चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
-
Sale! Add to cartश्री. एन. बी. धुमाळ यांचे यशस्वितेचा सुवर्णमंत्र हे पुस्तक वाचून मनस्वी आनंद झाला. श्री. धुमाळ यांची कौटुंबिक पाश्र्वभूमी ही शेतकरी, वारकरी अशा स्वरूपाची. मात्र त्यांच्या यशोगाथेचा प्रवास थक्क करून सोडणारा वाटला. पुस्तकातील भाषा अतिशय ओघवती असून त्यामध्ये भावना आणि आशय यांचा सुंदर मिलाफ दिसतो. स्टेट बँकेची नोकरी सोडून एक मोठे स्वप्न घेऊन जगणारा व यशोशिखराकडे जाण्यासाठी धडपडणारा तरुण उद्योजक या पुस्तकातून वाचावयास मिळाला. या पुस्तकातून स्वानुभवावर आधारित सांगितलेल्या यशस्वितेच्या गोष्टी आजच्या तरुणाईसाठी उद्योगाची नवनवीन क्षितिजे निर्माण करतील, असा मला विश्वास वाटतो. पद्मभूषण डॉ. विजय भटकर - यशस्वितेचा सुवर्णमंत्र हे पुस्तक म्हणजे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी कसे व्हावे, याचा सोन्यासारखाच मंत्र श्री. एन. बी. धुमाळ यांनी तरुणांना दिला आहे. आधी केले, मग सांगितले , या उक्तीप्रमाणे वयाच्या सोळाव्या वर्षांपर्यंत सात किलोमीटरच्या परिघाबाहेर न पडलेल्या पण उच्च महत्त्वाकांक्षा, सातत्य व अफाट कष्टाने स्वत: समृद्ध होऊन हजारोंना समृद्ध करणारे श्री. धुमाळ आतापर्यंत अर्धे जग फिरून आले. स्वत: यशस्वी उद्योजक बनून इतरांना उद्योजक करणारे श्री. धुमाळ यांचा जीवनपट एखाद्या सिनेमासारखा स्वप्नवत वाटतो. व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रांत मोठे यश मिळूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत, ही त्यांच्यावर झालेल्या संस्कारांची किमया आहे. यशस्वी जीवनासाठी लागणाऱ्या अनेक क्लृप्त्या त्यांनी या पुस्तकात सांगितल्या आहेत. त्यांचा ज्ञानदानाचा व अन्नछत्राच्या माध्यमातून अन्नदानाचा वसा एक आदर्शवत आहे. एकविसाव्या शतकात शेतकऱ्यांच्या मुलांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग- व्यवसाय कसा करावा, याचा यशोमार्गच त्यांनी या पुस्तकातून दाखवला आहे. हे पुस्तक वाचून त्यांनी सांगितल्याप्रमाणे मार्गक्रमण केल्यास अनेक उद्योजक घडतील, असा मला विश्वास वाटतो व हीच काळाची गरज आहे. त्यांच्या या यशस्वितेच्या सुवर्णमंत्रास माझ्या हार्दिक शुभेच्छा ! पद्मश्री पोपटराव पवार
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेYashasvitecha Suvarnamantra | यशस्वितेचा सुवर्णमंत्र
₹250.00Original price was: ₹250.00.₹175.00Current price is: ₹175.00. Save ₹75 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'सरदार कुलवंतसिंग कोहली. मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अन् राजकीय क्षेत्रांत मोलाचं योगदान दिलेलं हे व्यक्तिमत्त्व. योगायोगानं मुंबईच्या मोहक मयसभेशी - चित्रपटसृष्टीशी कुलवंतजींचा घनिष्ठ संबंध आला. कपूर कुटुंब, दिलीपकुमार - राजेंद्रकुमार - धर्मेंद्रपासून राजकुमार - संजीवकुमार - जितेंद्रपर्यंतचे नायक, मीनाकुमारी - मधुबालापासून माला सिन्हापर्यंतच्या नायिका, व्ही. शांताराम - असीफ - मेहबूबसारखे दिग्दर्शक, नौशादपासून रवीपर्यंतचे संगीतकार, प्राणसारखे दिलेर खलनायक - किती किती नावं सांगायची ? अशा दिग्गज कलाकारांबरोबर कुलवंतजींच्या तारा जुळल्या. सामान्य माणसासाठी आकाशीची नक्षत्रं असणारे हे चित्रपटसृष्टीतील तारे-तारका कुलवंतजींना हाडामांसाची माणसं म्हणून न्याहाळता आली. अटलबिहारी वाजपेयी - बाळासाहेब ठाकरे - सुशीलकुमार शिंदे किंवा प्रमोद महाजन - झैलसिंग - बुटासिंग यांच्यासारखे राजकारणीदेखील या चित्राची चौकट बनून भेटतात. ही सारी माणसं अन् त्यांच्याबरोबर जगलेला अवघा काळ कुलवंतसिंग यांनी आपल्यापुढे जिवंत केला आहे ! '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेYe Hai Mumbai Meri Jaan | ये है मुंबई मेरी जान
₹380.00Original price was: ₹380.00.₹266.00Current price is: ₹266.00. Save ₹114 Read more -
Sale! Add to cartस्वामी विवेकानंद - एक झंझावात त्यांच्या सव्यासाची व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू. हिंदू रूढी व अंधविश्वासांवर त्यांनी केलेले प्रहार. धर्म, विज्ञान, संगीत, इतिहास अशा अनेक विषयांवरील स्वामीजींचे प्रभुत्व. या सा-याचे रसरशीत, जोशपूर्ण दर्शन घडविणारे चरित्र.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेYoddha Sanyasi | योध्दा संन्यासी
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartफाळणीच्या वणव्यात होरपळलेलं एक निराधार सिंधी कुटुंब. त्या कुटुंबातला कोवळ्या वयाचा एक किशोर समुद्रापार सफरीवर निघाला - दुबई नावाच्या दूरदेशी. त्यानं हाल सोसले, कष्ट उपसले, व्यावसायिक जोखिमा पत्करल्या. आणि स्वत:चं समृद्ध उद्योगविश्व उभारलं. जिद्द, चिकाटी, उद्योगधंद्यानंमधलं चातुर्य अन् वागण्या-बोलण्यातलं माधुर्य यांचं जणू बाळकडूच प्यालेल्या सिंधी समाजाच्या अन् सिंधी व्यक्तिमत्त्वाच्या बहुविध पैलूंचं दर्शन घडवणारी आत्मकथा.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेZhep Ghe … | झेप घे…
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartएक सिद्धहस्त अभिनेत्रीचा सफरनामा... एका प्रतिभासंपन्न दिग्दर्शिकेचा बहुआयामी आत्मशोध ! मराठी रंगभूमीला नवतेचं भान मिळालं, अनेक नवे नाटककार / कलावंत घडले, मराठी नाटकाच्या कक्षा विस्तारल्या; हे सारं घडलं, ते बाईंमुळे. वाचकाला विश्र्वासात घेऊन बाई सांगताहेत गोष्ट... स्वत:ची आणि मराठी रंगभूमीची, आपल्या दिलखुलास, प्रसन्न शैलीत. आठवणींच्या धाग्यांचं हे मुलायम विणकाम वाचकांना बांधून ठेवेल हे नि:संशय !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेZimma: Athvanincha Gof | झिम्मा : आठवणींचा गोफ
₹650.00Original price was: ₹650.00.₹488.00Current price is: ₹488.00. Save ₹162 Add to cart -
Sale! Add to cartसाहित्यापासून संगीतापर्यंत,
छायाचित्रणापासून अभिनयदर्शनापर्यंत,
समाजकारणापासून राजकारणापर्यंत,
कलाक्षेत्रापासून क्रीडांगणापर्यंत,
इतिहाससंशोधनापासून भविष्यवेधापर्यंत
विविध क्षेत्रांमध्ये अजोड कर्तृत्व गाजवलेल्या
नामवंतांना आपल्या भेटीला घेऊन येत आहेत
सुप्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार
सुधीर गाडगीळ.
या नामवंतांशी भरभरून मारलेल्या गप्पांमधून
उलगडत जाणारं त्यांचं जीवन अन् कार्य म्हणजे
उत्तुंग भाग १ व २चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेउत्तुंग भाग १, २ | Uttunga : Part 1, 2
₹600.00Original price was: ₹600.00.₹420.00Current price is: ₹420.00. Save ₹180 Add to cart -
Sale! Add to cartमहाराष्ट्रातील सहकारी क्षेत्राने आज डेरेदार वटवृक्षाचा नेत्रदीपक आकार घेतला आहे. सहकाराच्या कडव्या विरोधकांनाही हे मान्य करण्यावाचून आज गत्यंतर उरलेले नाही. या सर्वदूर प्रगतीमागील मूलभूत तत्त्वज्ञानाचा शोध-बोध घेण्यासाठी आज जपान, इस्राएल, आफ्रिका येथील शिष्टमंडळे महाराष्ट्रात उतरताहेत. वारणानगर, अकलूज, कोल्हापूर, इचलकरंजी व प्रवरानगर अशा येथील अनेक सशक्त सहकारी केंद्रांना ही शिष्टमंडळे अभ्यासू वृत्तीने भेटी देताहेत. सहकाराची डोळस कास धरून महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाने निःसंशयपणे शेकडो वर्षांची एक कळकट कात आता टाकली आहे. अद्याप खूप वाटचाल तर करावयाची आहेच.
महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्राने आज डेरेदार वटवृक्षाचा नेत्रदीपक आकार घेतला आहे. सहकाराच्या कडव्या विरोधकांनाही हे मान्य करण्यावाचून आज गत्यंतर उरलेले नाही. या सर्वदूर प्रगतीमागील मूलभूत तत्त्वज्ञानाचा शोध-बोध घेण्यासाठी आज जपान, इस्राएल, आफ्रिका येथील शिष्टमंडळे महाराष्ट्रात उतरताहेत. वारणानगर, अकलूज, कोल्हापूर, इचलकरंजी व प्रवरानगर अशा येथील अनेक सशक्त सहकारी केंद्रांना ही शिष्टमंडळे अभ्यासू वृत्तीने भेटी देताहेत. सहकाराची डोळस कास धरून महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाने निःसंशयपणे शेकडो वर्षांची एक कळकट कात आता टाकली आहे. अद्याप खूप वाटचाल तर करावयाची आहेच.
Comboलढत भाग १ व २
₹600.00Original price was: ₹600.00.₹420.00Current price is: ₹420.00. Save ₹180 Add to cart
Skip to content