YouTube व्हिडिओ
राजहंस प्रकाशन | गोष्ट राजहंसी पुस्तकाची | संस्कृतिरंग | कल्चर शॉक
राजहंस प्रकाशन | गोष्ट राजहंसी पुस्तकाची | संस्कृतिरंग | कल्चर शॉक 'गोष्ट राजहंसी पुस्तकाची' संस्कृतिरंग लेखिका वैशाली करमरकर आणि पत्रकार, संपादक संध्या टाकसाळे यांच्या गप्पांमधून ऐकुया संस्कृतिरंग या पुस्तकाबद्दल.
राजहंस प्रकाशन | गोष्ट राजहंसी पुस्तकाची | मुळारंभ | डॉ. आशुतोष जावडेकर
गोष्ट राजहंसी पुस्तकाची मुळारंभ कॉलेजचं पहिलं वर्ष, नव्याची उत्कंठा, रॅगिंगची भीती. टेस्ट, प्रॅक्टिकल, परीक्षा अन् मस्ती, गॅदरिंग, ट्रिप, दंगा, प्रेमसुध्दा! ही आपल्या साऱ्यांचीच कहाणी. या वयातला रम्य सळसळता प्रवास म्हणजे पुढच्या आयुष्याच्या पोटात जपली जाणारी मखमली आठवण. ती आठवण उलगडणारी कादंबरी - मुळारंभ. ऐकुया या कादंबरीमागची गोष्ट, गोष्ट राजहंसी पुस्तकाची या मालिकेमध्ये, लेखक डॉ. आशुतोष जावडेकर आणि मुलाखतकार सौरभ खोत यांच्या गप्पांमधून.
राजहंस प्रकाशन | संवाद राजहंसी सारस्वतांशी | हेमंत गोडसे | चित्रलेखा
राजहंस प्रकाशित, भगवतीचरण शर्मा लिखित, हेमंत गोडसे अनुवादित, चित्रलेखा. संवाद राजहंसी सारस्वतांशी या मालिकेत चित्रलेखा या कादंबरीबद्दल ऐकुया अनुवादक हेमंत गोडसे यांच्याकडून. हे पुस्तक मोबाईल ॲप, वेबसाईटवर आणि राजहंसच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे.
राजहंस प्रकाशन | संवाद राजहंसी सारस्वतांशी | लेखिका: डॉ वैशाली देशमुख | टीनएज डॉट कॉम भाग १ व २
‘टीन एज’मध्ये प्रवेश करणाऱ्या सगळ्याच मुलामुलींना सतावणाऱ्या समस्या अन् प्रश्न आणि त्यांना समजूतदारपणे सामोरे जाऊन त्यांचं शास्त्रीय पद्धतीनं निराकरण करणारं, केवळ मुलामुलींनाच नव्हे तर पालक अन् शिक्षकांनाही उपयुक्त ठरणारं पुस्तक. म्हणजेच टीनएज डॉट कॉम भाग १ आणि भाग २. या क्षेत्रात नावाजलेल्या तज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख यांनी मुलामुलींना आपलंसं करून सांगितलेल्या या गोष्टी म्हणजे सल्लामसलत नाही, तर या आहेत किशोर मित्रमैत्रिणींशी मारलेल्या दिलखुलास गप्पा! याबद्दल ऐकुया राजहंसी लेखिका डॉ. वैशाली देशमुख यांच्याकडून..
राजहंस प्रकाशन । गोष्ट राजहंसी पुस्तकाची । निपुण-शोध
अनेक वर्ष देशविदेशांतील कंपन्यांसोबत काम करताना आलेल्या विविधांगी अनुभवांचे कथन म्हणजे निपुण-शोध... गिरीश टिळक यांचे अनुभव नक्कीच वाचनीय आहेत... तेव्हा या पुस्तकाविषयी विस्ताराने जाणून घेण्यासाठी चुकवू नये अशी 'गोष्ट राजहंसी पुस्तकाची'..