
Tarunyabhan | तारुण्यभान
'छेडछाड, लैंगिक अत्याचार, लैंगिक फसवणूक,
असमाधानकारक कामजीवन, गुप्तरोग, एड्स,
विकृत लैंगिक वर्तन ही सगळी कशाची लक्षणे आहेत ?
लक्षणे अनेक, पण रोगांचे मूळ एकच - लैंगिक निरक्षरता !
सुशिक्षित म्हणवणाऱ्या, शहरी तरुण-तरुणींनासुद्धा स्त्री-पुरुषांच्या
प्रजननसंस्था, लैंगिक अवयवांची स्वच्छता, मासिक पाळी,
गर्भारपण, स्वप्नदोष, गुप्तरोग यांविषयी प्राथमिक माहितीही नसते.
शिक्षित युवक-युवतीच एवढे लैंगिकता निरक्षर,
तर मग अशिक्षित युवा आणि त्यांचे अनभिज्ञ पालक यांच्याकडून
लैंगिकता साक्षरतेची अपेक्षा कशी करणार ?
आपल्या नवतरुण पाल्याच्या मनातील लैंगिक भावनांच्या
कल्लोळांविषयी बहुसंख्य पालक अंधारात असतात. मग त्याच्या
हातून लैंगिक गैरवर्तन किंवा गुन्हा घडला की ते हडबडून जातात.
यावर उपाय एकच - तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलामुलींनी
आणि त्यांच्या पालकांनी लैंगिकता साक्षर होणे !
का व कसे, हे समजावून सांगत आहे,
सुलभ आणि सचित्र ‘तारुण्यभान’...'
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २०२०
- चित्रकार : राहुल देशपांडे
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ६ .५ " X ९.५"
- बुक कोड : J-01-2020