WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Vidyananda Ranade | विद्यानंद रानडे

Vidyananda Ranade | विद्यानंद रानडे

पुणे विद्यापीठात १९६० साली दुसरा क्रमांक मिळवून प्रथम वर्गात बी.ई. (सिव्हील) पदवी प्राप्त केल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये पहिला क्रमांक मिळवून राज्यशासनाच्या पाटबंधारे विभागात सरळ सेवा वर्ग-१ मध्ये प्रवेश.
पाटबंधारे विभागात १९६१ सालापासून काम करताना लघु, मध्यम आणि मोठ्या पाटबंधारे प्रकल्पांचे अन्वेषण, संकल्पन, उभारणी आणि सिंचनव्यवस्थापन या सर्व प्रकारच्या कामांचा ३४ वर्षांचा अनुभव.
नोकरीच्या काळात जागतिक बँकेच्या आर्थिक साहाय्यातून चालू असलेल्या योजनेतून फिलिपीन्समध्ये १९८१-८२ साली तांत्रिक सल्लागार म्हणून एक वर्ष काम.
सन १९८८ मध्ये अमेरिकेत जलसंपत्ती विकास प्रणालींबद्दलचे साडेतीन महिन्यांचे प्रशिक्षण.
मे १९९२ मध्ये ब्राझील देशातील कार्यशाळेत शोधनिबंध सादर.
राज्यातील दोन मोठ्या धरणांच्या अभ्यासातून ‘धरणे आणि पर्यावरण’ हे पुस्तक १९९२ साली शासनातर्फे प्रकाशित.
जून-जुलै १९९५मध्ये इंडोनेशिया येथील आधुनिक सिंचन प्रकल्पाचा मूल्यांकन अहवाल लिहिण्याच्या कामाचा अनुभव. नोकरीच्या काळात अनेक राष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग आणि शोधनिबंधांचे सादरीकरण.
नोव्हेंबर १९९५ अखेर सचिव पाटबंधारे म्हणून सेवानिवृत्त.
सेवानिवृत्तीनंतरच्या काळात परदेशातील ११ आंतरराष्ट्रीय परिषदा व चर्चासत्रात पेपर आणि पोस्टर यांचे सादरीकरण करून सक्रीय सहभाग.
देशात भरलेल्या बर्‍याच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंधांचे सादरीकरण.
गेल्या २५ वर्षात बर्‍याच शासन नियुक्त समित्यांवर सभासद आणि अध्यक्ष म्हणून काम करताना पाण्यासंबंधीच्या विविध क्षेत्रातील अनुभव.

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top