YouTube व्हिडिओ

सफर 'राजहंसी' पुस्तकांची | निळाईच्या छटा

भारतीय वायूसेनेत वैमानिक म्हणून कामगिरी बजावणारे एअर व्हाईस मार्शल (निवृत्त) सूर्यकांत चाफेकर. या जिगरबाज अधिकाऱ्याचे रोमांचक आत्मकथन म्हणजे ‘राजहंस’ प्रकाशित ‘निळाईच्या छटा’ ही कलाकृती. सेवेत असताना चाफेकर यांनी स्वीकारलेल्या जोखमी, त्यांची साहसी वृत्ती आणि केवळ शत्रुलाच नाही तर प्रस्थापित व्यवस्थेला धैर्याने दिलेला लढा या पुस्तकातून आपल्यासमोर उभा राहतो. एका प्रामाणिक आणि स्वाभिमानी वैमानिकाचे आत्मकथन प्रत्येकाने एकदा तरी वाचायलाच हवे...

चित्रकार दीनानाथ दलाल यांच्या ५१व्या स्मृतिदिनानिमित्त राजहंस प्रकाशित, सुहास बहुळकर लिखित, चित्रकार दीनानाथ दलाल - चित्र आणि चरित्र

पुस्तकाची वैशिष्ट्ये - १. ४०८ पृष्ठासंख्या २. ३२ बहुरंगी चित्रांची पृष्ठासंख्या ३. अनेक कृष्णधवल चित्रे ४. दलालांवरील लिहिलेले लेख ५. दलालांवरील मान्यवरांचे लेख ६. दलाल व समकालीन चित्रकार ७. दलाल यांनी काढलेली चित्रे कालक्रमानुसार

चाणक्य | चंद्रगुप्त | अशोक - 'त्रिधारा' |प्रकाशन समारंभ !

राजहंस प्रकाशित - चाणक्य | चंद्रगुप्त | अशोक - 'त्रिधारा'

४ फेब्रुवारी - विश्व कर्करोग दिवस

कर्करोग विषयीचे गैरसमज दूर करणारी, शंकांचे योग्य निरसन करणारी आणि या समस्येचे यथातथ्य रूप नजरेसमोर आणून समंजस अन सकारात्मक भाव जागवणारी 'राजहंस' प्रकाशित कर्कविज्ञानाची गोष्ट टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि JASCAP NGO या दोन संस्थांमार्फत रुग्णांपर्यंत पोहोचत आहे.

टिळकपर्व | अरविंद व्यं. गोखले

व्यासंगी पत्रकार अरविंद व्यं. गोखले यांच्या लेखणीतून साकारलेल्या मंडालेचा राजबंदी या ग्रंथानंतर नवी 'राजहंसी' उतारी - 'टिळकपर्व' !