कवितासंग्रह
-
Sale! Add to cartकधी उगवेल असा सूर्य माझा माझ्यासाठी सारा सरेल अंधार होई प्रकाशाची दिठी नदी वाहील वाहील कधी माझ्या प्रवाहाने पाणी असेलच माझे आणि माझेच वाहणे असे असेल असेल सारे फक्त माझे माझे माती असेलच माझी आणि माझेच रुजणे भय अवघे संपेल आणि होईल जगणे एक आनंदाचे झाड एक सावलीचे गाणे
All BooksSavaliche Gane | सावलीचे गाणे
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartश्री.हिमांशु कुलकर्णी यांचा शहर एक कबर हा एक महत्त्वाचा कवितासंग्रह आहे. पापणी जागी ठेवून आधुनिक माणसाचा शोध घेणारी खोल जाणीव या कवितांना व्यापून राहिली आहे. यंत्रयुगाने माणसाच्या डोक्यावरचे कष्टांचे ओझे खाली उतरवले. माणसाला यंत्राने दिलेली ही मुक्ती वरदान ठरली काय ? की माणसाचे यंत्र झाले आणि यातून माणूसकीच्या अवमूल्यानाची प्रक्रिया सुरू झाली ? स्वत:चं मढं स्वत:च्या पाठी अशी माणसे दहा बाय दहाच्या खुराडयात शेवट नक्कीच होईल गोड हे गोड स्वप्न पहात राहिली ? शहर ही एक संस्कृती की माणूसकीची कबर ? मोरांचा झडून गेलेला पिसारा आणि इथल्या सगळ्या स्वप्नांचा गळून गेलेला फुलोरा श्री.हिमांशु कुलकर्णी करूणेच्या डोळयांनी पहातात. निवडुंगातून फूल यावे तसे त्यांच्या काटेरी अनुभवाला आलेले करूणेचे हे फूल या कवितांतून हाक घालते. श्री.हिमांशु कुलकर्णी यांची भाषा ही करूणेचा स्वर लाभलेली सत्याची भाषा आहे. ही कविता सूचक प्रतिमांनी बोलते. या प्रतिमा ही कविता आरशांसारख्या पुढे ठेवते. आपले जे खरे रूप पहायचे माणसे सतत टाळीत असतात ते या प्रतिमांच्या आरशात कविता वाचताना त्यांना दिसू लागते. स्वत:ला समजून घेण्यासाठी स्वत:ला पहावेच लागते. श्री.हिमांशु कुलकर्णी यांची कविता कुठेही हिडिस-विकृत न होता बुध्दाच्या करूणेने हे दर्शन घडवते. श्री.हिमांशु कुलकर्णी यांच्या कवितांमधून प्रीतीचा कोमल झरा हळूवारपणे वहातो आहे. तो त्यांच्या प्रेमकवितांतून तर जावतोच; पण त्यांच्या उपरोधालाही तो हिंसेचे हत्यार बनू देत नाही. शहर एक कबर हा संग्रह मी वाचला तेव्हा एक उत्कृष्ट कवितासंग्रह वाचल्याचे समाधान मला मिळाले. मंगेश पाडगावकर
कवितासंग्रहShahar : Ek Kabar! | शहर : एक कबर!
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartमराठी कवितेच्या प्रवासातील सुमारे पाच दशकांहून अधिक काळ व्यापून असलेले, मराठी कवितेला वेगळे वळण आणि परिणामकारक बळ देणारे म्हणून समजले गेलेले कवी म्हणजे श्रीपाद भालचंद्र जोशी ! सळाळ आणि सळाळनंतर... , समांतर , मथितार्थ व इत्यादि या कवितासंग्रहांनंतरचा त्यांचा हा पाचवा कवितासंग्रह. गेल्या अर्धशतकातील वेगाने बदलत्या जीवनाच्या सार् याच पातळ्या, आयाम, बाजू, संबंध, गुंतागुंत समग्रपणे कवेत घेणार् या, मोठ्या समाजमनाचे प्रतिंबिंब अन् मोठ्या कालखंडाचा कॅनव्हास घेऊन काव्यकृती साकारणार् या या कवीचा काव्यप्रवास शैली, आशय व चिंतनदृष्ट्या आपल्या वेगळेपणाने नजरेत भरतो आहे.
All BooksTyanantar … | त्यानंतर…
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart -
Sale! Add to cartही अक्षरं नाहीत हे शब्द नाहीत या कविता नाहीत मौनातून उसळून मौनात विसर्जित होण्यापूर्वी मध्यसीमेवर अस्तित्वभान देत निमिषभर रेंगाळलेल्या आशयाची स्मारकं आहेत ही उभ्या आडव्या रेषा काही बिंदू, काही वळणं आणि बरंचसं अवकाश यांनी घडवलेली !
कवितासंग्रहUttarardha | उत्तरार्ध
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
कवितासंग्रह
Valeev | वळीव
₹75.00Original price was: ₹75.00.₹56.00Current price is: ₹56.00. Save ₹19 Add to cart -
Sale! Add to cart'विठूमाउलीऽ बापरखुमादेवीवराऽ विठोऽ विठ्ठलाऽ किती किती हाकांनी फोडलेला टाहो ! कुणी त्याला भजतात, कुणी अभ्यासतात. कुणी त्याला पाहतात, कुणी गळामिठी घेतात, कुणी समचरणी माथा टेकतात, कुणी निव्वळ मनीचा भाव पोचवतात. आणि आपल्यालाही तो वेगवेगळ्या रूपांत भेटतो. कधी सखा, कधी राजकारणी, कधी आधार देणारा, तर कधी भ्रष्टाचारी व्यवस्थेचा प्रतिनिधी बनूनसुद्धा ! सुष्टापासून दुष्टांपर्यंत, भल्यापासून बु-यापर्यंत अवघ्या चराचरात भरून राहिलेला तो - त्याचे दर्शन घडवणाऱ्या कविता विठोबा
कवितासंग्रहVithoba | विठोबा
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart'कविता सोबत नाव बाळगते कवीचं, पण एकदा लिहून हातावेगळी झाली, की ती कवीची नाही राहत. नाही राहत ती त्यातल्या शब्दांचीही. आस्वाद घेणाऱ्या रसिकाच्या मनात ती साकारते पुन्हापुन्हा - तो असतो तिचा नवा जन्म. कवितेचे हे जन्म... विलय... नवे जन्म... म्हणजे उत्कट जगण्याच्या अनावर क्षणांचा एक मनस्वी खेळ ! कवीला अवचित दिसणारा आणि त्याच्या शब्दांच्या प्रकाशझोतात रसिकाच्याही नजरेला पडणारा हा खेळ म्हणजे व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर
कवितासंग्रहVyakta Avyaktachya Madhyasimevar | व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartपापणी जागी ठेवून आधुनिक माणसाचा शोध घेणारी खोल जाणीव या कवितांना व्यापून राहिली आहे. यंत्रयुगाने माणसाच्या डोक्यावरचे कष्टांचे ओझे खाली उतरवले. यंत्राने दिलेली ही मुक्ती माणसासाठी वरदान ठरली का ? की माणसाचे यंत्र झाले आणि त्यातून माणुसकीच्या अवमूल्यनाची प्रक्रिया सुरू झाली ? निवडुंगातून फूल यावे तसे कवीच्या काटेरी अनुभवाला आलेले करुणेचे फूल या कवितांना साद घालते. श्री. हिमांशु कुलकर्णी यांची भाषा करुणेचा स्वर लाभलेली सत्याची भाषा आहे.
All BooksVyakul Pimpal | व्याकूळ पिंपळ
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cartआदित्य दवणे यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह. युद्ध ही एक थीम, एक विषय घेऊन ते लिहितात. खरंतर आजचा सगळा काळच अस्वस्थतेचा काळ आहे, तरी या कवीला इच्छा आहे युद्धभूमीचं नंदनवन करण्याची, इतिहासातून बोध घेत नवी पिढी घडवण्याची. माणसामाणसात पेटलेल्या आणि पेटवल्या जाणार् या युद्धानं तो अस्वस्थ होतो. संवेदनशील आणि सर्जनशील मनांवर आलेलं दडपण त्याला जाणवत राहतं. त्याला आजच्या परिस्थितीतील दाहकता कळलेली आहे. कधी विरोधाभास दाखवून, तर कधी उपरोधाचा सूर लावून तो कळकळीनं सांगत राहतो माणसाच्या मनात पेटलेल्या युद्धांबद्दल, युद्धानं दिलेल्या एकटेपणाबद्दल, तुटलेपणाबद्दल, माणसांतल्या जनावरांबद्दल, माणसाच्या असहाय्यतेबद्दल, त्याच्यातल्या माणूसपणाबद्दल. या कवीची श्रद्धा आहे आपल्या शब्दांवर आणि त्यातल्या अर्थांवर. ते अर्थ तो नेमकेपणाने आपल्यापर्यंत पोचवतो. माणसात लपलेल्या हिंस्रतेचे अनेकविध पदर उलगडून दाखवणारा हा कवी त्याच्यातल्या माणूसपणाचेही अनेकदा दर्शन घडवतो. नीरजा
All BooksYuddhanantar… | युद्धानंतर…
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart
Skip to content
