
Shimpetle Aakash | शिंपेतले आकाश
'हा विलक्षण प्रवास सुरू झाला
एका मध्यमवर्गीय मराठी घरातून.
रंग, रेषा, कविता, गाणं यांच्यासह
अनुभवांच्या अन् जीवनाच्या विविध रंगांत
न्हाऊन निघालेलं त्याचं लोभस रूप
आता एका प्रशांत पडावावर विसावलं आहे.
सुखदु:खांच्या घटना, हर्षामर्षाचे प्रसंग,
कृतार्थतेचे अन् वैफल्याचे क्षण,
एका पारड्यात तर्क तर दुसऱ्यात अध्यात्म
अशा विविधरंगी वाटचालीत सोबत चालणाऱ्या कितीक व्यक्ती.
जीवनाच्या स्वप्नवास्तवाला वेढणाऱ्या
आभाळाएवढ्या चैतन्याचं
एका संवेदनशील मनात उमटलेलं
नितळ प्रतिबिंब म्हणजेच
शिंपेतले आकाश
ISBN: 978-81-7434-637-7
- बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
- आकार : ६.७५" X ९.५"
- पहिली आवृत्ती : मार्च २०१७
- मुखपृष्ठ : सतीश भावसार
- राजहंस क्रमांक : C-02-2017