Ya Jeevanache Kay Karu? | या जीवनाचे काय करू?
Editor:
Karuna Gokhale | करुणा गोखले
अभय बंग यांच्या ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ पुस्तकाने महाराष्ट्राच्या हृदयाला व जीवनशैलीला हात घातला. ‘कोवळी पानगळ’ अहवालाने महाराष्ट्राच्या सामाजिक संवेदनशीलतेला हलवले. ‘निर्माण’ या उपक्रमाने युवा पिढीसमोर नवी क्षितिजे उभी केली. आता ते महाराष्ट्राशी संवाद करत आहेत, एका खास प्रश्नावर. या जीवनाचे काय करू? माणसासमोर उभा असलेला एक सनातन प्रश्न! आपल्या जन्मासोबतच हा प्रश्नही जन्माला येतो. त्याचे उत्तर शोधल्याशिवाय समाधान नाही!! ...पण हा शोध सोपाही नाही. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात मदत व्हावी, या हेतूने घेऊन येत आहोत... अभय बंग यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या लेखांचा व दिलेल्या भाषणांचा निवडक संग्रह.
- आय.एस.बी.एन. नं. - 978-93-95483-51-3
- पहिली आवृत्ती - जानेवारी २०२३
- चित्रकार - बी. जी. लिमये
- बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
- आकार - ५.५" X ८.५"
- बुक कोड - A-09-2023
- पृष्ठ संख्या - २३२
- वजन - २८५