Yugantar (Sugam Saransh) | युगांतर (सुगम सारांश)
'युगांतर सहस्रकाच्या उंबरठयावर आज एक नवी औद्योगिक क्रांती वेगाने आकार घेते आहे. ही आहे सौम्य औद्योगिक क्रांती. कारण औद्योगिक युगातले अनेक जाच, काच व ताप सौम्य करत नेण्याची गुंजाइश तिच्यात आहे. अभूतपूर्व अशा सार्वत्रिक संपर्कशक्तीमुळे आता ग्राहक-उत्पादक थेट संबंध तसेच पारदर्शक व सहभागी निर्णयप्रक्रिया शक्य होत आहे व ही निर्णयप्रक्रिया आंधळया बाजारपेठेच्या व बधीर नोकरशाहीच्या पलीकडे नेणारी असेल. बहुउत्पादक आणि तरीही अल्पभांडवली तंत्रामुळे आता श्रमिकच ग्राहकोत्पादक बनू शकेल. समतेच्या नावाखाली सर्वांना नोकर बनवून टाकणा-या समाजसत्तावादाचे स्वप्न आता विरले आहे. आता स्वप्न आहे ते सर्वोद्योजक समाजाचे. व्यक्तिस्वातंत्र्य आणि योगदानात्मक न्याय अबाधित ठेवून सामाजिक सुरक्षा जाळे विणण्याचे. आजच्या इतिहासाची नव्या नजरेने आर्थिक-राजकीय-नैतिक व रीतीविषयक मीमांसा करणारे कालचे दुराग्रह झटकून टाकून उद्याचे भविष्य वाचणारे युगांतर '
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २०००
- सद्य आवृत्ती : ऑक्टोबर २०००
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'