YouTube व्हिडिओ

21. चंद्रशेखर: जसं जगलो तसं | Chandrashekhar

१९९० च्या दशकात वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांनी आणि सीमा प्रश्नांनीही देश धुमसत असताना १० नोव्हेंबर १९९० रोजी चंद्रशेखर यांनी देशाचे आठवे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली. चंद्रशेखर यांच्याविषयी आजच्या पिढीला विशेष माहिती नाही. समाजवादी विचारसरणीच्या मुशीत घडलेल्या, आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या आणि १९८३ साली भारत यात्रेद्वारे देश पिंजून काढलेल्या चंद्रशेखर यांनी ‘जीवन जैसे जिया’ या आपल्या आत्मचरित्रात आपला जीवनप्रवास उलगडला आहे. जसं जगलो तसं… या नावानं या चरित्राचा मराठी अनुवाद केलाय लेखक-ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी. याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.

20. | ज्याचं त्याचं एव्हरेस्ट | सत्यघटनेवर आधारित अद्भुत कादंबरी

हिमालय अनेकांना वेड लावतो. का? कसं? एव्हरेस्टसारखं अत्युच्च शिखर सर केल्यानंतरही गिर्यारोहकांची पावलं पुन:पुन्हा हिमालयाकडे का वळतात? पर्वतराजीतील भव्यता आणि शांतता, रौद्रता आणि सात्त्विकता त्यांना भुरळ पाडत असते? की निसर्गाचा लहरीपणा त्यांच्यातील धाडसी आणि अपराजित वृत्तीला सतत आव्हान देत असतो? अशावेळी त्यांचे प्रियजन कशी साथ देत असतील? एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या अनावर ओढीपायी तीन पिढ्यांमध्ये निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष आणि परस्परांना समजून घेण्याचे प्रयास चित्रित करणारी - ‘सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं’ याचा प्रत्यय देणारी - सत्यघटनेवर आधारित कादंबरी!

19. समृद्ध, भावसंपन्न गोंदणखुणा

एखाद्या संवेदनशील स्त्रीनं आपल्या जाणत्या सखीला कधी मनोगत तर कधी हृद्गत सांगावं, तसा या 'गोंदणखुणा' - चा आशय आहे. निसर्गातील एखाद्या घटकाचा अनपेक्षित साक्षात्कार, मानवी स्वभावातील अतर्क्य भावनाट्य, रुणझुणत्या कवितेच्या चरणाशी सहज घडलेला अर्थमेळ, स्त्री-संवेदनेशी जोडलेल्या घटना-प्रसंगांची चलतचित्र किंवा जीवनाच्या एखाद्या प्राणसूत्राचं स्वतःला निःसंदर्भ करून केलेलं आत्मचिंतन - अशा अनेक आशयसूत्रांची स्मरणी या लेख- संग्रहात आहे.

18. बाईची कथा आणि व्यथा मांडणारी कादंबरी

बाईचं संघर्षमय जगणं चित्रित करणं मराठी कादंबरीला नवं नाही... पण बायकांचा समूह मात्र क्वचितच कोणी रंगवला ... ‘बाय गं...’ या कादंबरीत लहानशा खेड्यातला बायकांचा समूह आपल्याला भेटतो. त्यांचं एकमेकींशी जोडलेपण कळतं, त्यांचे नित्य नवे प्रश्न उमगतात आणि त्यांचं त्या प्रश्नांना भिडणंदेखील.... लहानसं खेडं ते मुंबई.... डोईवरचा पदर ते जीन्स... कुरडया - शेवया ते नूडल्स... निरक्षर आयाबाया ते वकील, डॉक्टर, इंजिनीअर मुली.. एकत्र कुटुंबाचा सांभाळ ते मोठ्या हॉस्पिटलचं व्यवस्थापन... हा लांब पल्ल्याचा प्रवास.... आणि मुख्य म्हणजे हा सारा प्रवास सजगपणे पाहणारी, विचार करणारी नायिका.... अत्यंत ओघवत्या भाषेतली आणि चित्रमय शैलीतली ही कादंबरी आवर्जून वाचायला हवी..... बाय गं..

16. स्वतंत्रपण एकल राहणाऱ्या स्त्रीचं आत्मकथन

हे आहे स्वत:च्या निर्णयानं स्वतंत्रपणे एकल राहणा-या स्त्रीचं आत्मकथन. साध्यासुध्या मध्यमवर्गीय कुटुंबातली ही मुलगी. जीवनात लग्न तिनं गृहीत धरलेलंच होतं. तरीही एका टप्प्यावर तिनं एकल आणि स्वतंत्रही राहण्याचा निर्णय घेतला - का? कसा? तिच्या जीवनाची निरनिराळी वळणं दाखवणारं हे आत्मकथन. मुलीचं लग्न होतं, तेव्हा तिचं जीवन समूळ बदलतं; हे सर्वमान्य. पण ती एकटीनं स्वतंत्रपणे राहण्याचा निर्णय घेते तेव्हा? तिचं जीवन कसं बदलतं? काय होतं?