Anagha Natekar | अनघा नाटेकर
* अनघा नाटेकर सध्या ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज् अँड अॅग्रिकल्चर’, पुणे येथे भाषातज्ज्ञ सल्लागार म्हणून काम करतात. गेल्या २० वर्षांपासून त्या इंग्लिश आणि जर्मन भाषांच्या प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. त्यांपैकी १५ वर्षे त्यांनी ‘इंग्लिश लँग्वेज टीचिंग इन्स्टिट्यूट ऑफ सिंबायोसिस’ (एल्टिस) व ‘सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरिन अँड इंडियन लँग्वेजेस’ (सिफिल) येथे प्राध्यापक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रशिक्षणक्रमांच्या समन्वयक म्हणून काम केले आहे. एम.ए. इंग्लिश व जर्मन भाषेतील पदव्युत्तर पदविका अशी त्यांची शैक्षणिक गुणवत्ता आहे.
* त्याखेरीज अनुवाद विषयातील पदविकाही त्यांनी ‘मॅक्समुलर भवन’मधून आणि जर्मन भाषेतील अॅडव्हान्स डिप्लोमा ‘पुणे विद्यापीठा’तून संपादन केला. ‘केंब्रिज विद्यापीठा’च्या बिझनेस इंग्लिश परीक्षा आणि शिक्षक प्रशिक्षण परीक्षा त्या उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. तसेच त्या केंब्रिज विद्यापीठाच्या बिझनेस इंग्लिश सर्टिफिकेट परीक्षांकरिता मान्यताप्राप्त परीक्षक आणि प्रशिक्षक आहेत.
* औद्योगिक कर्मचार्यांना त्यांच्या व्यावसायिक गरजा लक्षात घेऊन त्यांनी भाषेचे ज्ञान दिले आहे. बिझनेस कम्युनिकेशनमध्ये त्यांचे विशेष प्रावीण्य आहे. ‘मर्सिडीज बेन्झ’, ‘फोक्सवागन’, ‘पर्सिस्टंट’, ‘एशियन पेंट्स’ अशा अनेक नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी इंग्लिश, मराठी व जर्मन शिकवले आहे. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिक्षणक्रमांचे नियोजन करणे याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे.
* तीन वर्षांच्या अमेरिकेतल्या वास्तव्यात त्यांनी अनेक गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने इंग्लिश शिकवले. सध्याही त्या इंग्लिश व जर्मनचे ऑनलाइन अध्यापन करीत आहेत. कोणतीही भाषा व्यावहारिक उपयुक्ततेच्या दृष्टिकोनातून आणि वर्गात विविध उपक्रम प्रत्यक्ष करून घेऊन रंजक पद्धतीने शिकवण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांनी अनेक लघुकथा व बालसाहित्याचा अनुवाद यापूर्वी केलेला आहे.

लेखकाची पुस्तकं
SALE Biodiversity And Sanctuaries | Biodiversity and Sanctuaries
SALE The Pressure Cooker Whistled And … | The Pressure Cooker Whistled And…
SALE Sounds- Sweet And Shrill | Sound Sweet and Shrill
SALE
Skip to content