Ranga Natkache | रंग नाटकाचे
'नाटक पाहणे म्हणजे फक्त औट घटकेची करमणूक नाही. कधी हसवणारा, सुखवणारा, कधी रडवणारा, दुखवणारा कधी अंगावर धावणारा, कधी सारं मन सोलवटणारा, कधी बेभान करणारा, कधी आपल्याच मनाचा तळ धुंडणारा असा हा रंगभूमीवरचा खेळ. हा खेळ रंगून खेळणारे कलाकार प्रेक्षकांना निव्वळ गुंग करणारा खेळ दाखवत नाहीत, तर अविस्मरणीय असा जीवनानुभव देतात. अशा जीवनानुभवाच्या परिमाणाने रंगभूमीचे अवकाश भरून काढण्यासाठी धडपडणारी आधुनिक रंगभूमी. या आधुनिक रंगभूमीवरचे नाटक असते कसे? दिसते कसे? ते पहावे कसे? ऐकावे कसे? आणि मुख्य म्हणजे शोधावे कसे? या सा-यांचे एक वेगळे भान देणारी समीक्षा. '
ISBN: 978-81-7434-587-5
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५' X ८.५'
- पहिली आवृत्ती:सप्टेंबर २०१२
- सद्य आवृत्ती:सप्टेंबर २०१२
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी'