
Sharad Joshi - Shodh Asvastha Kallolacha | शरद जोशी - शोध अस्वस्थ कल्लोळाचा!
'शरद जोशी
शेतकरी आंदोलनाचे अखिल भारतीय नेते
यूनोची नोकरी सोडून ते स्विट्झरलंडहून परतले
आणि त्यांनी भारतीय शेतकऱ्यांमध्ये जागृतीचा
मंत्रजागर आरंभला- सभा, शिबिरं, आंदोलनं, प्रशिक्षण ...
कॉलेजात शिकणारी वसुंधरा काशीकर
जनसंसदेत सहभागी झाली. शिक्षणाबरोबरच तिच्या
जीवनात एक आगळा अध्याय सुरू झाला- शरद जोशी
नंतर सतरा वर्षांच्या सहवासात ती पाहत गेली त्यांचं कर्तृत्व.
ती त्यांना विचारत गेली कितीतरी प्रश्न-
त्यांच्याविषयी, स्वतःविषयी, भोवतालच्या परिास्थिंतीविषयी
या जिज्ञासू, संवेदनशील मुलीला त्यांनी भरभरून उत्तरं दिली.
त्यातून तिला दिसलेले शरद जोशी...
शेतकऱ्यांचा देव, पण एकाकी माणूस !
बुद्धिवादी, अहंकारी, तरी भावनांनी ओथंबलेले,
किचकट अर्थशास्त्राच्या मुळाशी भिडणारे आणि
सर्व कला-वाङ्मयांवरही प्रेम करणारे
मनातले विचार आचरणात उतरवून स्वतःचा
आरपार शोध घेणारे शरद जोशी
शोध अस्वस्थ कल्लोळाचा !
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५' X ८.५'
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २०१६
- सद्य आवृत्ती : एप्रिल २०१८
- मुखपृष्ठ : शेखर गोडबोले - राजू देशपांडे
- राजहंस क्रमांक : J-02-2016