WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Prabhakar Panshikar | प्रभाकर पणशीकर

Prabhakar Panshikar | प्रभाकर पणशीकर

प्रभाकर पणशीकर तथा पंत
• जन्म : १४ मार्च १९३१, मुंबई, महाराष्ट्र
• निधन : १३ जानेवारी २०११, पुणे, महाराष्ट्र
• व्यवसाय : अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते
• प्रल्हाद केशव अत्रे लिखित ‘तो मी नव्हेच’ या नाटकात साकारलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. ‘इथे ओशाळला मृत्यू’ या संभाजीराजांच्या मृत्यूवर आधारित नाटकातील औरंगजेबाची भूमिकाही त्यांनी केली. त्यांनी स्थापन केलेल्या ‘नाट्यसंपदा’ या नाट्यसंस्थेचे ‘कट्यार काळजात घुसली’ हे संगीतनाटक विशेष प्रसिद्ध झाले.
• प्रभाकर पणशीकरांनी त्यांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत नाटकांचे सुमारे ८००० हून अधिक प्रयोग केले. मराठीसोबतच गुजराती व कन्नड भाषेतही त्यांनी अभिनय केला. ४ मराठी चित्रपट, ४ मराठी मालिका यांसोबतच एक इंग्रजी मालिका केली आणि रेडिओसाठी असंख्य नाट्यवाचने केली.
• पणशीकरांचा जन्म मुंबईत फणसवाडी येथे वेदविद्येसंपन्न ब्राह्मण कुटुंबात झाला. पंतांचे वडील विष्णूशास्त्री हे दशग्रंथी ब्राह्मण होते, तर त्यांचे आजोबा वासुदेवशास्त्री हे संस्कृतचे प्रकांड पंडित होते.
• लहानपणापासूनच प्रभाकरांचा ओढा नाट्यक्षेत्राकडे होता. शाळेत असताना वेगवेगळ्या प्रसिद्ध नाटक कंपन्यांची नाटके त्यांनी पाहिली. पुढे ती नाटके गिरगावात गणेशोत्सवात सादर केली. त्यामुळे पौगंडावस्थेतच त्यांना घरापासून परागंदा व्हावे लागले.
• १३ मार्च १९५५ रोजी ‘राणीचा बाग’ या नाटकाद्वारे प्रभाकर पणशीकरांनी मराठी रंगभूमीवर प्रवेश केला.
• वयाच्या पंचविशीत त्यांनी लेखक-दिग्दर्शक मो. ग. रांगणेकरांच्या ‘नाट्यनिकेतन’ या संस्थेत प्रवेश केला आणि ‘कुलवधू’, ‘भूमिकन्या सीता’, ‘वहिनी’, ‘खडाष्टक’ अशा नाटकांमधून कामे करण्यास सुरुवात केली.
तो मी नव्हेच
• इ.स. १९६२ साली रांगणेकरांनी अत्र्यांचे ‘तो मी नव्हेच’ हे नाटक सादर करण्याचे ठरवले. अत्र्यांनी सुचवलेली अन्य नटांची नावे न स्वीकारता रांगणेकरांनी पंतांनाच मुख्य भूमिका करण्याची विनंती केली.
• १५ ऑगस्ट १९६२ रोजी **‘तो मी नव्हेच’**चा मुहूर्ताचा प्रयोग झाला.
• या नाटकात पंतांनी लखोबा लोखंडे, दिवाकर दातार, दाजीशास्त्री दातार, कॅप्टन अशोक परांजपे आणि राधेश्याम महाराज अशा पाच वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तीच्या भूमिका साकारल्या.
• काही क्षणांत भूमिकाबदल करण्याचे आव्हान त्यांनी लीलया पेलले. रसिकांचे पराकोटीचे प्रेम आणि कीर्ती पंतांना ‘तो मी नव्हेच’ या नाटकामुळे नाट्यसंपदा
• मो. ग. रांगणेकरांशी मतभेद झाल्यानंतर पंत **‘नाट्यनिकेतन’**मधून बाहेर पडले आणि **‘अत्रे थिएटर्स’**मधून ‘तो मी नव्हेच’चे प्रयोग सादर करू लागले.
• आपले स्नेही मोहन वाघ आणि वासुदेव कोल्हटकर यांच्या मदतीने त्यांनी इ.स. १९६३ साली ‘नाट्यसंपदा’ या संस्थेची स्थापना केली.
• विद्याधर गोखले लिखित ‘अमृत झाले जहराचे’ आणि वसंत कानेटकर यांचे ‘मोहिनी’ अशी दोन नाटके ‘नाट्यसंपदे’ने रंगमंचावर आणली. मात्र ती फारशी चालली नाहीत.
• त्यानंतरच्या ‘मला काही सांगायचंय’ आणि विशेषतः ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकांच्या निर्मितीने ‘नाट्यसंपदा’ला स्थैर्य, आर्थिक यश आणि प्रसिद्धी मिळवून दिली.
• ‘कट्यार काळजात घुसली’ या सुप्रसिद्ध संगीत नाटकाने इतिहास घडवला.
• इ.स. १९७० मध्ये **‘तो मी नव्हेच’**चे हक्क ‘नाट्यसंपदा’ने विकत घेतले. पुढे या नाटकाचे पंतांनी २००० हून अधिक प्रयोग केले.
• ‘नाट्यसंपदा’ने ‘अश्रुंची झाली फुले’, ‘कट्यार काळजात घुसली’ आणि ‘संत तुकाराम’ ही तीन नाटके एकाच दिवशी तीन नाट्यगृहांत लावून एक न मोडण्यासारखा विक्रम प्रस्थापित केला.

मानसन्मान आणि पुरस्कार

• आचार्य अत्रे पुरस्कार
• उत्तुंग पुरस्कार
• कलाश्री पुरस्कार
• डॉ. काशीनाथ घाणेकर स्मृती पुरस्कार
• नटश्रेष्ठ केशवराव दाते पुरस्कार
• जागतिक मराठी परिषद पुरस्कार
• नटवर्य दत्ताराम पुरस्कार
• दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार
• नवरत्न पुरस्कार
• संगीत नाटक अकादमी पुरस्कार
• नाट्यगौरव सुवर्ण पुरस्कार
• नाट्य दर्पण – वर्षाचा मानकरी
• नटसम्राट नानासाहेब फाटक स्मृती पुरस्कार
• महाराष्ट्र गौरव पुरस्कार
• महाराष्ट्रभूषण पुरस्कार
• महाराष्ट्र शासनाचा पहिला जीवन गौरव पुरस्कार — नंतर या पुरस्काराचे ‘प्रभाकर पणशीकर पुरस्कार’ असे नामांतर करण्यात आले.
• नटसम्राट बालगंधर्व स्मृती पुरस्कार
• रत्नप्पा कुंभार पुरस्कार
• विष्णूदास भावे सुवर्ण पदक
• राजर्षी शाहू सुवर्ण पदक

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top