Shodh Aaraspani | शोध आरस्पानी
आपल्या जीवनात अनेक माणसं सामील होत असतात.
त्यांचे आपल्याशी होणारे वेगवेगळ्या पातळीवरचे खुले व
मूक संवाद रुजवतात अनेक दृश्य आणि अदृश्य नाती.
आणि माणसंच कशाला? झाडं, फुलं, पानं, रानं, पक्षी, प्राणी,
एवढंच नव्हे, तर गाणी, घरं आणि रस्तेसुद्धा एकेका समृद्ध
व्यक्तिमत्त्वाची धनी असतात! ह्यातील सार्या व्यक्तींशी (वल्लींशी!)
आणि वृक्ष-वल्लींशी एकरूप होताना त्यांच्या चांदणस्पर्शानं
लेखिकेच्या जगण्याला नवा आयाम मिळाला आणि तिच्या
लेखणीला शब्दांची पालवी फुटली. त्या पालवीचे अन् मोहोराचे रंग
ल्यालेल्या अम्लान, नितळ व्यक्तिचित्रांनी आणि
निसर्गचित्रांनी सजलेलं एक नितांतसुंदर दालन :