Rang Reshanche Sobati | रंग रेषांचे सोबती
मूळचे बेळगावचे जेष्ठ चित्रकार मारुती पाटील यांचा जन्म १९४५ चा. बालपणापासूनच गावातील निसर्गरम्य जीवनातून निर्माण झालेली कलेची आवड त्यांना पुढे बेळगावच्या चित्रमंदिर मधे कै. कलामहर्षी के. बी. कुलकर्णी या गुरुंच्या छत्र छायेत घेऊन गेली. पुणे मुंबई च्या प्रसिद्ध चित्रकला महाविद्यालयांमध्धील शिक्षणानंतर बराच काळ जाहिरात क्षेत्रात काम केल्यावर त्यांनी पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयात अध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली ती केवळ चित्रकलेबद्दलच्या प्रेमामुळे, ओढीमुळे. जवळ जवळ चार दशके अध्यापना बरोबरच स्वतः चित्रनिर्मितीतून त्यांच्यातला चित्रकार त्यांनी जिवंत ठेवला. "रंग रेषांचे सोबती" या त्यांच्या पुस्तकात त्यांच्या कलाप्रवासाचे अनुभव व त्यांची काही चित्र आपल्याला बघायला मिळतील.
ISBN: 978-81-19625-07-9
- पहिली आवृत्ती : सप्टेंबर २०२३
- मुखपृष्ठ, अंतर्गत मांडणी : तेजस आणि बरखा पाटील
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ९.५" X ११.५"
- बुक कोड : L-07-2023