Samantar Rangabhumi | समांतर रंगभूमी
कोणत्याही रंगभूमीला ऐतिहासिकतेचे भान असले पाहिजे. त्याने दिशा स्पष्ट होतात.
पुढचा मार्ग सुकर होऊ शकतो. हे पुस्तक तसे परिप्रेक्ष्य देऊ पाहते. साठोत्तर
प्रायोगिक-समांतर मराठी रंगभूमीचे केवळ साक्षी नव्हे, तर निरनिराळ्या नात्याने प्रत्यक्ष
सहभागी असलेले प्रतिभावान रंगकर्मी माधव वझे या विस्तृत परिप्रेक्ष्याचे दर्शन घडवत
आहेत. त्यांनी अनेक संदर्भबिंदूंच्या मदतीने ‘पल्याड’ (एकोणीस-विसाव्या शतकातील
युरोप, अमेरिका व रशिया) अन् ‘अल्याड’ (वीस-एकविसाव्या शतकातील प्रायोगिक-
समांतर मराठी रंगभूमी) यांचा घेतलेला अभ्यासपूर्ण वेध.
ISBN: 978-93-95483-12-4
- पहिली आवृत्ती : डिसेंबर २०२२
- मुखपृष्ठ : आतील चित्रे व मांडणी : शेखर गोडबोले
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८ .५"
- बुक कोड : L-02-2022