कादंबरी
-
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमराठी साहित्यातील कविता आणि कथा या क्षेत्रांत नीरजा यांनी स्वत:चे एक स्थान तयार केले आहे. थिजलेल्या काळाचे अवशेष' ही त्यांची पहिलीच कादंबरी, या क्षेत्रातही त्या आपला ठसा निर्माण करतील, असा विश्वास देऊन जाते. स्वातंत्र्यानंतर भारत या देशातील समाज घडवतानानिरनिराळ्या क्षेत्रांतील महत्त्वाच्या व्यक्तींची विवक्षित भूमिका होती. ती स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रयीला महत्त्व देणारी, विविधतेचे महत्त्व जाणून तिचा आदर करणारी आणि मानवतावादी चेहरा असणारी होती. गेल्या दशकात ही भूमिकाच बदललेली दिसते. आता ती निरनिराळ्या अस्मितांमध्ये विद्वेष निर्माण करणारी, बहुमतशाहीवादी, धर्म आणि राजकारण यांचे संयुग करू पाहणारी आणि अतिरेकी राष्ट्रवादी झाली आहे, असे जाणवते. या बदलामागची कारणे अत्यंत गुंतागुंतीची आहेत आणि मुख्य म्हणजे हा बदल लोकशाहीच्या मार्गानेच झालेला आहे. आधीच्या काळात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या तत्त्वांचा पाठपुरावा करतील अशा अनेक संस्था काढल्या होत्या. त्यातील एक होते जवाहरलाल नेहरू विद्यापीठ - जेएनयू. १९८०च्या दशकात तिथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा एक गट या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. त्यातील नजमा ही व्यक्तिरेखा तीन दशकांनंतर त्या गटातील जगभर विखुरलेल्या आपल्या मित्र-मैत्रिणींना स्वतंत्रपणे आणि शेवटी एकत्रितपणे भेटते. या भेटीत प्रत्यक्षात विशेष काहीच होत नाही. पण त्यातून नीरजा गेल्या तीन दशकांत झालेले बदल आणि त्यामागची व्यामिश्र कारणे यांची चर्चा ताकदीने मांडतात, आणि त्या अनुषंगाने घडलेली पात्रे आणि आजच्या काळातले त्यांचे जगणे आपल्यासमोर जिवंत करतात. मराठीत चर्चा-नाटकांची परंपरा आहे; निदान माझ्या माहितीत चर्चा-कादंबऱ्यांची. त्या मानाने कमी आहे. ही कादंबरी साहित्याच्या या दालनात मोठीच भर घालते. ही कादंबरी, ठोस भूमिका असूनही, अभिनिवेश टाळत, सर्वांप्रती काही किमान सहानुभूती आणि आदर बाळगत, गेल्या काही दशकांतील बदललेल्या वास्तवाबाबत व्यापक परिस्थितीभान देते, हे या कादंबरीचे सर्वात मोठे यश आहे. मकरंद साठे
All BooksThijalelya Kalache Avshesh | थिजलेल्या काळाचे अवशेष
₹400.00Original price was: ₹400.00.₹280.00Current price is: ₹280.00. Save ₹120 Read more -
Sale! Add to cartपरमीट रूम, बार, हॉटेल ही छंदीफंदी लोकांची भुरळ घालणारी दुनिया. हे एक स्वतंत्र जग असते. तिथे झगमगाट, उच्चभ्रूंचा वावर आणि अय्याशी फेर धरत असते; तर दुसऱ्या बाजूला रोजीरोटीला महाग झालेले गोरगरीब, शोषित, पीडित लोक या दुनियेत स्वत:ला हरप्रकारे जाळून नेस्तनाबूत करत असतात. भारतासारख्या देशातील दोन वर्गांतील दरी पाहायची असेल, तर आपल्या जवळपासचे परमीट रूम, बार, हॉटेल हे एक उत्तम अनुभवक्षेत्र असते. अशा ठिकाणी काम करणाऱ्या कामगाराच्या आयुष्याचा पट रमेश रावळकर यांनी टिश्यू पेपर' या कादंबरीत चित्रित केलेला आहे. शोषितांच्या जगण्याचे भयावह रूप आपल्याला या कादंबरीत वाचावयास मिळते. मराठी साहित्यात अपवादानेच चित्रित होणारे अर्थशास्त्रीय वास्तव प्रकर्षाने वाचकास टोचण्या देऊ लागते. श्रीमंत, गर्भश्रीमंत, उच्चमध्यमवर्ग, मध्यमवर्ग, सामान्य माणूस आणि अतिसामान्यांचे गूढ विश्व हा लेखक टिश्यू पेपर' या कादंबरीत आपल्यासमोर ठेवतो. नाचणारी-गाणारी, पिणारी-पाजणारी, बेहोश होणारी, सांभाळणारी, स्वत:ला गाडून घेऊन पुन्हा उगवणारी आणि दुसऱ्यांना जगवणारी एक जीवनेच्छा इथे प्रवाहित होताना दिसते. भाषेची परिपूर्ण जाण, व्यक्तीच्या अंतर्मनाचा तळ शोधण्याची प्रचंड आकांक्षा यातून या कादंबरीचे अनुभवविश्व वाचकाला श्रीमंत करून जाते. माणूस होण्यासाठी ज्यांना ज्यांना डागण्या देणे गरजेचे आहे; त्या सर्वांना डागण्या देत कधी खोलवर जखम करत ही कादंबरी आपल्याला अस्सल साहित्यकृती वाचल्याचा अनुभव देते. प्रत्यक्ष जगलेले जीवनानुभव साहित्यात जसेच्या तसे ओतून एक जिवंत कलाकृती निर्माण करण्याचा प्रयत्न रमेश रावळकर यांनी टिश्यू पेपर' या कादंबरीत केलेला आहे. वाचक या कलाकृतीचे निश्चितच स्वागत करतील, याची मला खात्री वाटते ! राजन गवस
कादंबरीTissue Paper | टिश्यू पेपर
₹400.00Original price was: ₹400.00.₹280.00Current price is: ₹280.00. Save ₹120 Add to cart -
Sale! Add to cartही कहाणी आहे आजच्या काळाची, भोवतालच्या वर्तमानाची अन् या वर्तमानात वावरणार् या व्यक्तींची, समाजाची, जनसमूहाची आणि जनमानसाची. ही कहाणी आहे एका धैर्यवान मुलीची. प्रतिकूल परिस्थितीत जन्म, पण तिच्यावर मात करणारी जिद्द. शिक्षणाने दिलेली क्षमता अन् सामर्थ्य. त्यातून लाभलेल्या आत्मविश्वासातून ती लढायला शिकली. लढा जातिभेदाशी. लढा लोकांच्या पूर्वग्रहांशी. आपली स्वप्नं वास्तवात आणताना येणार् या अडथळ्यांशी. आपलं भविष्य घडवताना त्याला डागाळणार् या वर्तमानाशी. या लढ्यात तिला यश मिळालं का ? या लढ्यात तिला आपल्या जोडीदाराची किती साथ मिळाली ? की वर्तमानातल्या विटक्या रंगांनी तिच्या स्वप्नांना डागाळून टाकलं ? आजच्या समस्यांची गुंतागुंत उलगडत व्यामिश्र वर्तमानाचा वेध घेणारी कादंबरी
All BooksVastavikateche Rang | वास्तविकतेचे रंग
₹340.00Original price was: ₹340.00.₹238.00Current price is: ₹238.00. Save ₹102 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमलिका-ए-हिंदुस्थान या किताबाने सुखावणारी, कोहिनूर हिरा अभिमानाने अंगावर मिरवणारी राणी व्हिक्टोरिया तिचे हिंदुस्थानी साम्राज्य कधीच बघू शकली नाही. म्हणून तिने आपल्या प्रासादातच छोटा हिंदुस्थान उभा केला. दिमतीला हिंदुस्थानी सेवक ठेवले. राजप्रासादात रोज सकाळी मोगलाई भोजन बनवण्याची प्रथा पाडली आणि स्वत: अब्दुलकडून उर्दू शिकण्यास सुरूवात केली. कोण होता हा अब्दुल ? राणीच्या सेवेत खिदमतगार म्हणून रूजू झालेला आग्य्राचा हा अल्पशिक्षित युवक तिचा उर्दूचा गुरू, तिच्या पत्रव्यवहारात लक्ष घालणारा मुन्शी आणि तिचा हिंदुस्थानविषयक सल्लागार कसा काय बनला ? पृथ्वीच्या एकपंचमांश भूभागावर राज्य करणारी सम्राज्ञी आणि तिचा एक मामुली खिदमतगार यांच्यामधील नात्याची ही अजब कहाणी
कादंबरीVictoria Aani Abdul | व्हिक्टोरिया आणि अब्दुल
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
Sale! Add to cart'पुण्याच्या कॉफीशॉपमध्ये जमणारा, ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा जेएफके नावाचा कलंदर ग्रुप. एका गडावरच्या भटकंतीत त्यांच्या हाती लागली एक अकल्पित खूण. आणि मग सुरू झाला रोलरकॉस्टरसारखा एक थरारक प्रवास. या प्रवासात प्राचीन, मध्ययुगीन संदर्भ आहेत; तसेच आजचे राजकीय, सामाजिक संदर्भही. आंतरराष्ट्रीय घटनांचे पडसाद आहेत. अज्ञात इतिहास आणि वर्तमान वास्तव, कल्पित आणि सत्य यांच्यामधल्या पुसट, धूसर सीमारेषांवर आटयापाटया खेळणारी नाटयपूर्ण, वेगवान घटनांच्या प्रवाहात वाचकाला खेचून नेणारी आणि खिळवूनही ठेवणारी कादंबरी
कादंबरीVishwasta | विश्वस्त
₹625.00Original price was: ₹625.00.₹438.00Current price is: ₹438.00. Save ₹187 Add to cart -
Sale! Add to cart'तुमच्या बागा फुलाव्यात, ऊसमळे झुलावेत, साखर कारखाने निघावेत, यंत्रं चालावीत, तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी भिका मागायच्या. जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच. गाव आणि देव पाठीवर बांधून चालणाऱ्या हजारो धरणग्रस्तांची मन सुन्न करणारी कादंबरी.
कादंबरीZadazadti | झाडाझडती
₹575.00Original price was: ₹575.00.₹403.00Current price is: ₹403.00. Save ₹172 Add to cart -
Sale! Add to cartअजिंक्य मोहिते. महाविद्यालयीन शिक्षणासाठी छोट्या गावातून मोठ्या शहरात आलेला तरुण. शहरातल्या प्रसिद्ध कृषिमहाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्याच्या पहिल्या दिवसापासून पदवी प्राप्त करेपर्यंतचा अजिंक्यचा प्रवास. त्या प्रवासात त्याला भेटलेल्या तऱ्हेतऱ्हेच्या व्यक्तिरेखा. प्रत्यक्ष जीवनाशी सांधेजोड नसलेली आपली वर्तमान शिक्षणपद्धती आणि तिचे वेगवेगळे भलेबुरे पैलू. अजिंक्यच्या रोजच्या आयुष्याला अन् त्यातील लहानमोठ्या घटनांना असलेलं सामाजिक अन् राजकीय अस्तर. या साऱ्याचा रंगीबेरंगी गोफ विणणारं प्रवाही चित्रण म्हणजे ही कादंबरी. एका संवेदनशील तरुणाच्या भावविश्वाचा टोकदार अन् धारदार वेध घेणाऱ्या दोन कादंबऱ्यांच्या मालिकेतील पहिली कादंबरी.
कादंबरीZengat | झेंगट
₹350.00Original price was: ₹350.00.₹245.00Current price is: ₹245.00. Save ₹105 Add to cart
Skip to content