चरित्रे / आत्मचरित्रे-2
-
Sale! Add to cart'ही कहाणी आहे कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची... कसलेल्या संसदपटूची आणि लोकशाहीसाठी झुंजणाऱ्या लढवय्याची... समर्थ भारताचे स्वप्न पाहणाऱ्या राजनीतिज्ञाची... सत्ता सेवेसाठी असते, हे जाणणाऱ्या दूरदर्शी नेत्याची... हिंदुत्वाचा हुंकार आणि विश्वबंधुत्व यांत भेद न करणाऱ्या उदारहृदयी राष्ट्र्वाद्याची ... कहाणी संघर्षाची आणि साफल्याची... कहाणी अटलजींची आणि भारताच्या विशाल राजकीय पटाची...'
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAtalji (Jan Aavrutee) | अटलजी
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartकवीनं असावं अल्पाक्षरी, आणि नाटककारानं मितभाषी. अभिनेत्यानं करावा संहितेतील अव्यक्त आशय व्यक्त. तंत्रज्ञानं साधावा शब्देविण संवाद. ध्वनी, प्रकाश, रंग, रेषा यांनी टाकावा अवकाश भारून. प्रेक्षकांनी सगळं अनुभवावं, मूक राहून आणि एकाग्र होऊन. समीक्षकांनी करावं नाट्यानुभवाचं विश्लेषण अचूक. पण मग,... दिग्दर्शकानं काय करावं? आरंभापासून अंतापर्यंत, प्रत्येक क्षण उजळून टाकण्याचं कसब शिकवावं. मंचावरील आणि मंचामागील प्रत्येकाचा मित्र, तत्त्वज्ञ आणि दिशादर्शक व्हावं. हे का आणि कसं करावं? सांगत आहेत, मराठी नाट्यसृष्टीतील अग्रणी दिग्दर्शक आणि अभिनेते- चंद्रकांत कुलकर्णी.
All BooksChandrakant Kulkarni Saadar Karait Ahe …! | चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे
₹800.00Original price was: ₹800.00.₹600.00Current price is: ₹600.00. Save ₹200 Add to cart -
Sale! Add to cartअहिल्याबाई होळकर ! जन्म ३१ मे १७२५. मृत्यू १३ ऑगस्ट १७९५. ती सत्ताधारी होती, पण ती सिंहासनावर नव्हती. ती राजकारणी होती, पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती. ती पेशव्यांशी निष्ठावंत होती. पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती. ती व्रतस्थ होती, पण ती संन्यासिनी नव्हती. जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्यांचा धर्म होता, हुकमत हा सत्तेचा स्वभाव होता, तेव्हा तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले. तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछत्रे, धर्मशाळांचे रूप घेतले. तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरतखंडाच्या मंदिरामंदिरांतून घुमले. मात्र ती सर्वगुणसंपन्न देवता नव्हती. तिला माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या. अठराव्या शतकातल्या मराठ्यांच्या इतिहासाच्या पटावर ती शुक्राच्या चांदणीसारखी लुकलुकली.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDnyat – Adnyat : Ahilyabai Holkar (Lokavrutti) | ज्ञात-अज्ञात : अहिल्याबाई होळकर(लोकावृत्ती)
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartआपले सारे आयुष्य पक्ष्यांच्या रंगभ-या सुंदर विश्वावर उधळून देणा-या ऋषीतुल्य पक्षीतज्ञाची आणि जागरूक पर्यावरणवाद्याची जीवनकथा.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDr. Salim Ali | डॉ. सालिम अली
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartगांधी काळाच्या चरख्यावर माणुसकीची वस्त्रं विणणारा विसाव्या शतकातला कबीर. मुक्तीचं आकाश धरतीत पेरणारा अलौकिक महापुरूष. स्वातंत्र्यलक्ष्मीच्या या कफल्लक उपासकाची जीवनकहाणी म्हणजे उत्कट महाकाव्य. उज्ज्वल अन् उदासही... गांधींनी एका भाग्यात देश जोडला! मनं साधली ! फाळणीचं दुर्दैव मात्र ते टाळू शकले नाहीत... ते स्वातंत्र्यसंग्रामाचे सरसेनापती. तरीही एकटेच भिरभिरत राहिले कैकदा. धर्म ही त्यांच्या मते एक उन्नत प्रेरणा. पण त्यांच्यासमोर मात्र धर्माच्या नावावरच रक्त सांडलं-सांडत राहिलं. विलक्षण प्रेम आणि आत्यंतिक द्वेष अशा कचाट्यात असतो गांधी. पुन्हा एकदा पाह्यला हवं महात्म्याकडं. महादेवभाई देसाई, जमनालाल बजाज, मनुबेन गांधी, हरिलाल गांधी...या आणि अशाच काही जिवलग सहका-यांच्या आठवणी, दैनंदिनी आणि पत्रव्यवहारातून एक वेगळाच नयानवेला गांधी रेखांकित होतो... जणू गंगेत वितळत जाणारं आकाश
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेGangemadhye Gagan Vitalale | गंगेमध्ये गगन वितळले
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cart'जगाच्या पाठीवर' हे कै. सुधीर फडके तथा बाबूजी यांनी लिहिलेलं आत्मचरित्र संपूर्ण नाही, अर्धंदेखील नाही. त्यांच्या आयुष्याच्या अगदी प्रारंभी लहरी नियतीनं त्यांना जी वणवण भटकंती करायला भाग पाडलं, त्या भंडावून सोडणा-या प्रवासाचा फक्त एका भल्यामोठया टप्प्यापर्यंतचा हा वृत्तांत आहे. हे असं अपुरं आत्मचरित्र हुरहुर लावणारं तर आहेच, पण दैन्याचे दशावतार अनुभवत असतानाच त्यांनी संगीतसाधना कशी केली, याचं विलक्षण दर्शन घडवणारंही आहे. या ओघवत्या आत्मकथनात बाबूजींच्या सश्रद्घ, सुसंस्कारित मनाचं स्वच्छ प्रतिबिंब पडलेलं आपल्याला दिसतं आणि ठार वेडं होण्याच्या स्थितीत किंवा आत्महत्या करण्याच्या विचारात असतानादेखील त्यांनी जिवापाड जपलेला स्वाभिमानी स्वरही आपल्याला ऐकू येतो... बाबूजींचं यश आणि त्यांची लोकप्रियता अनेकांना ठाऊक आहे, पण त्या यशामागे दडलेलं अपयश आणि लोकप्रियतेमागची खडतर कलासाधना समजून घेण्यासाठी हे आत्मचरित्र वाचायलाच हवं.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेJagachya Pathivar | जगाच्या पाठीवर
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cart'सामान्यातल्या असामान्य स्त्रीचं हे आत्मकथन ! पार्वतीबाई आठवले ! १८७० मध्ये जन्मलेली, कोकणच्या खेडयात लहानाची मोठी झालेली एक निरक्षर स्त्री... वैधव्यानंतर केशवपन, परावलंबन हे दैवाचे भोग मानून जगणारी ! पण मुलाच्या काळजीनं पुण्यात बहीण बाया कर्वे यांच्याकडे म्हणजेच मेहुणे धोंडो केशव कर्वे यांच्या घरी आली आणि तिचं सारं जगच बदललं. या सामान्य स्त्रीतले असामान्य गुण प्रकटले. कर्वे यांचा अनाथ बालिकाश्रम हे तिचं जीवनकार्य झालं. या संस्थेला मदत मिळवण्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसत ती भारतभर फिरली, इंग्लंड-अमेरिकेतही जाऊन आली. तिनं केलेलं हे आत्मकथन.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMajhi Kahani | माझी कहाणी
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cart'ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक एकलव्यांना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMan Main Hai Vishwas (Jana Avrutti) | मन में है विश्र्वास
₹199.00Original price was: ₹199.00.₹149.00Current price is: ₹149.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartमरहूम उस्ताद अल्लादिया खांसाहेब जयपूर-अत्रौली घराण्याच्या विद्यमान गायकीचे उद्गाते जणू गायनाचे गौरीशंकर' ! त्यांच्या गायकीच्या आजच्या घडीला कार्यरत वारसदारांपैकी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे सांगत आहेत त्यांची चरितकहाणी. ख्यालगायनाच्या पद्धतीनुसार रागबढत' किंवा उपज' या अंगाने विस्तारत साकारलेली खांसाहेबांची ही जीवनकथा. त्यातून वाचकापुढे उलगडत जातं कधी सौंदर्यपूर्ण, प्रमाणबध्द स्थापत्यासारखं खांसाहेबांचं व्यक्तिमत्त्व, कधी त्यांच्या पारिवारिक आणि गुरुशिष्य नातेसंबंधांचं नाजूक, जरतारी विणकाम. विविध प्रसंगांतून उजागर होतात खांसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातल्या मनोहारी रंगछटा. एखाद्या कादंबरीसारख्या सुरस, रोचक घटनांनी भरलेलं हे खांसाहेबांचं ललित चरित्र' म्हणजे रसिक वाचकांना तसेच अभिजात संगीताच्या साधकांना लाभलेली शब्दमैफिलीची पर्वणी.
All BooksMi…Alladiyakhan | मी… अल्लादियाखां
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart -
Sale! Add to cartगुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून भारताचे पंतप्रधान या नात्याने सात वर्षांची कारकीर्द पूर्ण करीपर्यंत नरेंद्र मोदी यांनी जी मजल मारली, तिचा विविध क्षेत्रांमधील मान्यवर साक्षीदारांनी घेतलेला आढावा... प्रथम तेरा वर्षे राज्यात आणि नंतर केंद्रीय स्तरावर सात वर्षांत त्यांनी घडवलेल्या परिवर्तनाचा विस्तृत परिचय... अशक्य वाटणार् या अनेक गोष्टी शक्य करून दाखवणार् या एका किमयागार नेत्याच्या विलक्षण यशाचे रहस्य उलगडून दाखवणारा प्रभावी लेखसंग्रह. प्रस्तावना भारतरत्न लता मंगेशकर सहभागी लेखक पी. व्ही. सिंधू शोभना कामिनेनी सुरजित एस. भल्ला अमीश त्रिपाठी अमित शाह प्रदीप गुप्ता अनंत नागेश्वरन अरविंद पणगडिया डॉ. शमिका रवी उदय एस. कोटक अजय माथुर अनुपम खेर अशोक गुलाटी डॉ. देवी शेट्टी नंदन नीलेकणी नृपेन्द्र मिश्रा सद्गुरू सुधा मूर्ती अजित डोभाल (कीर्तिचक्रविजेते) मनोज लडवा, भरत बरई डॉ. एस. जयशंकर
All BooksModi@20 | मोदी@20
₹895.00Original price was: ₹895.00.₹671.00Current price is: ₹671.00. Save ₹224 Add to cart
Skip to content