Rajhans Vyavharik marathi shabdarth kosh | राजहंस व्यावहारिक मराठी शब्दार्थ कोश
'लोकजीवनाचे आणि दैनंदिन व्यवहाराचे संपर्कमाध्यम असणारी कोणतीही भाषा गतिशील असते. तिचा इतर भाषांशी संपर्क येत असतो, ज्ञानविज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्यामुळेही अनेक नवनवीन संकल्पना शब्दरूप घेऊन तिच्यासमोर उभ्या राहात असतात. त्यांचे स्वागत आणि स्वीकार करून भाषा समृद्ध होत पुढे जात असते. गेल्या १०-१५ वर्षांत आणि येत्या १०-१५ वर्षांतही मराठी माध्यमातून शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेल्या या ‘व्यावहारिक’ शब्दार्थ कोशाची हीच भूमिका आहे. या पिढीला भाषेच्या शुद्धतेपेक्षाही तिच्या व्यावसायिक उपयुक्ततेकडे अधिक लक्ष द्यावेसे वाटते. आपल्या बोलण्यात सहज येणारा इंग्रजी शब्द त्यांना खटकत नाही. पण त्या तशा शब्दाचा नेमका अर्थ त्यांना माहीत असतोच, असे नाही. खुद्द मायबोलीतील परंपरेने आजतागायत चालत आलेल्या हजारो शब्दांप्रमाणेच या नव्याने लोकव्यवहारात रुळलेल्या ‘पाहुण्या’ शब्दांचेही अर्थ समजावून देणारा हा कोश म्हणूनच नव्या पिढीला अत्यंत उपयुक्त ठरू शकेल. मराठी प्रेमी घराघरात आवर्जून ठेवला जावा, वापरला जावा, असा हा उपयुक्त शब्दार्थ कोश म्हणजे मराठीतील कोशवाड्.मयाचे दालन अधिक समृद्ध करणारा एक ‘राजहंसी’ मानदंड आहे, यात शंका नाही. '
- बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
- आकार ; ७" X ९.५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २००७
- सद्य आवृत्ती : ऑक्टोबर २००७
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'