
Vyakta avyaktachya madhyasimevar | व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर
'कविता सोबत नाव बाळगते कवीचं,
पण एकदा लिहून हातावेगळी झाली,
की ती कवीची नाही राहत.
नाही राहत ती त्यातल्या शब्दांचीही.
आस्वाद घेणाऱ्या रसिकाच्या मनात
ती साकारते पुन्हापुन्हा -
तो असतो तिचा नवा जन्म.
कवितेचे हे जन्म... विलय... नवे जन्म...
म्हणजे उत्कट जगण्याच्या अनावर क्षणांचा
एक मनस्वी खेळ !
कवीला अवचित दिसणारा आणि
त्याच्या शब्दांच्या प्रकाशझोतात
रसिकाच्याही नजरेला पडणारा
हा खेळ म्हणजे
व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर
ISBN: 978-81-7434-961-3
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५"X ८.५"
- पहिली आवृत्ती : मे २०१६
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
- राजहंस क्रमांक : E-02-2016