WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Nirmala Purandare | निर्मला पुरंदरे

Nirmala Purandare | निर्मला पुरंदरे

निर्मला बळवंत पुरंदरे, यांचा जन्म बडोद्यामध्ये झाला.[१] माहेरच्या माजगांवकर (जन्म : ५ जानेवारी १९३३ – २० जुलै २०१९) या 'वनस्थळी' संस्थेच्या संस्थापिका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या होत्या.
* पुण्याला शिकायला येणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यासाठी त्या 'विद्यार्थी सहायक समिती'चे वसतिगृह चालवायच्या.
* वनस्थळी ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून त्यांनी खेड्यापाड्यातील स्त्रियांमधून बालवाडी शिक्षिका तयार केल्या.
* पुरंदरेंनी वीसहून अधिक वर्षे श्री. ग. माजगावकर यांच्या 'माणूस' या साप्ताहिकाच्या संपादकीय विभागात काम केले होते.
* 'असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ फ्रान्स' या संस्थेच्या अध्यक्ष म्हणूनही त्या कार्यरत होत्या.
व्यक्तिगत जीवन
निर्मलाताई या बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी,'माणूस' साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर आणि 'राजहंस प्रकाशना'चे दिलीप माजगावकर यांच्या भगिनी होत. गायिका-लेखिका माधुरी पुरंदरे या निर्मलाबाईंच्या कन्या आहेत.
निर्मला पुरंदरे यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत, ती खालीलप्रमाणे
* बालवाडीताई प्रशिक्षण
* स्नेहयात्रा (प्रवासवर्णनपर)
निर्मला पुरंदरे यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके
* आत्मसिद्धा निर्मला पुरंदरे आणि मिशन 'वनस्थळी'ची चरितकथा (माणिक कोतवाल)
निर्मला बळवंत पुरंदरे यांना मिळालेले पुरस्कार
* दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा आदिशक्ती पुरस्कार (१९९८)
* पुणे महापालिकेचा पुण्यभूषण पुरस्कार (२०१२)
* महर्षी कर्वे संस्थेचा बाया कर्वे पुरस्कार (२००३)
* महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार (२००१)

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top