Raktaphulnche Tatawe | रक्तफुलांचे ताटवे
स्वातंत्र्य-समतेची घोषणा करणारे नव्या समाजाचे संविधान अस्तित्वात आले.
पण त्यातून नवी समाजरचना अस्तित्वात आली का?
संविधानातील उद्दिष्टांचे अस्तित्व समाजमनाचा अविभाज्य भाग झाला का?
या प्रश्नांची उत्तरे कवी नोमेश नारायण शोधू लागतात,
तेव्हा त्यांच्या हाती उत्तरे येतात - कधी ‘खैरलांजी', तर कधी ‘रोहित वेमुला'!
मग अशावेळी या कवीने काय करावे? कवीच्या हाती काय असते?
कवीची ताकद कशात असते? या प्रश्नांची उत्तरे मात्र या कवीकडे निश्चितच आहेत,
असे या संग्रहातील कवितांमधून दिसते.
कवीच्या कवितांत प्रथमच विद्रोहाच्या ज्वाळातून
तावून सुलाखून निघालेले फिनिक्स पक्ष्यासारखे सळसळते मन दिसते.
नवनव्या प्रतीकांमधून व प्रतिमांमधून हा कवी विद्रोही कवितेच्या
साचेबद्धपणातून मुक्त होताना दिसतो.
ही कविता बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या स्वप्नातील
नव्या संस्कृतीचे जणू संविधान आहे. ती वैश्विक मानवी मूल्ये
समाजमनात रुजविण्याचा आशावाद व्यक्त करते.
व्यापक जीवनभान देण्याचा प्रयत्न करते. या कवितेतील
शब्दप्रतिमा आणि प्रतीकांचे नावीन्य एकूणच आंबेडकरी मराठी कवितेला व
रसिकांना पृथकअनुभूतीविश्वात घेऊन जाते. कवी मानवी संवेदना विशिष्ट
चाकोरीतून वा विशिष्ट तत्त्वज्ञानातून व्यक्त करीत नाहीत,
तर समग्रलक्ष्यी जीवनमूल्यांची व तत्त्वविचारांची पखरण करून
मानवी संवेदना कवितेतून शब्दबद्ध करतात.
आशय, अभिव्यक्ती व भाषा अशा काव्याच्या अंगांनी समृद्ध असलेली
ही कविता केवळ आंबेडकरीच नव्हे तर समकालीन
मराठी कवितेची कक्षा विस्तारणारी कविता आहे !
डॉ. प्रमोद मुनघाटे
- पहिली आवृत्ती : जुलै २०२३
- चित्रकार : चंद्रमोहन कुलकर्णी
- बाईंडिंग : हार्ड बाईंडिंग
- आकार : ९ " X६ "
- बुक कोड : G-03-2023