WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Prashant Dixit | प्रशांत दीक्षित

Prashant Dixit | प्रशांत दीक्षित

• जन्म : ५ सप्टेंबर १९६१
• शिक्षण : बी.एस्सी., डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स.
• मराठी पत्रकारितेत ३३ वर्षे कार्यरत. निवृत्त पत्रकार व संपादक.
• लोकसत्ता दैनिकामध्ये दिल्ली प्रतिनिधी व डेप्युटी एडिटर पदावर काम.
• सकाळमध्ये कार्यकारी संपादक या पदावर कामाचा अनुभव.
• लोकमतच्या पुणे आवृत्तीमध्ये संपादक म्हणून काम.
• भास्कर समूहाच्या ‘दिव्य मराठी’ दैनिकाचे पाच वर्षे महाराष्ट्र राज्य संपादक म्हणून काम.
• सप्टेंबर २०२१ मध्ये ‘लोकमत’ समूहाच्या पुणे आवृत्तीच्या संपादक पदावरून निवृत्त.
प्रकाशित साहित्य
• रावपर्व — आर्थिक सुधारणांचा पाया घालणारे माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातील आर्थिक व राजकीय घडामोडींचे चित्रण व चिकित्सा करणारे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परामर्श घेणारे चरित्र. (२०२१)
• पुरस्कार : डॉ. आनंद दामले पारितोषिक, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था.
• नरेंद्र मोदी, नवी भाजपा, बदलता भारत — नरेंद्र मोदी यांचे चरित्र. (२०२३)

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top