Shidori 2 | शिदोरी २

Shidori 2 | शिदोरी २

शिदोरी म्हणजे संचित. माणसाच्या सोबत असलेली हक्काची मीठ - भाकर. 

आपल्या आयुष्यातील उत्कट, कातर अनुभवांनी दिलेलं शहाणपण. 

जगण्याच्या प्रवासात आलेल्या घटनांनी दिलेली सार्थ शिकवण हीसुद्धा शिदोरीच. 

कधी संदेशाच्या रूपात, कधी आशीर्वादाच्या रूपात. 

शिदोरी भूक भागवतेच, पण ती तुम्हाला आधार देते, बळ देते, 

ऊर्जा देते, चैतन्य देते. विचारांची शिदोरी पडताना सावरते, गोंधळताना 

स्थिर ठेवते, निराशेत मनावर फुंकर मारते आणि अतिविश्वासाच्या, 

अतिउन्मादाच्या वेळी आपल्याला लगामही घालते. हातांचे पंख 

करण्याची ताकद शिदोरीत असते , काट्यांकुट्यांतून वाट काढण्याचं

 शहाणपण शिदोरीत असतं आणि अतिउत्साहात भरारी घेण्याची 

अतिशयोक्त रिस्क घेताना थोपवण्याचं चतुरपणही शिदोरीत असतं. 

ऊर्जेनं भरलेली, सकारांनी गजबजलेली, आत्मविश्वासानं सजवलेली 

आणि बंधुभावनेनं बहरलेली. विचारांची भूक लागलेल्यांना पोटभर देणारी..

 या पुस्तकाचं पान न् पान उलगडताना, डॉ. सुरेश हावरे 

यांचा तेजानं भरलेला, मदतीच्या भावनेनं कृपामय झालेला, 

साऱ्या बांधवांसाठी उत्कर्षाचं, उद्धाराचं पसायदान मागणारा

 'हसतमुख चेहरा' दिसत राहतो, 

ही या विचारांची एक उजवी बाजू आहे. 

अरुण म्हात्रे

ISBN: 978-93-95483-22-3
  • पहिली आवृत्ती : सप्टेंबर २०२२
  • चित्रकार : प्रतिमा ऑफसेट
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५ " X ८.५"
  • बुक कोड : L-04-2022
M.R.P ₹ 230
Offer ₹ 207
You Save ₹ 23 (10%)