WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock
SKU: I-01-2004 Category: Brand:

Kadambari Don | कादंबरी दोन

लेखक: Vijay Tendulkar | विजय तेंडुलकर

Original price was: ₹175.00.Current price is: ₹131.00. Save ₹44

Out of stock

Notify Me when back in stock

तुला राजकारणात दीर्घ काल टिकून तुझा उत्कर्ष साधावयाचा असेल तर मजप्रमाणे भुई धरून रहाणे शिकावे लागेल. राजकारणात भुई धरून रहाण्यास पर्याय नाही. राजकारण अनेक करतात परंतू कितीही विलंब लागला तरी जो धीर, पुढील नियोजन व प्रयत्न न सोडता व न कंटाळता संधीची वाट पहातो तोच अखेर यशस्वी संधिसाधू व राजकारणी

होतो. आयुष्यात काय अथवा राजकारणात काय, कोणतीही संधी सहसा एकदाच येऊन संपत नसते ती परत येण्याची वाट पाहण्याचा पेशन्स संपल्याने आपण संपतो. संधी पुन्हा येते तेव्हा आपण नसतो. तर नगरपालपद मिळवण्याच्या हातघाईस तू आला आहेस व भलतेच काही तरी करीत आहेस, तसे करू नको. तू समजतो आहेस तसा, तू निवडलेला उ.पु. सेनेत जाऊन आपले अस्तित्व नगरास जाणवून देण्याचा शॉर्ट कट म्हणजे जवळचा मार्ग नगरपालपदाकडे जाणारा नसून तो प्रत्यक्ष दंगल न करता दंगलविरोधी कायद्याखाली तुरूंगात पोचणारा आहे. शहाणा राजकारणी सनदशीर राजकारणावर अविचल श्रध्दा बाळगणारा असतो. गरज पडल्यास तो दंगली व कत्तलीही घडवितो परंतू असे काही घडविल्याच्या आरोपातून नामानिराळा रहातो. घडवणारा तो व निषेध करणारा तोच अशी दुहेरी भूमिका जो कल्पकतेने बजावतो, तोच उच्चपदी पोचतो.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : सप्टेंबर 2004
बुक कोड : I-01-2004
वजन : 300 g
पाने : 244
आर्टिस्ट : श्याम देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : नोव्हेंबर 2006

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top