
Sahitya Ani Svatantrya | साहित्य आणि स्वातंत्र्य
लेखकाला पूर्ण स्वातंत्र्य असेल,
तरच त्याच्या मनातले लेखनात उतरते.
अलीकडील काळात शासनाबरोबरच सामाजिक
असहिष्णुतेचे दडपण लेखकावर येऊ लागले आहे.
समाजात निर्माण झालेली दहशतीची भावना
सामान्य माणसांपेक्षाही प्रतिभावंतांना अधिक जाणवते.
मग एक तर ते स्तब्ध होतात किंवा
वैचारिक संघर्षाला उभे राहतात.
प्रत्येक जण सॉक्रेटिस होऊन शांतपणे
विषाचा प्याला पिऊ शकत नसतो.
त्याला मग न लिहून शहाणे तरी व्हावे लागते,
अगर आपल्या स्वातंत्र्याची बूज राखणारा,
त्याचा आदर करणारा उदार समाज
अस्तित्वात येईल याची वाट पाहावी लागते.
राजकारणातली मंडळींना, ते जाहीरपणे काहीही बोलत असले,
तरी निर्भीड नागरिकांचे, लेखकांचे स्वातंत्र्य नकोच असते.
साहित्यिक आपल्याला जागे करण्याचा प्रयत्न करीत असतात.
पण मुख्य जबाबदारी असते आपली स्वत:ची.
आपल्या विचार, लेखन आणि वाचनस्वातंत्र्याचे रक्षण
जागरूकपणे आपणच करावयाचे असते.
ही जागरूकता जपण्यासाठी
विचार करणा-या प्रत्येक सुजाण व्यक्तीने
आवर्जून वाचलेच पाहिजे, असे -
- पहिली आवृत्ती : मे २०२२
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ " X ८.५"
- मुखपृष्ठ : शेखर गोडबोले
- राजहंस क्रमांक : E-01-2022
More Books By Narendra Chapalgaonkar | नरेंद्र चपळगावकर

