Teen Hotya Pakshini | तीन होत्या पक्षिणी
डोरोथी, कॅथरीन आणि मेरी - तीन असामान्य आफ्रो-अमेरिकन गणितज्ञ महिला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज घेत आपल्या कार्यक्षेत्रात त्यांनी स्वत:चा
अमिट ठसा उमटवला. सामाजिक विषमतेपासून पुरुषी वर्चस्ववादापर्यंत
अनेक आघाड्यांवर लढा देत आपल्या प्रतिभेच्या, प्रयत्नांच्या आणि
चिकाटीच्या बळावर त्यांनी अंतराळ अभियांत्रिकीच्या इतिहासात आपली
नावे कोरली. ज्ञानाच्या आणि कर्तृत्वाच्या पंखांच्या सामर्थ्याने पायातले
साखळदंड तोडून टाकून स्वत:चे मोकळे आकाश निर्माण
करणाऱ्या तीन होत्या पक्षिणी त्या...