Walong - Eka Yuddhakaidyachi bakhar | वालाँग - एका युध्दकैद्याची बखर
१९६२. याच वर्षी हिमालयातली हिमशुभ्र शांतता भंग पावली. शांतिमंत्राचा नाद घुमणाऱ्या हिमालयात तोफांचा गडगडाट घुमू लागला. शांततेचं प्रतीकच असलेल्या श्वेतवर्ण हिमालयावर रक्ताचे लाल पाट वाहिले... चिन्यांनी आक्रमण केलं... पराक्रमाची शर्थ करूनही भारतीय जवानांच्या वाट्याला आला पराजय... माघार... कैद... ‘वालाँग... एका युद्धकैद्याची बखर'मध्ये भारत-चीन युद्धात लढलेले लेफ्टनंट कर्नल श्याम चव्हाण कथन करत आहेत एक शौर्यगाथा... आधी तुंबळ रणसंग्राम आणि नंतर कैद... एक चित्तथरारक अनुभवकथन.
ISBN: 978-81-7434-016-0
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती:जानेवारी १९९०
- सद्य आवृत्ती : जुलै २०२१
- मुखपृष्ठ व नकाशे : बाबू उडुपी
- राजहंस क्रमांक : I-01-1988