Sampadit Saniya | संपादित सानिया
'केवळ स्त्रियांच्या कथनात्मक साहित्यातच नव्हे, तर समग्र मराठी साहित्यपरंपरेमध्ये ज्यांचे स्थान लक्षणीय ठरते, अशा लेखकांमध्ये सानिया यांचा समावेश होतो. त्यांचे लेखन संख्यात्मक दृष्टीने मोजके असले, तरी ते निश्चितपणे गुणवान व कसदार आहे. आपल्याला भिडलेला, भावलेला अनुभव त्याच्या सूक्ष्म कडा-कंगो-यांसह प्रतीकात्मक भाषेत सानिया आपल्या कथांमधून साकार करतात. बाह्यविश्वातील घटना-घडामोडींपेक्षा माणसांच्या अंतर्मनातील हेलकावे-हालचाली शब्दांकित करणा-या या कथांना एकाच वेळेस समकालीन व सार्वत्रिक परिमाण प्राप्त होते. त्यामुळे आपली निजखूण शोधण्याच्या प्रवासात सानिया यांच्या निवडक कथांचे हे संपादन वाचकाला मोठेच साहाय्य करील, यात शंका नाही. '
ISBN: 978-81-7434-692-6
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५' X ८.५'
- पहिली आवृत्ती:फेब्रुवारी २०१४
- सद्य आवृत्ती:फेब्रुवारी २०१४
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी'