
P.N. Haksar ani Indira Gandhi: Don Ayushyanchi Gunfan | पी.एन. हक्सर आणि इंदिरा गांधी : दोन आयुष्यांची गुंफण
इंदिरा गांधींच्या यशस्वी काळातील भारतातील कदाचित
सर्वात प्रभावशाली व बलशाली वरिष्ठ सनदी अधिकारी आणि
ज्यांनी इंदिरा गांधींची प्रतिमा उंचावणे व ती निष्ठेने जपणे
ही आपली जबाबदारी मानली, अशा पी.एन. हक्सर
यांचे हे पहिलेच विश्वासार्ह चरित्र.
बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थानिकांचे तनखे व इतर सवलती बंद करणे,
भारत-रशिया करार, बांगलादेशची निर्मिती, शेख अब्दुल्लांशी समझोता,
पाकिस्तानशी सिमला व नवी दिल्ली येथे केलेले करार,
शेती, अंतराळ आणि अणुक्षेत्रातील देशाची प्रगती व
नंतर सिक्कीमचे भारताबरोबरचे एकीकरण अशा इंदिरा गांधींच्या
मोठ्या कामगिऱ्यांमध्ये हक्सर यांचे महत्त्वाचे योगदान होते.
भारताच्या धर्मनिरपेक्ष परंपरांचे रक्षण, सार्वजनिक क्षेत्राला बळकटी,
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि तंत्रज्ञानासंबंधीच्या स्वयंपूर्णतेत वाढ
यांसारख्या राष्ट्रीय चळवळींचे ते आश्रयदाते होते. इंदिरा गांधीनंतर
आलेले पंतप्रधानही त्यांचा सल्ला घेत असत.
विस्मरणात जाऊ पाहणाऱ्या एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचे
सरकारी कागदपत्रे, टिप्पणे, टाचणे व पत्रे या सर्वांच्या
साहाय्याने केलेले यथातथ्य चित्रण.
- पहिली आवृत्ती : सप्टेंबर २०२१
- मुखपृष्ठ व आतील मांडणी : शेखर गोडबोले, राजू देशपांडे
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५'" X ८ .५"
- बुक कोड : I-01-2021
More Books By Sujata Godbole | सुजाता गोडबोले




