसे पेलायचे, हे सोदाहरण स्पष्ट करणारे पुस्तक - प्रामाणिकही, सुंदरही..... '
भाषाविचारPramanikahi, Sundarahi | प्रामाणिक सुंदरही
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartवाचनवेड्यांच्या सोबतीला वाचताना असतात शब्द. एखादा अनवट शब्द वाचणाऱ्याला भावतो, कुतुहल चाळवतो. अशा शब्दाचा शोध घेणं रंजक अन् माहितीपूर्ण ठरतं. या प्रक्रियेतून मिळणारा आनंद अवर्णनीयच ! भेटणाऱ्या प्रत्येक शब्दाकडे डोळस नजरेनं पाहणाऱ्या एका शब्दवेधी वाचनवेड्याने केलेली शब्दांसोबतची मुक्त मुशाफिरी.
भाषाविचारShabdataranga | शब्द्तरंग
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartआठवी ते एम.ए.चे विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राध्यापक, मुद्रितशोधक आणि अभ्यासक ह्यांच्यासाठी मराठी शुद्धलेखनाचे सुलभ मार्गदर्शन उदाहरणांसह वैशिष्ट्यपूर्ण मांडणी विशेष पाठांसह १. सूत्रबद्ध पाठरचना २. वर्णमाला आणि शुद्धलेखन ३. जोडाक्षरे ४. स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी ५. शुद्धलेखनविषयक संकीर्ण बाबी नित्योपयोगी शब्दांचा वैशिष्ट्यपूर्ण संग्रह
भाषाविचारShuddhalekhan Margapradeep | शुद्धलेखन मार्गप्रदीप
₹220.00Original price was: ₹220.00.₹165.00Current price is: ₹165.00. Save ₹55 Add to cart
Skip to content