
Petaryatala Pasara | पेटाऱ्यातला पसारा
मन पेटारा पेटारा, त्यात असे भरलेला ।
सुखदुःखे सजलेला सारा आयुष्यपसारा ।।
किती भेटले, तुटले आणि कितीक मिटले ।
नव्या-जुन्या पावलांचा सदा जागता पहारा ।।
कधी खुलते दालन, कधी झाकलेला कप्पा ।
कधी मीच पेटाऱ्यात, कधी माझ्यात पेटारा ।।
असा पेटारा खुलता सांडे आतला पसारा ।
नाही नाही हो कचरा, मनमोराचा पिसारा ।।
माझा पसारा भरावा कुणा दुजा पेटाऱ्यात ।
काळनदीच्या तीराला वाट पाहतो दुसरा ।।
आयुष्यात भेटलेली माणसे, सतत वेढून राहिलेला निसर्ग,
जणू कुटुंबाचेच घटक वाटावेत असे पशुपक्षी,
अनवट जागा तुडवत केलेली भटकंती
आणि या साऱ्यांच्या स्मृतींची मनाच्या पुस्तकाच्या पानांमध्ये
जपलेली पाने आणि पिसे यातून साकारलेला -
वाचकाला भावविभोर करणारा -
पेटाऱ्यातला पसारा
ISBN: 978-81-952301-1-2
- पहिली आवृत्ती : सप्टेंबर २०२१
- मुखपृष्ठ आणि आतील मांडणी : सतीश भावसार
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५'" X ८ .५"
- बुक कोड : I-04-2021